Tuesday, September 23, 2025

बाजार

समाजालाच झालाय आजार

आजकाल प्रत्येक गोष्टिचा भरतो बाजार

आजाराचा देखिल बनवून बाजार

आजाऱ्यालाच करतात बेजार

मराठीचा गदारोळ.. संपादकाला चेतावनी

अरे संपादका, तु या वर्तमान पत्राचं थोडं संपादन करत जा नाही तर जनता जनार्दन या वर्तमानपत्रचा उपयोग फक्त पादन क्षमता आजमावताना करतिलं. 

समासाच्या गमती जमती

अमर्याद प्रेम म्हणजे मर्यादातोडून नव्हे

निर्विवाद सत्य म्हणजे नवनविन वाद निर्माण करणार सत्य … नव्हे 

संवाद म्हणजे संमजस पणे वाद घालणे नव्हे 

सतर्क म्हणजे सतत तर्क नव्हे … 

वादक म्हणजे वाद घालणारा नव्हे तर वादन वाजविणारी व्यक्ती …

संपादक म्हणजे सतत … नको ते नं लिहिलेलंच बरं

——

समास सोडविण्याच्या प्रश्नात तुम्हाला फारच समस्या आल्यामुळे तुम्हाला देण्यात आलेल्या शून्य गुणांची समासामध्ये नोंद केली आहे, तरी सगळ्यांना सामवून घेण्याच्या उद्दात्त उद्देशापोटी समासात नोदवलेल्या समासाच्या प्रश्नाला दिलेल्या शून्य गुणांव्यतिरिक्त तुम्हाला ईतरांईतकेच समान गुण देऊन सामावून घेतले आहे … लावा अर्थ!

दिलफेक आशिकी

आशिके दिल.. संभल जा तू 

आशिके दिल संभल जा तू 

खंजर लिये खडे ये कातिल मार देंगे 

पर डरना नही.. 

तेरा दिल तो उसीके पास महफूज है