Wednesday, May 28, 2025

आपट्याची पानं

 as

आपट्यांची पाने 

==========

आपट्यांच्या पानांची सोनं म्हणून देवाण घेवाण तर माहीतीच आहे. आपट्याची पाने अगदिच सहजतेन मिळत असायची पुर्वी आणी “सोनं” द्यायचं निमित्त म्हणून जवळपास राहणाऱ्या नातेवाईकांच्या धावत्या भेटी देखील होत असत. शेजार जसा वाढत जाई तसं तसं आपट्यांची देवाणघेवाण अगदी अमेरीकेतल्या ट्रिक और ट्रिट च्या स्तरावर होत असे .. फक्त त्याचं कारण जनसंपर्क हा होतो .. चॅाकलेट कंपन्यांचा तिसऱ्या चातुर्मासाचा नफा हा नव्हता. 

पूर्वी दसऱ्याच्या दुसऱ्या आपट्याची पानं सहज फेकता येत असत. सध्या आपट्याच्या पानांची जागा फुकट असलेल्या what’s app art ने घेतली आहे. 



Marathon

मळ्यापर्यंत मॅरेथान

==============

बंड्या : ऐ झिंप्या, ते मॅरेथॉन म्हणजे काय रे ? आजकाल सारखं मी काही ना काही एकतो .. अमक्याच्या तमक्याने अमूक तमुक मॅरेथॉन धावली.  

झिंप्या : मॅरेथॉन म्हणजे .. धावायचं रे फक्त ?

बंड्या : धावायच … ?

झिंप्या : हो 

बंड्या : अरे पण धावयचं म्हणजे नक्की काय? कुठून कुठे धावायचं ?

झिंप्या : अरे धावायचं फक्त .. कुठनहि कुठे

बंड्या : अरे च्या मारी काय पण भलतच .. आणी कोणी धावायचं …?

झिंप्या : कुणी पण धाऊ शकतं … 


बंड्या :  कुणी पण …? 


झिंप्या :  हो , हो कुणी पण ..


बंड्या :  कुणी पण 


झिंप्या : हो तर, माणूस म्हणू नको , बाईमाणूस म्हणू नको .. 


बंड्या : बाईमाणूस पण घावत्यात


झिंप्या : अरे मग काय, काही काही बायका माणसापेक्षा जोरात धावतात .. तर सांगायच म्हणजे काय, बाई म्हणू नको, माणूस म्हणू नको, लहान मोठं, म्हातारं कोतारं .. सगळी धावत्यात बघ मॅरेथॉन. 


बंड्या : अन् कुठून कुठबी धावयचं , म्हणजे ईथनं मळ्यापर्यंत धावलो तर झाली का मॅरेथॉन?


झिंप्या : अरं तसं नाही .. २६ मैल तरी पाहिजे बुवा , ईथनं मळ्यापर्यंत १३-१४ मैल असेल, म्हणजे .. 


बंड्या : हा म्हणजे , ईथनं जायचं मळयापर्यंत , मागल्या पावलीच परत इथपर्यंत यायचं…


झिंप्या : हा बरोबर .. पण धावत


बंड्या :  धावत व्हयं 


झिंप्या : हो धावत 


बंड्या : अनं तु काय म्हनला मगाशी .. कुनीपण धावले तर चालतय.. 


झिंप्या : अरे चालतय काय, पलतय पलतय .. हा … मॅरेथॉन म्हणजे धावयचं … २६ मैल


बंड्या : जमतय कि मग 


झिंप्या : कुणाला ..तुला ?


बंड्या : हो तूच म्हणाला नं कुणी बी धावलो तर चालतय


झिंप्या : हो , पण तयारी करावी लागते 


बंड्या : मला नाही लागत 


झिंप्या : असं नाही बंड्या .. लागते तयारी , नाही तर .. नुसतीच लागते .. ला .. ग .. ते … वाट


बंड्या : नाही लागत  .. मीनं आधीच तयारी केली हाय, तु म्हनला नं कुनी बी धावलो तर चालतय .. बघ तू .. लाव पैज.. मळ्यापर्यंत मॅरेथान


झिंप्या : लावली पैज


बंड्या : बघ हा .. नंतर म्हणशील पैका नंतर देतो.. 


झिंप्या : अरे तू करून तर दाव ना मले आधी


बंड्या : बसंती … आ बसंती .. 


(बंड्याची घोडी धावत येते , बंड्या घौडेदौड करत मळ्यापर्यंत जाऊन परत येतो )


बंड्या : ए झिंप्या , काढ पैकं .. धावलो कि नाही मॅरेथान … 


झिंप्या : अरे तु कुठे धावला .. बसंती धावली, तु नुसताच बसला बसंती वर .. याले नाही म्हणत मॅरेथान


बंड्या : अरे पन तुच म्हणाला ना .. आता पलटी मारतोस.. 


झिंप्या : मी काय म्हणलो 


बंड्या : कुनी पण धावलो तर चालतय .. माजी बसंती  धावली ना … पुर्नं २६ मैल … काढ पैकं 





transitivity - incomplete

 ====================

अन्न हे पूर्णब्रम्ह 

अंड हे पुर्णान्न

अंड हे पुर्ण ब्रम्ह 

ब्राम्हणांनी 

====================

प्रेमप्रस्ताव

 


तो: तु कोण आहेस? तु ना … तु हवा आहेस … नाही नाही, म्हणजे तु ना, मला हवी आहेस?


ती : मी हवा आहे? 


तो : नाही .. तु हवी आहेस … 


ती : काय … मी , मी हवी आहेस? कुणाला .. तुला 


तो : तत् पप् .. घाबरत .. म्हणजे तू हवा आहेस .. i mean  तू हवे सारखी आहेस ..माझ्या साठी .. म्हणून मला हवी आहेस .. 


ती : डोळे वटारून … काय मी हवे सारखी आहे ? हवा कि हवी आहे?


तो : (अजून घाबरत घाबरत … ) दोन्ही दोन्ही ..


ती : म्हणजे… नीट सांग .. हवा कि हवी .. 


तो : म्हणजे … तु ना … तु ना .. हवा आहेसं.  


ती : काय .. ?


तो : म्हणजे .. तू ना नुसती असतेस … म्हणजे आहेस .. सगळीकडे, माझ्या विचारात, अवती भोवती .. पण दिसतंच नाहिस ना 


ती : म्हणजे मी हवा आहे 


तो : अमं हं .. हो हो .. नाही .. म्हणजे हो .. हवी आहे 


ती :  नाही? म्हणजे हो ? हो की नाही .. 


तो : नाही नाही, तसं नाही .. म्हणजे हो .. 


ती : काय? हो म्हणजे नाही???


तो : ना..ही .. तसं नाही .. म्हणजे तू हवा आहेस आणी हवी आहेस .. हं हो .. हा , हो हे बरोबर आहे. 


ती : काय बरोबर आहे 


तो : तू बरोबर आहेस हे बरोबर आहे 


ती :  अरे काय बरोबर आहे? 


तो: तू हवा आहेस. नाही तू हवी आहेस


ती : मी हवी आहे???


तो: म्हणजे — तु हवेसारखी आहेस.. आणी म्हणून मला हवी आहेस .. हे बरोबर आहे


ती :  आत्ता कळलं .. हा .. हो रे माझ्या राजा 


तो: हो … 


ती :  आणी तू बरोबर आहेस .. हेच बरोबर आहे .. चूक.. चूकत असेल तरीही.. 


तो: चूक नाही .. अचूक हेरलंयस तू मला …


ती : humm


तो:  हवेसारखीच असतेस तू माझ्या बरोबर … सतत .. दिसली नाहीस तरी … जाणाऱ्या क्षणातून प्रत्येक श्वासापरी येणाऱ्या क्षणात खेचून आणतेस .. तू मला 



ती: बर बरं. आता जास्त फुगवू नकोस .. आणी फुगू पण नकोस .. नाही तर भ्रमाचा भोपळा फुटेल … आणी जागा झाला कि म्हणशील तू ना .. तू ना .. रक्त आहेस …. सतत माझ्या ह्रुदयात असते म्हणून 

गुन्हा

 =======================

असा घडला काय हातून गुन्हा ?

ज्याची शिक्षा पुन्हा पुन्हा 

सहवासाचा ना त्या पडला कधी विसर

सहवासात आता मीच नसतो हजर


एकांतात सलतो सतत

अपभ्रंश


Absent 


ती : अहो, अ..हो …., अहो, ईकडे या लवकर

तो :  काय.. आलो आलो.  झालंय काय?

तीः शाळेतून फोन आला होता, चिंटू आपला दिवे लावतो आहे शाळेत.  त्याला विचारलं तर म्हणे बाबांनीच सांगितलं आहे.  


तो: मी? मी कुठे काय सांगितलं. झालंय तरी का? 

ती: अहो .. तो सारखा ब्रा ब्रा करतो आहे. कसं वाटत. नविन बाई आल्या शाळेत .. त्यांनी विचारल तु कोण आहेस.  तर हा आपला .. ब्रा 


तो: हं? 


ती: तेच तर 


तो: विचार करतं  .. मी सांगितलं? मी तर काहिच म्हटले नाही.  चिंटू  .. ऐ चिंटू .. चिंट्या .. ईकडे

ये लवकर 


ती: अहो .. रागवू नका त्याला .. 


तो: अरे रागवू नको? संस्कार करतो आपण … ब्र्म्हणाचं पोर आहे .. वात्रटचाळे करतो म्हणजे काय. चिंट्या .. ईकडे ये. 


ती: जाऊ द्या हो, मी सांगेन समजावून


तो: चिंट्या तू शाळेत काय ब्रा ब्रा म्हणत फिरतोस? 

चिंटू : बाबा .. तुम्हीच म्हणाता ना नेहमी ?

तो: मी .. मी म्हणतो? अरे तुझ्या ऐवढं आम्ही होतो .. शाळेत ब्रा काय.. तोंडातून ब्र काढायची पण हिंमत नव्हती 

ती: (हळूच … टोमणा) आणी एवढे मोठे आहात पण ब्र काय ब्रा पण काढता येत नाही यांना… मी आहे म्हणून 


तो: ऐ ..( ओशाळून) काय चाल्लय .. ते सवय नाही म्हणून .. चिंटू .. तू सांग .. शाळेत तू काब्र .. i mean का   ब   र   हां.. का बर ब्रा ब्रा म्हणत होतास?


चिंटू : बाबा .. तूम्हीतर म्हणत होता ना .. संध्या काळी संध्या कर ब्राम्हण आहेस तू ब्रा म्हण।।।

म्हणून मी शाळेत म्हटलं ब्रा ब्रा .. तूम्हीच सांगितलय ना .. ब्रा म्हण ब्रा म्हण.