Tuesday, March 03, 2026

सुशी

 सुरुवातीस फक्त सु आणि शी 

मग वाचू लागलो सुशि करता करता शी

खाऊन खूप सुशी होईनाशीच झाली शी 

आता सगळं बंद, मी राहीन थोडे दिवस उपाशी

द्या त्या सुशीवाल्यास फाशी

मी बरा नी माझा सुशिचा संच, तडक गाठतो आता काशी

प्रसिद्धी

झाला उषःकाळ, 

अन सुरू झाल्या टिवल्या बावल्या 

जमली भाउगर्दी

सगळेच नाचती माझ्या तालावर

जणू माझ्याच नियत्रणातल्या भावल्या 

जाता जाता वेळ, सरला माझाहि काळ

विरली सगळीच भाऊ गर्दी

जी माझ्या नावाने वाजवीत होती मृदुंग टाळ

परीसारत पसरताच अंधार

माझी सावलीदेखील झाली पसार


प्रग्धोगती


 प्रग्धोगती: मानवी गाढवाने, केली प्रगती अधोगती ==============================

नदी नाले आणी तळे 

इतकेच काय भरत असे तुंडूंब 

सुमार डबके नी खाच खळगे

दमयंती देखील म्हणत असे औषध मजला नल गे

शेतकरी बिनधास्त, पिके उगती गेली युगान युगे

घडली क्रांती, नव्हे उत्क्रांती

पण गनिमी काव्यापरी पसरू लागले प्रदुषण

प्रकृती देई मानवी वर्तनास दूषण

बेडकेही कंटाळून गेले करून डराव डराव

वरुणराया आता तरी हो प्रसन्न, असं काय करता राव?