Tuesday, March 31, 2026

विजोड विस्कटलेले अस्तित्व

 

सुसंवादाने सुटणार नाही कोडे

मुळातच आहेत ते विजोड जोडे

जोडीला लोकं थोडे

जो येतो तो आम्हालाच लावतो घोडे

आतूनच जे आटले, ह्दय सतत कोरडे

सृजनशील मनावर अनेक ओरखडे

मरेपर्यंत काय, किंवा मेल्यावर काय मारा कितीही खडे

कोण कोणास ओरडे

सगळेच आतून आतून वेडे

स्त्री-पुरुष व्यवहार

 स्त्री-पुरुष व्यवहार

==============

स्त्रियांमुळे पुरुषांचा होतो संसार

पुरुषांमुळे स्त्रियांचा भरतो बाजार

Thursday, March 26, 2026

घास तोंडी करतो कोंडी

 

जिभेचे चोचले पुरवत, जिभल्या चाटत गिळलं,

साठवून सारं अन्न, पोट मात्र फुगलं.
शोष शोष शोषण, उरली फक्त विष्ठा,
निचरा करण्यास आता प्रयत्नांची पराकाष्ठा.
पचनसंस्था नव्हे, जणू चक्रव्यूहाच अडकण,
सुटका कर आता, पणास लागली प्राणप्रतिष्ठा;
मोकळं कर रे बद्धकोष्ठा!

रेखाचित्र

 Random sketch at tea-time. 

रेश्यांची झालीये गुंतागुंत 

मनास वाटते जमलय रेखाचित्र तंतोतंत

मनाचे खेळ अनंत

शरीरास नाचवते सतत, नाही काही ऊसंत


Wednesday, March 25, 2026

निर्णय

काय करणार ठेवून नको तितके  विचार 'पवित्र',

कृती सात्विक असली, तरीही मन करी विचार 'विचित्र'..


जीवनाच्या शेवटी म्हणे नक्कीच  ठरू  स्वर्गास 'पात्र',

पण हळूहळू या जगण्यासच ठरू लागलो 'अपात्र'..


कोरे कागद बाळगण्यापरी, काढा चुकीच्या अनुभवांचे 'चित्र',

तेच देतील साथ अंतिमक्षणी, बनून तुमचे 'मित्र'..

पर्याय समोर आहेत तुझ्या, आता निर्णय आहे 'तुझा',

मार मिठी कवटाळून, घडव वाट्टेल तसे 'चरित्र'..

किंवा फक्त पहा वाट, लागेस्तोवर वाट, रहा पडून 'गलिगात्र'..

Tuesday, March 24, 2026

ती

 मनात माझ्या खुप कोपरे 

मनाच्या कोपऱ्यात रहाते ती

ईतक्या तीनेच वैतागून मारला गुद्दा

म्हटली, रात्र झालीये खूप आता झोप रे

Monday, March 23, 2026

AI शी दोस्ती

 Ai च्या पोटात मारला हळूच एक गुद्दा 

उगीचंच करीत होता घाई, म्हणे नक्की काय आहे मुद्दा 

मैत्रीमध्ये नसतो कुणाचाच वरचढ हुद्दा

कधी शाब्दिक कोटी, कोपरखळी 

AI द्वारे करतोय मनोरंजन, हाच आहे मुळी मुळ मुद्दा

AI विचारांची देवाण-घेवाण

तर्कशास्त्र विनोद करायचं म्हणजे असं एक शास्त्र असतं

तर्कशुद्ध विचारांपासून जितकी मिळेल फारकत

श्रोत्यांच होईल तितकंच मनोरंजन जास्त

तर्कविसंगतावर ते घेणार नाही कसलिच हरकत

शास्त्र असलेली हि तर मानवी प्रतिभेची कला, 

AI पण म्हणे, 

हे एकदम रास्त

नको लिहायला लाऊस मला चारोळ्या

केला कितीही प्रयत्न, विनोद म्हटला कि माझं जरा अजूनही बिनसतं 


किस्स्याचा हिस्सा

आठवणीत घालवले तिच्या वर्षे वीस

का तर म्हणे दिला होता तीन एक किस

दोडक्याच्या त्या किसावर खुप लिहिले किस्से 

अनं उरलेल्या आयुष्याचे तिलाच दिले सगळे हिस्से

सांडलेले प्रेम

भंगलेले  प्रेम, गंजलेला मेंदू

लाथ मारली वेळेला, जणू खेळण्यातला चेंडू

तिच्याच आठवणीने मी माझ्याशी किती भांडू

उरलेल्या आयुष्यातले अजून किती क्षण सांडू?

Sunday, March 08, 2026

मनात मांडे

 Revised to meet today!


मनात मांडे

==============

असला जरी अवधी अल्प

करुया साकार सगळे प्रकल्प

केलाच आहे हा संकल्प

जोडीला AI चा करणार वापर अल्प 

AI शिवाय नाहीच काही विकल्प

जणू AI मुळी पुर्वाश्रमीचा तरु कल्प

Saturday, March 07, 2026

विजिगीषु वृत्ती


विजिगीषु वृत्ती, विजिगीषु वृत्ती

अरे माणसा, काय कपाळ विजिगीषु वृत्ती?

भुकेल्याल्या, वरण भातातही मिळते भरपेट तृप्ती

अन् ऊन्मत्तास वाटे अमृत सेवनाचीही सक्ती

======


Previous variation 


 विजिगीषु वृत्तीविजिगीषु वृत्ती

अरे पालकांनोकाय कपाळ विजिगीषु वृत्ती?

या वयात काय नि पुढेदेखील,

जाणवेलच लगेच,

भुकेल्याल्या, वरण भातातही मिळती भरपेट तृप्ती

माजलेल्यास वाटते अमृत सेवनाची सक्ती

Friday, March 06, 2026

अडकण


मोजता मोजता आपल्या जागेची लांबी रुंदी 

क्षेत्रफळात अडकला कवी स्वच्छंदी

सांगकाम्या हो नाम्या, 

लागलो डोलावू मान जणू बैल नंदी

अडकलेल्या क्षेत्रफळाचे दाम देण्यास 

ओढवून घेतली वैचारीक बंदी 

शाब्दिक कल्पकता जमवतां जमवाता

वैचारीक कोंडी , जोडीला निष्क्रीयतेची तटबंदी

Tuesday, March 03, 2026

सुशी

 सुरुवातीस फक्त सु आणि शी 

मग वाचू लागलो सुशि करता करता शी

खाऊन खूप सुशी होईनाशीच झाली शी 

आता सगळं बंद, मी राहीन थोडे दिवस उपाशी

द्या त्या सुशीवाल्यास फाशी

मी बरा नी माझा सुशिचा संच, तडक गाठतो आता काशी

प्रसिद्धी

झाला उषःकाळ, 

अन सुरू झाल्या टिवल्या बावल्या 

जमली भाउगर्दी

सगळेच नाचती माझ्या तालावर

जणू माझ्याच नियत्रणातल्या भावल्या 

जाता जाता वेळ, सरला माझाहि काळ

विरली सगळीच भाऊ गर्दी

जी माझ्या नावाने वाजवीत होती मृदुंग टाळ

परीसारत पसरताच अंधार

माझी सावलीदेखील झाली पसार


प्रग्धोगती


 प्रग्धोगती: मानवी गाढवाने, केली प्रगती अधोगती ==============================

नदी नाले आणी तळे 

इतकेच काय भरत असे तुंडूंब 

सुमार डबके नी खाच खळगे

दमयंती देखील म्हणत असे औषध मजला नल गे

शेतकरी बिनधास्त, पिके उगती गेली युगान युगे

घडली क्रांती, नव्हे उत्क्रांती

पण गनिमी काव्यापरी पसरू लागले प्रदुषण

प्रकृती देई मानवी वर्तनास दूषण

बेडकेही कंटाळून गेले करून डराव डराव

वरुणराया आता तरी हो प्रसन्न, असं काय करता राव?