Wednesday, March 25, 2026

निर्णय

काय करणार ठेवून नको तितके  विचार 'पवित्र',

कृती सात्विक असली, तरीही मन करी विचार 'विचित्र'..


जीवनाच्या शेवटी म्हणे नक्कीच  ठरू  स्वर्गास 'पात्र',

पण हळूहळू या जगण्यासच ठरू लागलो 'अपात्र'..


कोरे कागद बाळगण्यापरी, काढा चुकीच्या अनुभवांचे 'चित्र',

तेच देतील साथ अंतिमक्षणी, बनून तुमचे 'मित्र'..

पर्याय समोर आहेत तुझ्या, आता निर्णय आहे 'तुझा',

मार मिठी कवटाळून, घडव वाट्टेल तसे 'चरित्र'..

किंवा फक्त पहा वाट, लागेस्तोवर वाट, रहा पडून 'गलिगात्र'..

No comments: