Friday, May 29, 2026

कातिल मेहमाननवाजी

कभी-कभी लगता है 

दोस्तों को छोड़ कर दुश्मनों को ही मिल आऊँ 

कम से कम दुश्मनों के साथ लड़ के मरूँगा 

कंबख्त हमारे दोस्त ही ऐसे हैं 

खाना खिला-खिला के ही मार देते

#DinnerWithFriends 


खात्री

होती ना..
माझ्याकडेही होती हक्काची छत्री!

पाऊस येताच भिजणार नाही,
द्यायची ती खात्री.

ओलाव्याची वाटावी भीती,
इतकीही नव्हती माझी वृत्ती भित्री.

वावटळापरी तू आलीस,
थेट छत्रीलाच लावली कात्री,

मुसळधार असो की तुरळक,
पाऊस येताच आता, थिजतो मी.. हीच एक खात्री.

आम आम की खास खासियत 🥭

आया आया सीजन आम का

आम हो या निजाम, सब खाएंगे आम

आम दिन या खास दिन

चाहे कितनी भी हो आमदनी

खाएंगे सभी आम हर दिन

आम शब्दों से चारोळी बनी

बनाते बनाते बहुतही बन गई फनी ॥१॥


चखते ही इसका स्वाद,

हर कोई बन जाता है खास

फलों का राजा है यह,

सबको दिलाता है अपनापन का एहसास


गर्मी की दोपहर में जब मिल जाए ठंडा-ठंडा आम

सब भूल जाते हैं काम, 

फरमाते हैं आराम ॥२॥


आराम .. आ राम, आ राम करते बुलाते

राम को भी देते आम

राम नाम देता सुकून..

सुकून से मिलता आराम

चाहे कितना भी हो काम ॥३॥


आम आम की खास खासियत

जानिए खा के आम, 

बदल जाएगी नीयत ॥४॥

जमवून जमवून जमवलय जाम!

भूक लागली, आणला ब्रेड, लावला जाम

आली भटकंतीची हुक्की, काढली गाडी, झाला ट्रॅफिक जाम

आली चाळीशी, अंग दुखतंय जाम

चोळावा बाम, झोपावं शांत, पिऊन जाम!

इंग्रजी असो की देशी - आधी भर जाम

अमृत, इंद्री जाम इंद्रियांनाही चालवते जाम

आम हो या निजाम, सगळ्यांनाच जाम आवडतो जाम!

जमवून जमवून जमवलं, जमवता जमवता जमलंय जाम!

Wednesday, May 27, 2026

बांधिलकी

तुझ्यासाठी माझ्या मनाने फक्त गुंफले शब्द,

तू मात्र गुंतवले क्षण,

तू येताच जणू वेळही होते स्तब्ध.

तू गेलीस तेव्हापासून मात्र सगळंच निस्तब्ध,

दे की एखादा सुखद धक्का, ये कवेत पुन्हा,

बांधिलकीला इतकी का बद्ध?

Tuesday, May 26, 2026

सिध्दांत

सिध्दांत : मित्रांबरोबरच्या चहाच सुख, आणी तिच्याबरोबर न प्यालेल्या कॅाफिचं दु:ख यांचा हिशोब तारुण्यातच लावायला जे शिकतात; ते आयुष्याचा जमाखर्च उतारवयाच्या आधीच चोख मांडतात.

मंगळयात्रा

टंगळ मंगळ करता करता

गाठला मी एकदा मंगळ

कडक ऊन्हात पिऊन पन्हं

फारच केली मी तिकडे चंगळ

फुगा

 अपेक्षांचा फुगा फुगवाल तेवढा फुगतो

त्याला वास्तविकतेच्या टाचणीने फोडणे हेच ईष्ट!

..

स्वप्नपरी

बघून तिचा सुडौल बांधा

तोल माझा गेला

हात पुढे करून

तिने लगेच कौल दिला

Monday, May 25, 2026

रक्तबंबाळ रोमियो


आतूरतेने वाट पाहतात डोळे
अचानक लागली पापणी
गेलीस त्याचवेळी डोळ्यासमोरूनी तू कधी
आयुष्यभराची राहील हिच बोचणी ॥१॥
बोटातच म्हणून खुपसली मी टाचणी
तुझ्यावरच्या प्रेमाची अजून काय देऊ चाचणी?
खुशाल कर वाहत्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची तपासणी ॥२॥
देह जरी हा पडला धुमसत मसणी
अपूरी राहीली जरी माझी हि कहाणी
सदा जीवंत राहील विच्छा माझी
घालण्यास तुझ्या ह्रदयास गवसणी ॥३॥

Sunday, May 17, 2026

वजनघटाईची डायटगिरी

चहाच्या कपात करावी कपात,

चहाच्या कपात चहाऐवजी ओतावी कॉफी काळी.

तळहातात मावेल इतकाच खावा वरण भात,

हळूहळू नियंत्रित आहारानेही वाजेल ब्रह्मानंदी टाळी.

Friday, May 15, 2026

धूरंदर - २

घायल से बना घातक,

कठिन था बहुत यह सफर।

उसकी नज़र की धार,

और सही मौके का उसका सबर।

अंदर के ईंधन को दी डोभाल ने चिंगारी,

बेचिराग कर दी उसने सारी की सारी लियारी।


कहो जसकिरत या हमजा, 

वो तो है धुरंधर! वो तो है धुरंधर! वो तो है धुरंधर!

रोमियो लट्टू

चटक-मटक चवळी चटक,

रसरशीत तारुण्य, 

बघतोय तुला टकमक!

भटकली भवानी भटक-भटक,

चाळीशी आली तरीही आहे चमक-धमक,

अजूनही तुझ्याचकडे बघतो एकटक!

Monday, May 11, 2026

गुन्हा

तुझ्या लेखी घडला असेल गुन्हा

तरी मी करणार तेच पुन्हा पुन्हा

वाटेल ती लावा कायद्याची धारा

मी भिजणार मनसोक्त येताच वर्षाधारा


कायद्याचं म्हणाल तर काय द्यायचं बोला

कांद्यांची भजी आणि चहाचा ठेला

नकोच घरी तळण्याचा झमेला

चल बरोबर, नाही तर मी निघालो एक अकेला


पुन्हा आलीच जर पावसाची सर

तितक्याच सहजतेने येईल मला लहर

लहरीपणामुळेच केल्या समुद्राच्या लहरी पार

जीवनात आला किती मोठा कहर

जीवंत लहरी मन असेल सतत हजर


सांगण्याचा मुद्दा, आला पाऊस

खा भजी फिटेपर्यंत हौस

आपल्या आत जरी असला देव,

आपण शेवटी हाडामासाचेच माणूस


घ्या उपभोग मनमुराद

जगा जीवन असं की सगळे देतील दाद

कुणास वाटलंच की भिजून घडला प्रमाद

वाटू देत त्यांना, ते त्यांचे त्यांचेच होतील बाद

गुन्हा

तुझ्या लेखी घडला असेल गुन्हा

तरी मी करणार तेच पुन्हा पुन्हा 

वाटेल ती लावा कायद्याची धारा

मी भीजणार मनसोक्त येताच वर्षाधारा

Happy Mother’s Day

पुण्यवानास, अगदी साक्षात भगवंतालाही खाऊ घालते
— ती आई!

भगवंतालाही खट्याळपणापायी, उखळाला बांधून ठेवते
— ती आई!

पापी उदरही जी पापुद्र्याच्या पोळीने भरते
— ती आई!

आणि त्याच उदराच्या पाठीवर, तितक्याच त्वेषाने फटके मारते— ती आई!

Sunday, May 03, 2026

डोस

डोसकुणी पाजतो देशभक्तीचा डोस,

कुणी पाजतो कर्तव्यदक्षतेचा डोस,

कुणी पाजतो स्वावलंबनाचा डोस,

पण स्वतः कुणीच पीत नाही;

या चारोळीतून श्रोत्यांना हाच डोस.