कधी गमतीदार फिरक्या
तर कधी खवचट टिका बेरक्या
समजलं तर छान चारोळ्या
नाहितर नुसत्या अक्षरांच्या
बेरजा आणि वजाबाक्या
This blog is to say Hello to the world of Blogs :) Yeah, now i am going to get my thoughts across to you people out there even faster and efficient way. Hope you find this helpful and interesting.. Keep Blogging :)
कधी गमतीदार फिरक्या
तर कधी खवचट टिका बेरक्या
समजलं तर छान चारोळ्या
नाहितर नुसत्या अक्षरांच्या
बेरजा आणि वजाबाक्या
शान बढ़ाने के लिए पूरी जिंदगी लगती है,
पर नशा बढ़ने से पूरी जिंदगी की लगती है।
जो लोग नशा को शान समझते हैं...
क्या वो अब समझे कि नशा शान का उल्टा क्यों है?"
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागलं धनुष्य
बाण कुठे कुठे मारू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागली हातोडी
खिळा कुठे कुठे ठोकू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागली कुदळ
खड्डा कुठे कुठे खोदू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागली दोरी
मी काय काय बांधू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागली सुरी
कांदा किती किलो कापू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागली शिडी
मी कुठे कुठे चढू
कू कुच कू कू कुच कू
माझ्या हाती लागलं पॅराशूट
उडी कुठून मारू
.......
कू कुच कू कू कुच कू
माकडाच्या हाती लागलं कोलीत
माकडाला बंद करा खोलीत
तिने दाखवल्या मला नाना कळा,
तो दिवसही होता मोकळा.
असेच काही दिवस गेले,
अन् सुरू झाल्या तिच्या कळा!
वडापाव, दाबेली, छोले भटूरे
खाऊन खाऊन पोटाचं झालंय जणू पोखरण
ढम ढम्माढम ढम ढम ढम
फुटले जणू ॲटमबॉम्ब,
पसरलं सगळीकडे प्रदूषण ॥१॥
आपलेच दात नी आपले ओठ
कशाला द्या इतरांस दूषण
खा की बिनधास्त,
आपणच म्हणतो आपणास
बनूनी स्वतःच लंकाभेदी बिभीषण ॥२॥
परिस्थिती होऊ लागली भीषण
जमालगोट्याने दाखविली कमाल
मोलाचेच आहेत हाजमोला
परिस्थिती होण्याआधीच विदीर्ण
कामी आले कायम चूर्ण. ॥३॥
खऱ्या अर्थाने झाले चक्र
पूर्णतळीरामाने सुचवले पुन्हा… बिनधास्त खा रे! ॥४॥
शेवटी... बुद्धच काय, बुद्धीपण हसली! ॥५॥
स्वभाव त्याचा मुळातच कडवट
त्यातून वृत्ती अतिशय चावट
सगळीकडेच चाले त्याचीच वट ॥१॥
तरी चालतसे त्याची सारखी वटवट
म्हणतसे तो,
डोक्यावर आहे माझ्या कसलतरी सावट ॥२॥
कडवटपणाबरोबर वाढू लागली वृत्ती तापट
प्रत्येक गोष्टीतच दिसत होती फक्त त्यास खोट
इतकंच काय,
एकदा तर म्हणे कातडीच होतेय चामट ॥३॥
सगळ्यांचीच त्याला वाटे कटकट
काहीतरी कसं तरी करून उरकायचं झटपट
यासाठीच त्याची चाले सतत खटपट ॥४॥
नियतीचाच म्हणे हा पट
ना त्यात कुणाचे कपट
ना रचले कुणी कारस्थानी कट ॥५॥
आपसूकच मावळला तो, जरी होता धडधाकट
शेवटी सगळ्याचाच झाला शेवट ॥६॥
एका काळोख्या रात्री झपाटलेल्या बंगल्यात,
मारला होता मी एकदा एकच फेरफटका.
लांडगा आणि भुताचा उडला होता तिथे खटका,
लांडग्याने तोडला भुताच्याच मांडीचा लचका,
भुतानेही मारला त्याला जोरात एक फटका!
दोघांनाही दिला मी मशालीचा जोरात चटका!
मित्रा, स्वप्नातून असल्या करशील का माझी सुटका?
चल की दोस्ता,
मारूया पुन्हा त्याच बंगल्यात अजून एक फेरफटका!
दिवसागणिक सतत वाढू लागले नवनवीन थेर,
मनात विचार उधळू लागले चौफेर.
मेंदूतच माझ्या कुणीतरी पेरलाय हेर,
सावलीनेच माझ्या धरलंय माझ्याशी वैर!
राग येताच फेकला विवेक,
जणू घरातला काढला केर.
माझ्याच विरुद्ध रचतोय कोण कट?
मेंदूतच माझ्या पेरलाय कुणी 'हेर'!
आत्मविश्वासाच्या दोऱ्यात ओवणार प्रयत्नांचे मणी,
गगनचुंबी पर्वतालच घालायची आता गवसणी.
लिहिणार अशक्य वाटणारी घडवून खरी कहाणी,
शंकेखोरांना वाजवू देत खुशाल पिपाणी!
आज अचानक दचकून उठलो रात्री
तेवढीच काय जीवंत असल्याची खात्री
वैचारीक क्षमतेला तर लहानपणीच लागली शाळेची कात्री
आता आपण फक्त निर्वाणापर्यंतचे यात्री
हत्तीला झाली सर्दी
मुंग्यांनी केली त्याच्याभोवती गर्दी
हत्तीला वाटले पहा किती छान माझी मैत्री
औषधपाणी करण्यासाठी जमली पहा केवढी गर्दी
मुंग्यांना लक्षात आले,
लांब यांची सोंड,बरी होत नाही सर्दी
पोखरून पोखरून खाऊ,
मुळातच आपण कोरीवकामाचे दर्दी
"प्यार में जहाँ खो बैठे सारा आलम,
तुम्ही बताओ अब कौन सा लगाएँ मल्हम।
हमे लगा था कि यह दुनिया है ज़ालिम,
पर दर्द दिया तेरे इश्क़ ने ऐसा...
जिसे ठीक ना कर पाया कोई पीर या हकीम।”
अनुगच्छतु प्रवाहः!
==============
If you feel low,
Just go a little slow...
If you are going slow,
You are going against the flow;
That’s why you feel low.
Hence, my friend, turn around!
Go with the flow— अनुगच्छतु प्रवाहः!
You will dodge life’s blow,
And shine with your inner glow.
राक्षसाला चालल्या असत्या उवा
त्याला झेपला नाही ढेकणांचा गनीमी कावा
आत्म्याने त्याच्या लाभो शांती
त्यासाठी खाऊया मुंगी साखरेचा रवा
जोडीला दोन घोट कावा
https://www.facebook.com/share/1F6bHTx6ji/?mibextid=wwXIfr