Thursday, June 25, 2026

कू कुच कू कू कुच कू

कू कुच कू कू कुच कू 

माझ्या हाती लागलं धनुष्य 

बाण कुठे कुठे मारू


कू कुच कू कू कुच कू 

माझ्या हाती लागली हातोडी

खिळा कुठे कुठे ठोकू


कू कुच कू कू कुच कू 

माझ्या हाती लागली कुदळ

खड्डा कुठे कुठे खोदू


कू कुच कू कू कुच कू 

माझ्या हाती लागली दोरी

मी काय काय बांधू


कू कुच कू कू कुच कू 

माझ्या हाती लागली सुरी

कांदा किती किलो कापू


कू कुच कू कू कुच कू 

माझ्या हाती लागली शिडी

मी कुठे कुठे चढू


कू कुच कू कू कुच कू 

माझ्या हाती लागलं पॅराशूट 

उडी कुठून मारू

.......

कू कुच कू कू कुच कू 

माकडाच्या हाती लागलं कोलीत

माकडाला बंद करा खोलीत

No comments: