स्वभाव त्याचा मुळातच कडवट
त्यातून वृत्ती अतिशय चावट
सगळीकडेच चाले त्याचीच वट ॥१॥
तरी चालतसे त्याची सारखी वटवट
म्हणतसे तो,
डोक्यावर आहे माझ्या कसलतरी सावट ॥२॥
कडवटपणाबरोबर वाढू लागली वृत्ती तापट
प्रत्येक गोष्टीतच दिसत होती फक्त त्यास खोट
इतकंच काय,
एकदा तर म्हणे कातडीच होतेय चामट ॥३॥
सगळ्यांचीच त्याला वाटे कटकट
काहीतरी कसं तरी करून उरकायचं झटपट
यासाठीच त्याची चाले सतत खटपट ॥४॥
नियतीचाच म्हणे हा पट
ना त्यात कुणाचे कपट
ना रचले कुणी कारस्थानी कट ॥५॥
आपसूकच मावळला तो, जरी होता धडधाकट
शेवटी सगळ्याचाच झाला शेवट ॥६॥
No comments:
Post a Comment