Tuesday, June 16, 2026

सापळ्याचे आमंत्रण

एका काळोख्या रात्री झपाटलेल्या बंगल्यात,

मारला होता मी एकदा एकच फेरफटका.

लांडगा आणि भुताचा उडला होता तिथे खटका,

लांडग्याने तोडला भुताच्याच मांडीचा लचका,

भुतानेही मारला त्याला जोरात एक फटका!

दोघांनाही दिला मी मशालीचा जोरात चटका!

मित्रा, स्वप्नातून असल्या करशील का माझी सुटका?

चल की दोस्ता,

मारूया पुन्हा त्याच बंगल्यात अजून एक फेरफटका!

No comments: