Sunday, July 26, 2026

एकादशीचा उपवास


लाडू खाण्यास आतुर

नाही कुणीच चिंतातुर

चिंतनात लाडवाच्याकाढला दिवस उपवासाचा,

क्षणोक्षणी मेंदू होऊ पहात होता फितूर.

वरवर जरी उपवास इच्छाशक्तीला 

करीत होता तो जी हुजूर जी हुजूर ॥१॥


तरलो कसा बसा खाऊन साबुदाणाभगर.

पोटात तरी ओरडतंच होते कावळे,

दिला त्यांनाही नैवेद्य सुका मेव्याचा,

टाकून प्रामुख्याने काजू नी खजूर ॥२॥


आषाढीच्या दिवशी बाळगले मनात हेच विचार,

 लागू देता कुणास ताकास तूर

पांडुरंगही हसून विचारतो

"किती रे होऊ पहातोस चतुर?" ॥३॥


तो प्रेमळकरीतो तरीही तोच कृपा,

व्यावसायिक जगातही तो,

निःशुल्कच करतो दूर, सगळीच कसूर! ॥४॥

Thursday, July 16, 2026

धगधगती बाग

तिच्यासाठी प्रेमाने हृदयातच फुलवली बाग

ती वावटळ, फिरते इकडे तिकडे…

अचानक येऊन एक दिवस, लावते त्यालाच आग

त्यालाही येतो की कधी कधी राग

खुरडून टाकतो सगळा फुलोरा

वाटतं तिला मग, हाच तो ह्या बागेतला काळा नाग

रात्री होतात छप्पन भोग, 

नव्याने होते सकाळ,दोघेही करतात अविचाराचा त्याग


दोघंही पिछाडलेले, झालाय त्यांना प्रेमरोग

प्रेमाचे असतातच मुळी वैयक्तिक योग

नको लागू देऊ प्रेमास त्यांच्या कशाचाही डाग!

Tuesday, July 14, 2026

ठिगळांचा सदरा


जे काही..ते सगळं तिच्यासाठी,

तरीही तिच्या साडीलाही असतो पदर ॥१॥


पण जाणवलं का कधी कुणाला,

तो कधी पदर पसरूच शकत नाही;

कारण सदऱ्याला मुळी नसतोच पदर!

अन् त्रासला कितीही जरी तो,

असते का कुणाला त्याची कदर ? ॥२॥


सुखी माणसाचा मिळणारच नाही कधी सदरा

हसला जरी तो वरचेवर,

हसतो तो फक्त वरवर ॥३॥


समस्या असो एक किंवा दहा हजार,

हा आपला हजर, लढतो दररोज.. झुंजार!

ठोठावतो प्रत्येक दरवाजा, 

न होता बेजार,देतो निकराची झुंज, 

सांभाळण्यास सदरा नी विजार ॥४॥


प्रत्येकजण स्वतःपुरता तरी असतोच मुळी आतून धुरंधर ॥५॥

Wednesday, July 08, 2026

६३ > ३६

मुळातच असेल छत्तीसचा आकडा तर 

      चांगली संधी देखील सुटते, बसावे लागते 

सतत हात चोळीत...

     पण सोबत असेल चांगली तर...  हात सतत चोळीत!


 

हात चोळीत...!

सोबत चांगली असेल तर 

    महासागरातही चालते गलबत सुरळीत,

सोबत असेल चांगली तर 

   सुसरबाईची पाठही भासते गुळगुळीत;

सोबत असेल चांगली तर 

    आयुष्यातल्या मोठ्या अडचणी भासतात मुळमुळीत,

मुळातच असेल छत्तीसचा आकडा तर 

      चांगली संधी देखील सुटते, बसावे लागते 

सतत हात चोळीत...

     पण सोबत असेल चांगली तर...  हात सतत चोळीत!



Tuesday, July 07, 2026

गळ

सोबत चांगली असेल तर

महासागरातही चालते गलबत सुरळीत

नको त्या आमीषास बळी पडला तर

अमर्याद महासागरातही मासा अडकतो गळात

खात्म्याचा शाब्दिक खात्मा

माझ्यातला प्राणी, माझ्यातला माणूस

मानवी शरीर, शरीरात आत्मा

सगळ्यांचा लगाम धरतो परमात्मा

विचार करता करता

होतोय मेंदूचा… खात्मा


नाही नाही,


करावा अहंचा खात्मा।।

विटलेली वाट

मी वाट बघत बसतो…
वाट बघता बघता वीट येतो.
वीट येताच मी निघू म्हणतो,
वाट न बघताच निघालो म्हणून,
तू वीटच डोक्यात घालते.
वीट डोक्यात बसल्यावर वाट लागते,
तू आल्या वाटेने परत निघून जाते.
मी वाट बघत बसतो…
तुझी वट इतकी आहे,
की इतकी वाट लावल्यावरही,
वाटतं की वाटलं तितकी वाट नाही लागली,
आणि तितकासा वीटही आलेला नाही अजून.
वाटतं मग पुन्हा...
वाव आहे थोडा अजून.
वावटळ थोडक्यातच टळलं असं वाटतं,
टाळक्याची मग अजून वाट लागते.
मी वाट बघत बसतो…
वीट आला खूप की मग मी नीट मारतो,
नीट मारली की मात्र माझीच वाट लागते.
टाळकं अजून ठणकतं,
बाटली जसजशी रिकामी होते,
ग्लास म्हणतो ठणठण गोपाळ.
तुझ्याशिवाय जगणार काय कप्पाळ…
मान खाली घालतो गुमान.
मी वाट बघत बसतो…
हवं तर घाल वीट टाळक्यात,
वाट लागली करून करून 'वेट'.
वेटपण तर वाढू लागलं करून करून 'वेट',
आता ये कवेत थेट!
यापेक्षा अजून सांगताच येणार नाही नीट,
कितीही आला जरी वीट, करणार नाही रीपीट.
असं काही बरळतो झोपेत,
कारण जागेपणी तर…
मी वाट बघत बसतो…

Saturday, July 04, 2026

डास - २

 काकांनी रचला भाग दोन, 

माझ्यातर्फे त्यांना ice creme चा कोन

तसदी देत नाही त्यांना करून रिकामा फोन

काकांनी साधला आहे कवितेचा झोन

डास - १

 काकांचं मन उदार 

डासांचे देखिल फेडले उपकार

रक्ताचे दोनच नाही, दिले जादाचे घे थेंब पाच

डासाच्या परोपकराचा जाणवणार नाही त्यांना जाच

उन्हाळा

 I received a following forward, thought of extending it. 

==


*गर्मीचा कहर...!*


*अकोला ब्रेकिंग*


मला रात्री बेडरुम मध्ये 2-3 डास फिरतांना दिसले....


मी उठून ऑल आऊट लावणार तेवढ्यात एक डास म्हणाला..


*"काका तुमची शपथ, चावणार नाही....* 🙏


*फक्त थोडा वेळ AC मध्ये राहू द्या"* 🫣

==


भरदुपारी गरमीचा कहर होता आणि ज्याची सगळ्यांनी धास्ती घेतली होती, नेमकं तेच घडलं. अचानक विद्युत प्रवाह खंडित झाला होता. 


क्षणार्धात धापा टाकत थंड प्रवाहाचा झोत सोडणारा एसी बंद पडला आणि बाहेरच्या झळा आत येऊ लागल्या.


काका पार घामाघूम झाले होते. डास पण एसी बंद पडल्यावर काढता पाय घेऊ बघत होता.


काकांनी लगेच डासाला सांगितलं, "अरे जरा पंख फडफडव मानेजवळ, पण चावू नकोस. जीव जायचा... माझा नाही, तुझा! एक फटका मारीन..."


डासाला दया आली. तो बिचारा जीवापार पंख फडफडवून काकांना हवा घालू लागला. काकांचा घामाने जीव टांगणीला येण्याआधीच, त्या डासाच्या फडफडण्याने मिळालेल्या वाऱ्यामुळे जीव भांड्यात पडला होता.


आता काकांमधील भूतदया जागी झाली. ते म्हणाले, "दमला असशील, तहानेने कासावीस झाला असशील... हवं तर घे काढून दोन थेंब रक्त... पण बोटातूनच बरं का!"


नजरभेट

रुप तुझे मोहक

कटाक्ष तुझा दाहक

बघताच क्षणी तुला

बळी पडलो मी नाहक

पॅथॅलोजिस्टचं पथेटीक प्रेम (ppp)

दिले ह्रदय तुला

बरगड्यांनमध्ये बसवला भाता

येतेस का कवेत आता

एकत्रित करू रक्ताभिसरणाच्या बाता

कोलाहल

रात्र रात्र जागतो मी, भूतासारखा

सकाळ होताच झोपतो मी, घुबडासारखा!

ओळखा पाहू कोण मी?


मी कोण? मी कोण? .. 

कोण मी? कोण … मी?


कोण मी हे कळलं असतं,

तर जागलो असतो का मी भूतासारखा?

मान वळवून न्याहाळत बसलो असतो का तुला, असा घुबडासारखा?


मी कोणीच नाही, नाही नाही, कुणीच नाही .. 

फक्त मी, फक्त…. मी.. 

हो मीच … 


अहं ब्रम्हास्मी!

Friday, July 03, 2026

पट्टराणी

राजाची होती ती राणी पट्ट

घ्यावे तिने मिठीत घट्ट 

म्हणून पुरवितसे तिचे सारे हट्ट

बघतां बघतां झाली ती निगरगट्ट

चीनी कम

टाळी आपली पडते नेहमीच सोडून सम
माझा नी तुझा मस्त बसलाय जम
अब न कोई गम, जब तुम रहो साथ हरदम
पी लेंगे चाय भी अगर होगी चीनी कम

बैलोबा

सगळ्यांना ओढावाच लागतो आपला आपला गाडा
ओढता गाडा भरत जातोच पापांचा घडा
अंतरीचा सुरूच राहतो झगडा
बघून रोजचा राडा, मनोमनीच रडा

Thursday, July 02, 2026

मुक्तीचा मार्ग

अगदी अंतरीची ओळख असली तरी पटली पाहिजे

ओळख पटली की पटलीच समजा

अंतरीची ओळख, आणि ओळख पटली

म्हणजे काय..

पटलेली आधीच असते, पटली आहे हे कळतं

अंतरीची ओळख पटवता पटवता 

किंवा

पटता पटता अंतर फक्त वाढत जातं

त्यामुळे भानगडीत न पडता, 

भान ठेवून गाडीत बसा

जी गाडी आपल्याला भानगड होऊ न देता 

पटापट मुक्कामी पोहोचवेल!