Saturday, July 04, 2026

उन्हाळा

 I received a following forward, thought of extending it. 

==


*गर्मीचा कहर...!*


*अकोला ब्रेकिंग*


मला रात्री बेडरुम मध्ये 2-3 डास फिरतांना दिसले....


मी उठून ऑल आऊट लावणार तेवढ्यात एक डास म्हणाला..


*"काका तुमची शपथ, चावणार नाही....* 🙏


*फक्त थोडा वेळ AC मध्ये राहू द्या"* 🫣

==


भरदुपारी गरमीचा कहर होता आणि ज्याची सगळ्यांनी धास्ती घेतली होती, नेमकं तेच घडलं. अचानक विद्युत प्रवाह खंडित झाला होता. 


क्षणार्धात धापा टाकत थंड प्रवाहाचा झोत सोडणारा एसी बंद पडला आणि बाहेरच्या झळा आत येऊ लागल्या.


काका पार घामाघूम झाले होते. डास पण एसी बंद पडल्यावर काढता पाय घेऊ बघत होता.


काकांनी लगेच डासाला सांगितलं, "अरे जरा पंख फडफडव मानेजवळ, पण चावू नकोस. जीव जायचा... माझा नाही, तुझा! एक फटका मारीन..."


डासाला दया आली. तो बिचारा जीवापार पंख फडफडवून काकांना हवा घालू लागला. काकांचा घामाने जीव टांगणीला येण्याआधीच, त्या डासाच्या फडफडण्याने मिळालेल्या वाऱ्यामुळे जीव भांड्यात पडला होता.


आता काकांमधील भूतदया जागी झाली. ते म्हणाले, "दमला असशील, तहानेने कासावीस झाला असशील... हवं तर घे काढून दोन थेंब रक्त... पण बोटातूनच बरं का!"


No comments: