वडापाव, दाबेली, छोले भटूरे
खाऊन खाऊन पोटाचं झालंय जणू पोखरण
ढम ढम्माढम ढम ढम ढम
फुटले जणू ॲटमबॉम्ब,
पसरलं सगळीकडे प्रदूषण ॥१॥
आपलेच दात नी आपले ओठ
कशाला द्या इतरांस दूषण
खा की बिनधास्त,
आपणच म्हणतो आपणास
बनूनी स्वतःच लंकाभेदी बिभीषण ॥२॥
परिस्थिती होऊ लागली भीषण
जमालगोट्याने दाखविली कमाल
मोलाचेच आहेत हाजमोला
परिस्थिती होण्याआधीच विदीर्ण
कामी आले कायम चूर्ण. ॥३॥
खऱ्या अर्थाने झाले चक्र
पूर्णतळीरामाने सुचवले पुन्हा… बिनधास्त खा रे! ॥४॥
शेवटी... बुद्धच काय, बुद्धीपण हसली! ॥५॥
No comments:
Post a Comment