Tuesday, January 20, 2026

चारोळी

 

चारोळी माझी कधी खोल कधी उथळ

तर कधी शब्दांची अडगळ

तर कधी नुसतीच ध नी मा ची जोडगळ


कधी दाखवितो निसर्गाचे चक्र, वर्णून झाडांची पानगळ

तर कधी भासवितो पर्णरहिन वृक्ष अजागळ

जेव्हा वृत्तीत असते भरभरून मरगळ 


एकंदर काय, हे आहेत फक्त शाब्दिक गळ

विचारवंतांनी काढलाय केव्हाच पळ

हि चारोळी संपविण्यास गाठला आता वैचारिक तळ

गायछाप प्रेमी

 वैधानिक चेतावनी - तंबाखू सेवन सेहत के लिये हानिकारक हैं.. केवळ गम्मत म्हणून 

================

करावे नेहमी तंबाखूचे सेवन

बहूगुणकारी असे हे व्यसन

तोंडास राहते कुलूप

जगण्यास येतो मस्त हुरूप

Monday, January 19, 2026

कलियुग

कुत्र्याला घातले कपडे

अनं लोकं फिरतात आहेत नागडे

internet गुरु सांगतात शोधा देवाला 

internet गुरु सांगतात शोधा देवाला 

देव तुमच्यातच आहे. शोधा त्याला 

अन आम्हाला खिशातली घराची किल्लीही न सापडे

Sunday, January 18, 2026

चहा प्रेम


झाली सकाळ, हवा चहा

झाली दुपार , हवा चहा 

झाली संध्याकाळ, आता तर चहा हवाच 


आले काका, काकू , हवा चहा 

आले मामा, मामी, आजी आणी अजोबा, हवा चहा

आले पाहुणे, आता तर चहा हवाच


करु या नाष्टा, मस्का पाव, जोडीला हवा चहा 

भरपेट झालं जेवण, तसं जरा जास्तच, हवा चहा

भूक लागली, केले पोहे, आता तर चहा हवाच


हवा कुंद,  हवा चहा 

वारा वाहतो मंद,  हवा चहा 

सुटलं वादळ, आता तर चहा हवाच


पडलं ऊन, भाजले भुट्टे, हवा चहा 

वाजली थंडी, पेटवली शेकोटी, हवा चहा 

आला पाऊस, केली भजी , आता तर चहा हवाच


काम वाढलं खुपच, हवा चहा

आज सुट्टी, हवा चहा

कट्ट्यावर बसून मारायचा सुट्टा, आता तर चहा हवाच


सहकारी कर्मचारी करी चर्चा, हवा चहा

रस्त्यात भेटला मित्र, हवा चहा

भेटली मैत्रीण, तिला तर चहा हवाच 


काही तरी वाचावं, हवा चहा

काही तरी लिहावं, हवा चहा

करतो चारोळी, आता तर चहा हवाच

ईती चहाप्रेमी कवी उवाच 

Friday, January 09, 2026

उन्माद

शिखर कितीही असले उत्तुंग

त्याला आभाळाचे असते तुरुंग

कुणावरही कधीही येऊ शकतो कुठचाही प्रसंग

उगीच नाचू नये गुडघ्यास बांधून अर्धे बाशिंग 

सत्संग

सतत करावा सत्संग

करा किर्तन, वाजवूनिया टाळ नी मृदंग 

परमात्म्याच्या भक्तीत सदा दंग

अनुभवा निसर्गाचे विविध रंग

Monday, January 05, 2026

Times Square

वेळात वेळ काढून

गाठला वेळेचा चौक

चौकात होती हि भाऊगर्दी

गर्दीतही एकटाच होतो ना भाऊ

चलचित्र

 यावरून आठवलं .. 

लहानपणी सचिन अजयला म्हणला चल चित्रं पाहू .. सचिन तडक विकास बोलपट गृहात पोहचला .. अजयआपला घरीच वाट पाहतो - सचिन कधी येतो ते आणी सचिन तिकडे वाट पाहतो आहेमग सचिन अजयच्या घरीपोहचला आणी त्याने अंजली खडसावून विचारलं - अरे मित्रा कुठे होतास ईतक्या वेळ .. बोल पटकन बोलपट गृहात का नाही आलास -  मला म्हणालास ना चलचित्र बघू .. 


अजय.. अरे मित्रा, मी म्हटलं चल चित्र पहायला .. चलचित्र पहायला नव्हे.  मी केव्हाची वाट पाहतो आहे , संग्रहालयात सारंग केव्हाच पोहचला .. त्याची चित्रं बघून झाली सुध्दा. 

लुंगी

ती म्हटली, आज रविवार 

बनवते ईडली वडा आणी दोसा

दोसा खाता खाता, सांडलं गरम गरम सांबार

ती म्हटली .. बदला लूंगी 

मी बदलली लगेच..