Sunday, January 18, 2026

चहा प्रेम


झाली सकाळ, हवा चहा

झाली दुपार , हवा चहा 

झाली संध्याकाळ, आता तर चहा हवाच 


आले काका, काकू , हवा चहा 

आले मामा, मामी, आजी आणी अजोबा, हवा चहा

आले पाहुणे, आता तर चहा हवाच


करु या नाष्टा, मस्का पाव, जोडीला हवा चहा 

भरपेट झालं जेवण, तसं जरा जास्तच, हवा चहा

भूक लागली, केले पोहे, आता तर चहा हवाच


हवा कुंद,  हवा चहा 

वारा वाहतो मंद,  हवा चहा 

सुटलं वादळ, आता तर चहा हवाच


पडलं ऊन, भाजले भुट्टे, हवा चहा 

वाजली थंडी, पेटवली शेकोटी, हवा चहा 

आला पाऊस, केली भजी , आता तर चहा हवाच


काम वाढलं खुपच, हवा चहा

आज सुट्टी, हवा चहा

कट्ट्यावर बसून मारायचा सुट्टा, आता तर चहा हवाच


सहकारी कर्मचारी करी चर्चा, हवा चहा

रस्त्यात भेटला मित्र, हवा चहा

भेटली मैत्रीण, तिला तर चहा हवाच 


काही तरी वाचावं, हवा चहा

काही तरी लिहावं, हवा चहा

करतो चारोळी, आता तर चहा हवाच

ईती चहाप्रेमी कवी उवाच 

No comments: