Wednesday, April 01, 2026

गण्या

 

गण्या डॅाक्टरांकडे गुलाबाचं चित्र घेऊन जातो

डॅाक्टरः हे काय?

गण्याः रोज काढलय

डॅाक्टरः बरं मग? 

गण्याः प्यायचं काय?

डॅाक्टरः म्हणजे?

गण्याः काल घसा दुखतो, म्हणून आलो, तेव्हा तुम्ही म्हणे - रोज काढा प्या. रोज तर काढलं, आता पिऊ कसं? 

गण्या

 डॅाक्टरः कॅाफि सोडा, चहा सोडा, दारु सोडा

गण्याः दारु सोडा चालेल

घनचक्कर

एक होता घनचक्कर,
तो मारायला गेला चक्कर.
चक्कर मारता मारता आली त्याला चक्कर,
नेमकी तिथेच झाली तिचीही गाडी पंक्चर.
अन् झाली दोघांची थेट टक्कर,
टकराटकरीनेच सुरू झाले त्यांचे चक्कर.
ब्रह्मांडानंच बनवले दोघांना आयुष्यभराचे घनचक्कर!