Thursday, June 06, 2013

Communication Gap

माझ्या मनातलं तिला कळेना
तिच्या ओठातलं मला कळेना
कळवळून विचारलं मग एकमेकांना
बहिरा मी कि मुकी तू?

स्वच्छंदी कवी

होता एक स्वयंघोषित कवी
करीतसे रोज एक कविता नवी
कधी शब्दरुपाने कल्पना फुलवी
तर कधी धुसमुसता त्रागा शमवी
कधी गमतीदार  परीक्षण ऐकवी
तर कधी उगाच यमकं जुळवुन फसवी

Wednesday, June 05, 2013

सल

मनातलं दुःख जितकं खोल
चेहऱ्यावरच हसु तितकंच  फोल
विचारांचा सांभाळायचा किती तोल
अरे मुक्या मना, तु मोकळ्या मनाने बोल

Sunday, June 02, 2013

आडमाप योगा

सकाळी उठताच जबरदस्त केला योगा
आता कंबरर्दुखीची फळं भोगा

Wednesday, May 29, 2013

चहाच्या कपातली वादळं

नवऱ्या बायकोचा स्वभाव लग्नातच मिळतो आंदण
घातले जरी मग कितीही विचारांचे कुंपण
अधूनमधून होणारच कि हो भांडण
तेच निरंतर संसाराचं वंगण

साठी बुद्धी नाठी

जगावं  फक्त स्वत:साठी
मरावं फक्त दुसऱ्यासाठी
कळेपर्यंत उलटून जाते साठी
म्हणूनच बुद्धी फारच नाठी

illusion

पत्त्याचा महाल, रचिला स्वप्नात
डोक्यात भरला राग, विसकटून टाकला क्षणात
इतके वर्ष जगलो फक्त भ्रमात
खरतर मी मरतच होतो रोज आरामात 

कपातली वादळ

सतत भांडण तंटा, डोक्याला कटकट
सगळेच असतात थोडेफार हेकट
मीच मांडलाय हा पट
तरी का होते उगाच - आदळआपट
परिस्तिथी होतेय फारच बिकट

 

Tuesday, May 28, 2013

(वेड्याचे) मनोगत

निशब्द: शांतता
बोलू लागली माझ्याशी अचानक
सगळ्यांचेच किस्से
मुकेपणीच ऐकवू लागली मला नाहक

तेव्हा पासून माझं छान चालु लागलं
आयुष्याच गुपितच जणू मला कळू लागलं
तर लोकं म्हणू लागले -
अरेरे! याला तर वेडच लागलं

सध्या मी गडबड गोंधळातही, शांत असतो
कारण मुकाटपणे मी फक्त ऐकत असतो


Thursday, May 23, 2013

असंबद्ध संबंध

मी चहा केला,  तर तिला हवी कॉफी
मी पोळ्या केल्या, तर तिला हवा भात
मी कविता केली, तर तिला हवा निबंध
अरे काही आहे का नाही धरबंध
कलात्मकतेचा नाही काहीच गंध

Wednesday, May 22, 2013

घराची आकांक्षा

अनेक आकाशगंगा
त्यातली एक सूर्यमाला
त्यात सुर्य अनेक

त्यातल्यातला एक सुर्य
त्याभोवती फिरती ग्रह अनेक

त्यातली एक पृथ्वी
त्यात देश अनेक

त्यातल्यात एक भारत
त्यात राज्य अनेक

त्यातल्यात एक महाराष्ट्र
त्यात  जिल्हे अनेक

त्यातल्यात एक पुणे
त्यात घरे अनेक

त्यातल्यात एक घर
एकच माझं घर, छोटंसं घर
त्यातच भरलं माझं उदर


प्राण्यांची ओळख

विंचवाची ऎट भारी
नांगी वर करतो घालून धाक चाव्याचा विषारी
सापाची ऎट भारी
पायाविना पोहचतो घरोघरी, असते दुधाची न्याहारी
खेकड्याची ऎट भारी
तिरप्या चाली ने चढतो कड्या कपारी
पालीची ऎट भारीभिंतीवर निपचित चिकटते, दिसताच आणते किळस भारी
मांजरीची ऎट भारी
आडवी येताच, अडले काम- करा नारायण हरी

जोडीदार

कुत्रीला आवडतो कुत्राच
मिळूनच फुंकतात उकिरडा

म्हशीला आवडतो रेडा
असला जरी तो काळा

तसच, तुला फक्त मीच
अन मलाही मला फक्त तूच




Junglee

सोडून जंगलाचे दुकान
निघालो मी Amazon च्या ढगात
गिऱ्हाइकांच्या थेट खिशात घालून हात
तपशील दाखवणार वेगवेगळ्या पावत्यात

Junglee.com  तात्पुरता टाटा!

बायकोची विनवणी

प्रिये, तुच माझी खरी गरज
सतत करेन तुझ्या नावाचा गजर
दिमतीला तुझ्या नेहमीच हजर
सेवेस राहीन अतिशय तत्पर



Saturday, May 18, 2013

कौटुंबिक पिसारा

एकट्याला एकटेपणाची सोबत असते
तरी तुझ्याच सहवासाची गरज भासते
आपल्या दोघात जरी तिसऱ्याची  होते फारच गर्दी
दोघांचेच तरी करू चारचौघे अन फुलवु पिसारे आनंदाचे

 

व्याभीचार कि कुटुंबवत्सलता

एकट्याला एकटेपणाची सोबत असते
तरी तुझ्याच सहवासाची गरज भासते 
आपल्या दोघात तिसऱ्याची  होईल फारच गर्दी
तसल्या तिसऱ्यापेक्षा, करू दोघांचेच चारचौघे
फुलवु आनंदाचे पिसारे

चले चलो

आयुष्यात सातत्य फक्त एकच
जन्मापासुन मृत्युकडे वाटचाल सतत
जरी तुम्ही रंगवली उज्ज्वल भविष्याची स्वप्ने अमाप
किंवा घुटमळलात दुखा:ने आठवणींच्या  चिखलात
ती वाटचाल ना घेते वेग ना मंदावत
का बघा मग वळून मागे?
वा करावी घाई जाण्याची पुढे? 

Friday, May 17, 2013

आनंदाची पोळी

तिच्याकडे बघताच डोळ्याचं फिटलं पारणं
तिच्यामुळेच आता मिळालं जगण्याचं कारण
प्रेमापोटी तिच्या माझं चालतं सतत जागरण
कधी देईल ती मला पोळी भरून आनंदाचं सारण



 

Sunday, May 12, 2013

रविवारची वामकुक्षी

मुग्धा माझी खरोखरच अन्नपूर्णातिच्याहाताचं जेवून मी बनतोय कुंभकर्णा

दुपारची झोप रात्रीचा त्रास

दुपारच्या झोपेने केले रात्रीच्या झोपेचे खोबरे
दुपारी काम करून रात्री झोपलेलेच बरे 

Saturday, May 11, 2013

स्वच्छंदि

जगात खरे नियम असतात फारच थोडे
अपेक्षांच्याच ओझ्याने दमतात सगळे घोडे
अपेक्षांच्या या साखळदंडास तोडावे कसे
न होता निर्दयी, निर्ढावलेला, बेदरकार

Friday, May 10, 2013

चाकोरी

विचारात तोचतोच पणा
कृतीतही  तोचतोच पणा
परीणामत: फलश्रुतीतही तोच तोच पणा

फुकट सल्ला क्र. ३

कल्पना असतात अनेक
विकल्प साकारण्याचे त्याहुनी अनेक
संकल्प करा फक्त एक
गुपित हेच यशाचे प्रत्येक

फुकटचा सल्ला क्र. २

अमर्याद विचारांना
मर्यादित कृतीची जोड देण्यापेक्षा 
मर्यादित विचारांना
अमर्याद कृतीची जोड जास्त फलदायी


 

ऋतूचक्र

अंगणातला गुलमोहर
वसंत येताच बहरतो
निसर्गाचे नियम
न चुकता पाळतो



सुखी नवरा


भेटताच तुला झालो मी संतुष्ट
उरलंच नाही, करण्यासारखं काही आता
उगाच करवतेस का काबाड कष्ट
प्रेमानेच होतो आहे मी धष्टपुष्ट

Bad apple

कधी कधी कळपात असतो एखादा घाणेरडा
वृत्ती कुत्सित, तर कधी संस्काराने तोकडा
ओळखावा पटकन स्वभाव भिकारडा
जाण्या आधीच विश्वासाला तडा

कलियुग

रंग बदलणारा, एकटाच नाही सरडा
सगळेच करू बघतात झेपेल तेवढा राडा
भरेल तेव्हा भरेल पापाचा भरला घडा
विश्वासालाच मारताय तडा

उंबरठा

               उरला नं आता कुठचाच उंबरठा
               सगळीच कडे पसलाय उकिरडा
 (प्रेमाचा) ओलावाच पडलाय आता कोरडा
               कळवून फोडला हंबरडा
 

निरीक्षण


कोणाच्या मनात काय
ते कधीच कुणाला कळत नाय
कधी कुणी वरून दिसत गरीब गाय 
तर कुणी असतं आतुनच भित्री गाय




Thursday, May 09, 2013

मुक्ती

जगताना केला इतका भांडणतंटा 
मेल्यावर तेरी सुटेल का हा गुंता
चितेवर देखील करितो हिच चिंता
मेल्या, पिंडास शिवेलच कसा कावळा

मेलेले उंदीर

कवीमन  झाले बेचैन, सैरभैर
क्षणात उतरविले शब्द गंभीर
मन आता कोलमडेल कधीही
नाही ते आता तितकेसे खंबीर
सगळेच मेले, पिपातले मेलेले उंदीर 

अर्धवट

माझी बेचैनी तिला समजेना
तिची चैन मला परवडेना
तिच्याविना आयुष्य गेले
काही केल्या पिंडास कावळा शिवेना

Wednesday, May 08, 2013

फुकट सल्ला क्र. १

शुल्लक कामे अनंत
काढा त्यातूनच उसंत
जगा आयुष्य निवांत
तरच खरे तुम्ही श्रीमंत 

Weekly special

Monday la मटकीची उसळ 
Tuesday ला तोंडल्याची भाजी 
Wednesday ला वडे 
Thursday ला थालीपीठ 
Friday ला फणसाचे गरे
Saturday ला सात्विक साधवरण भात
Sunday ला  सांजा 

Monday, May 06, 2013

मुक्त

मनाला सोडलं मोकळं
तर गेलं भरकन उडून
बांधून ठेवलं स्वतःजवळ
तर बसलं एकदमच रुसून

गुंता

तिच्या आठवणीत गुरफटत गेलो 
गुरफटता गुरफटत  आतल्याआतच फाटत गेलो
ठिगळाच्या कापडात आता पदरचच हरवून बसलो

Return to innocence

निरागसपणा सोडून म्होठं होणं म्हणजे मागासणच नव्हे का?
---------------------------------------------------------------------------------
जरी लहानपणी म्होठं व्हावं वाटायचं 
तरी म्होठेपणी लहान का व्हावं वाटतं ?

जितकं जितकं आयुष्य पुढे जात जातं
आठवणी तितक्या तितक्या मागे का जातात?



Saturday, May 04, 2013

चहा प्रेमी

दे दे मुझको एक कप चाय
प्रिये, धरतो मी तुझे पाय
पण please म्हणु  नकोस नाय
चहा सोडून मी पिणार तरी काय?

अभिव्यक्ती

जाणवलं म्हणून सुचलं
सुचलं म्हणून लिहिलं
लिहिलं म्हणून वाचलं
वाचलं म्हणून समजलं
समजलं  म्हणून जाणवलं
जाणवलं म्हणून जपलं
जपलं म्हणून आयुष्य संपलं तरी  प्रेम उरलं

Tuesday, April 30, 2013

माकडाची श्रद्धा

एक होते माकड
देवालाच घातलं  त्याने साकड
म्हणाला तूच बंद कर अंधश्रद्धेचे भाकड
का लपतोस सारखा मूर्तीत बनून दगड ? 

Sunday, April 28, 2013

रविवारची धुणीभांडी


आजूबाजूला पडलीयेत दगड्धोंडी

सगळीकडूनच झालीये कोंडी
उत्तर सापडेना कुणाच्याच तोंडी
जीव येऊ लागलाय आता रडकुंडी

असावी अशी एक जादुचीच कांडी
अदृश्यच होऊन कामाला मारता येईल दांडी
कधीच घासावी लागू नयेत  न कुणाला भांडी
आनंदाने खाऊ फक्त उकडलेली उंडी

Sunday, April 21, 2013

शेणाचा सडा

ओलावाच पडला कोरडा
कळवून भोडला हंबरडा 

विश्वासाला गेला तडा
पापाचा भरला घडा 

Saturday, April 20, 2013

कधी कधी

कधी कधी एकटेपणाचा देखील एक आगळाच सहवास असतो
अन कधी कधी सहवासात पण वेगळाच एकटेपणा असतो
         कधी कधी दुराव्यातून सहवास वाढतो
         अन  कधी कधी सहवासामुळेच दुरावा  वाढतो
कधी कधी गप्पामध्ये एक उघड अबोला असतो
अन कधी कधी तर अबोला देखील खूप काही बोलून जातो
        कधी कधी भावना व्यक्त करण्यास महाकाव्यदेखील अपुर पडतं
       अन कधी कधी अपुरी कविता देखील पुरून उरेल इतकं देऊन जाते 


Saturday, April 13, 2013

टुमदार घर

असावं  असं एखादं  टुमदार घर
त्याभोवती रम्य परिसर
आल्हाददायी एखादी हवेची झुळूक
तर कधी  टिपटिप पावसाची सर

असावं  असं एखादं  टुमदार घर
क्लेशदायी आठवणींना पडावा विसर
क्षणोक्षणी देऊन नव्या अनुभवांना अवसर
भुतकाळाला देऊन नेहमी साक्ष,
वर्तमानात राहो सतत हजर

असावं  असं एखादं  टुमदार घर
रहावं खुशाल न करता काटकसर
न वाटावा कुणास मत्सर
प्रत्येकाच्याच जीवनात यावा असा बहार

 असावं  असं एखादं  टुमदार घर
वातावरण बाहेर कितीही सैरभैर
गर्दी वादळ अशक्य गोंगाट
झोप लागावी घेताच अंगावर चादर

असावं  असं एखादं  टुमदार घर
…. 

Monday, April 08, 2013

लपंडाव

मनात दडून बसलेल्या भावनांना
शब्द कधी कधी देतात अचानक धप्पा
छान रंगतात मग मस्त गप्पा
असतील ऐकणारे जरी अण्णा  किंवा अप्पा 

Empty Vase

रिकाम्या मनात रंगतो
निरोद्योगी भातुकलीचा किस्सा
रिकाम्या भांड्यातच करता येतो कि
चहा, बासुंदी, आणि मस्त मासोळीचा रस्सा

गोंधळ

मनात नव्हतं तर ओठांवर आलाच कसं
ओठांवर येण्याआथीच तिने ओळखलंच कसं
तिने ओळाखलं म्हणून, ते भिनू लागलं मनात
मनात आता ती , म्हणून तिचं  नाव सतत ओठात 

चर्चा

निरर्थक बडबडी मध्ये असतो का काही अर्थ
विचार असा करून संपर्क तोडल्यास होतो अनर्थ
बोलत रहावं , ऐकत  रहावं , जरी वाटलं  ते व्यर्थ
कधी अचानक मुद्दा महत्वाचा एकून चर्चा होते सार्थ 

Saturday, March 30, 2013

संपर्काचे माध्यम

पत्रापेक्षा फोन बरा फोन पेक्षा "ई-मेल" बरा
"ई-मेल" पेक्षा "SMS" बरा
"SMS" पेक्षा "FB Updatech" बरा
पूर्वी  कळावे लोभ असावा
आता आवडलं तर "Like" करा
नाही तर  इग्नोर करा
 

देशांतर

अंतराचा काय इतका प्रभाव असतो
विरहाने काय रक्ताची नातीदेखील  विरत जातात
मीच माझा बाबा होतोय
मीच माझं  बाळ  होतोय
इतर व्यक्तींशी नाती सुटत जाताय माझ्यातच मी प्रेमाचा अलोवा शोधतोय
कुटुंबात राहून देखील कुणी कसं इतकं  परकं होतोय
संदर्भ बदलले कि सगळचं  कस बदलत जातंय
कोण आप्त कोण परके कळेनास होतंय

Break

चहाची जमत नाहीये भट्टी
शब्दांनी देखील केली कट्टी
कवितांना सध्या आहे  सुट्टी
FBवर सध्या फक्त जमवणार मित्रांशी गट्टी 

Sunday, March 24, 2013

अव्यक्त


मत हेतु शंका कुशंका
शब्दरुप िमळताच वाजवतात डंका
मनातल्या दरीतच त्यंाना कोंडा
या चारोळीला ना बुडखा ना शेंडा
तुम्हीच ठरवा!

Saturday, March 23, 2013

शोध

शोधता शोधता काय हरवलं हेच विसरलोय
असलेलं  देखील आता हरवत चाललंय
हरवलं तरी चालेले अश्याच गोष्टी आता जमवतोय 
शोधण्याची आता गरज नाही, हरवण्याची आता चिंताच नाही
फक्त गोळा करत जातोय
हाच माझाच मला लागलेला शोध लोकांसमोर बरळत जातोय 

Friday, March 22, 2013

Weekend cleanup

आला आला शुक्रवार 
ऑफिस मधून लवकर पसार
वीकेंडला आणणार आहे मी मस्त बहार
करून घरघुती साफसफाईच्या जबाबदारीचा स्वीकार

कॉफी & टि

कॉफी ची किमया भारी
एकच कॉफी तिच्याबरोबर
आयुष्यभरासाठी वसवली घरदारी
चुकवत  चहाच्या कपातली वादळ
आता पितो फक्त टि

Thursday, March 21, 2013

परीकथा

उद्वेगाने मारली नदीत उडी 
बुडता बुडता
पैलतीरी दिसली ती सुंदर परी
नवा आवेश संचारला उरी  
जगतो मी आता होऊन एकदम निर्धास्त
ठेवतांना तिची उत्तम बडदास्त  

जीवन बरखास्त

जपून, राखून, अर्धवट
जगतो मी करून काटकसर
ना भिडत भीती ला बेधडक
ना कवटाळत प्रेमाला बिनधास्त
धास्ती घेऊन, मोजून मापून जगण्यापारी
करुनच टाकावे का हे जीवन बरखास्त


बेजबाबदार

पूर्वी होती हिरवीगार  वनराई
त्यातच होऊ लागली  मानवाची भरभराट 
सिमेंटच्या जंगलात आता झालाय वाहनांचा सुळसुळाट
दूरदृष्टी न बाळगून त्यानेच लावलीय  सृष्टीची वाट

निसर्गानेच म्हणे केली कुचराई
इंधनाची टंचाई म्हणूनच वाढते महागाई
व्यग्र असतोस फक्त साधण्यात सुख सोई
मानवा, आता तरी  घे जबाबदारी
का करतोस अजून दिरंगाई?

नवलाई

महागाईने जाणवते धनाची टंचाई
धनाची टंचाई लावते नोकरीस आई 
बाळ  एकटे घरी करते गाई गाई
हिच म्हणे आधुनिक कुटुंबाची नवलाई

Wednesday, March 20, 2013

अनपेक्षित - डोक्याला Shot!

अनपेक्षित असं काही घडतं अचानक
उपेक्षित राहतो काही समाज हकनाक
जगरहाटिचे नियम खरोखरच खतरनाक
कोण कापेल भामट्या शूर्पणखेचे नाक 

Monday, March 18, 2013

केलंच नाही तर घडणारच कसं?

पेरलच नाही तर उगवणारच कसं
उगवलं नाही तर उपभोगणारच कसं
उपभोगलं नाही तर भोगणारच कसं
भोगलंच नाही तर जगलातच कसं
जगालाच नाही तर मरणार तरी कसं 
मेलाच नाही  तर स्वर्गात जाणार तरी कसं

जीवनगाडे

रूळ असतात समांतर
म्हणूनच तर चालते गाडी जोरात
पडले दोघात थोडेसे जरी अंतर
कोलमडते गाडी क्षणात 

अनोळखी ओळख

अनोळखी
================
ओळख होण्यापूर्वी
प्रत्येकच व्यक्ती अनोळखी असते
त्यात विशेष काय?
पण ओळखीची व्यक्ती
अचानक अनोळखी वाटू लागणं
अश्चर्यकारक नाही का?
नुसतं ओळख होऊन चालत नसत
ओळख पटणं आवश्यक असत


गुपचिळी


श्रोत्यांनीच करावी अशी चारोळी
बसेल आमची दातखिळी
लाऊन घट्ट बचळी 

बसेन मी गुपचिळी
 

Friday, March 15, 2013

असही -- तसही

म्हटलं  तर असं , नाही तर तसं
हेही खरं, तेही खरं
हे बरोबर, तर म्हणे तेही बरोबरच
निव्वळ एका तापाच्या वनवासानंतर,
नंदी  बैलापारी डोलावत मान
युधिष्ठीरहि  म्हणतो मग  "नरोवा कुंजरोवा"

Thursday, March 14, 2013

आज काल च उद्या

उद्याची गोष्टं आज नको
आजची गोष्टं उद्या नको
आत्ताच्या आत्ता ईथल्या ईथे
ना थोडं मागे ना थोडं पुढे

निसर्गाचे नियम

फुल कोमेजलं
             त्यात रोपट्याचा काय दोष?
रोपटं निःप्राण धरणार तरी किती तग
            जेव्हा पावसाविना जमिनालाच पडतो तोष
निसर्गाचेच हे नियम सारे
            का धरावा माळ्यावर रोष
या सगळ्यात खरं  तर देवाचाच दोष 

Wednesday, March 13, 2013

चारोळ्यांना द्या ब्रेंक

चारोळ्यांना मिळेनाशी झाली दाद
सोडवा म्हणतो कवितांचा नाद
कराव्यातरी कितीतरी फेसबुक्च्या पोस्ट बरबाद
अती मनोरंजनाने  होतं  अजीर्ण हे सत्य निर्विवाद  


जित्याची खोड

सापाने कितीही जरी टाकली जुनी कात
यमदूत दडूनच रहातात त्याच्या विषात
टवळीने जन्म:ताच कोरलंय भाकीत कपाळात
मरेपर्यंत आता खोड काही नाही जात

कॉम्पुटर मध्ये वसते लक्ष्मी

सध्या:
 कॉम्पुटरे मध्ये वसते लक्ष्मी,  क्रोम मध्ये सरस्वती ।
किबोर्ड स्थिता गौरी, मंगलम कॉम्पुटरदर्शनम् ॥१ ॥
====================
पूर्वी:
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती ।
करमूले स्थिता गौरी, मंगलं करदर्शनम् ॥

Tuesday, March 12, 2013

पतंग

यशाच्या  पतंगाला उडवण्यासाठी
सुरुवातीला लागतो  संधीचा वारा

नंतर द्या ढील परिश्रमांच्या मांज्याला,
सोडून सैल फिरकी चिकाटीची

 

Saturday, March 09, 2013

सात्विक वृत्ती

आत्म्यास तुरुंग शारीरिक
मनास तुरुंग भावनिक
बुद्धीस तुरुंग वैचारिक
शरीरास तुरुंग भौतिक

केलीत जरी  पापं
ठेवा वृत्ती सात्विक

समजलं तर मार्मिक
नाहीतर फक्त गम्मत शाब्दिक  

बकरा

जोशींनी सोडला फर्मना
लवकर आता आवरा
वीकेंड पडतोय अपुरा
गलांडेनि केलाय सपशेल बकरा 

कर्मकांड

Disclaimer:  
उमजलं ते लिहिलं
हेतुपूर्वक नक्कीच नाही रचलं
भावना दुखवायचा नाही माझा कल
मी असंच आपलं
फक्त मत एक मांडलं

 ------------------------------------------

कुणास ठाऊक, कधी काळी
कुणी कोणास म्हंटले
बघा  मूर्तीतच देव
तेव्हापासुन धर्मांचा
समाजाला खूपच चढलाय  चेव

कुणास ठाऊक, कधी पासून
प्रत्येकजण स्वत:लाच अपरिचित
ओळखणारच  कसा तो
कुढल्या दगडात कुठचा देव
असला सारासार विचार बाजूला ठेव
वाढूदेत अन्धश्रध्येचे असेच पेव  

कुणास ठाऊक, कशी काय
कुणाला सुचली इतुकी कमाल युक्ती
म्हणे करा फक्त थोडी भक्ती
त्याजोडीला दक्षिणेची सक्ती
तरच मिळेल तुम्हाला  मुक्ती

कुणास ठाऊक,  कसं काय
पण घडतंय अघटीत
गंडवती मंडळी ठोकून थापा बिनभोबाट
सगळेच जाणार म्हणे  नरकात सुसाट
कुणी म्हणे, आत्म्यास लाभला तुरुंग शारीरिक
कर्मकांडातूनच म्हणे गवसेल काल्पनिक स्वर्गाची वाट 
कधी बंद होणार असले चर्हाट
केव्हाचे आलोय आता २१ व्या शतकात

माहेरचा आहेर

सासूच्या माझ्या नाव चंदा
साठी ओलांडली तरी
सतत करायचा असतो तिला काम धंदा

शाम माझा सासरा
भारतात, करून सोय गाडीची
केला त्यांनी चिंतेचा निचरा

नचिकेत माझा साळा
अजून तो आहे लहान बाळा

मुग्धाच्या माझ्या मस्त आहे माहेर
हाच माझा लग्नातला अनमोल आहे

जोशी-गलांडे गम्मत

प्रतिभा माझी आई
प्रभाकर माझे पिता
आर्शिर्वादाने त्यांच्या
सुरवात करतो आता ॥१ ॥

यमके जळवून रचण्यासाठी चारोळी
प्रसन्न देऊ लागला शब्दांना बळी
वाचुन दिपाची उत्तेजनार्थ
पाचोळी प्रसन्नची खुलली कळी
शुक्रवारच्या संध्याकाळी ||२॥ 

सुप्त श्रोत्यांनी फोडावी मस्त आरोळी
फेसबुकवर चला आता काढूया
शब्दांनीच रांगोळी 
रोज पितांना चहा सकाळी ॥ ३॥

==================

दिपा  गलांडे ची कविता

प्रतिभा तुमच्या कणा कणात,
सुचवी काव्य क्षणा क्षणात
असाल जरी संभ्रमात,
शोधताय अर्थ संसारात
गारठलात seattle च्या गारव्यात,
पण सांगताय गम्य व्यायामात
बघताय काय प्रतीबिम्बात,
सुर्य तो दिसणार कधी आपल्या आकाशात?
म्हणताय अडकलात काळाच्या प्रवासात,
तरीही आसक्ती तुम्हास आरंभीच्या क्षणात
कविवर्य, इतकेच राहूद्या लक्षात,
अडकू नका फार यमकात.

Friday, March 08, 2013

दारुड्याचं मनोगत

सोडल्या पासून अल्कोहोल 
आयुष्यात पडलंय  मोठ्ठं  होल
मस्त जरी असला माहोल
वाटतं एकदम फोल







Wednesday, March 06, 2013

थोडा गरम, थोडा नरम


काही थोडं, काही जास्त
घ्यावी मजा मस्त
आहे श्वास जोपर्यंत
बघा वाटतंय का तुम्हाला हे रास्त




ऐश्वर्या आणि अभिषेक


ऐश्वर्या म्हणली अभिषेक ला
असरे काय करतोस राजा
थोडी केली मी मजा
उगाच करू नको गाजावाजा
शेवटी तुझ्याशीच तर केलं लग्न
वाजवून सलमानचा बॅंड बाजा


Tuesday, March 05, 2013

अमान्य

सटवीने कोरलं म्हणून स्वीकारायचं
समाजाने अवहेरलं  म्हणून न्युनगंडास जोपासायचं
प्रेमाने सिंचलं नाही म्हणून तारुण्यातच कोमेजायाचं 
शरीराने खचलं  म्हणून मनाने ढासळायचं
मान्य नाही!

काळाचा प्रवास

काळाच्या प्रवासात क्षणांचं चलन लागतं
भविष्याकडे नेहमी वर्तमानातुनच जावं  लागतं
त्यासाठी भूतकाळाचं ओझं बाळगायचं  कारण नसतं
वर्तमानात्याला कर्तव्यदक्ष्येतेच भान फक्त पुरेसं  असतं


वटपौर्णिमा - सातच्या आत घरात

वडा भोवती बांधून फेरे सात
मी नाही पळून जात
नवऱ्यालाच घालीन पेकाटात लात
आला नाही जर तो सातच्या आत घरात

पुन्ह:च्य आरंभ

जित्याची खोड मेल्याशिवाय नाही जात
असा फक्त समजच आहे समाजात
करा नव्याने पुन्हा: सुरुवात टाकून जुनी कात
आयुष्य संपायच्या आत

संभ्रमित पुरुष

स्त्री म्हणते टाकू नका माझ्यावर डोरे
तीच स्त्री बांधते वडाभोवती दोरे
स्त्री सुरवातीला करते खूपच नखरे
मग वंशवृधीसाठी तीच बांधते गंडेदोरे
असं का? पुरुषमंडळी संभ्रमून विचारे  

थंडी

गुबगुबीत थंडीत झोपाल
तर होतील गाल गुबगुबीत
कडकडीत थंडीत कराल व्यायाम
तर व्हाल तुम्ही शिडशिडीत

व्यायाम

लुसलुशीत कोवळ्या थंडीत
गुरफटून झोपलो पांघरुणात
दणकून केला मग व्यायाम
त्यावेळी पडलेल्या स्वप्नात


सुप्रभात

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
आला सुर्य निळ्या आकाशात
दिवसांमागून रात्र, रात्रीमागून दिवस
चालते चक्र निरंतर
कामावाचून नाही गत्यंतर  

Monday, March 04, 2013

सूर्यप्रकाश

काळ्या ढगांमध्येच दडलेले असतं  निळं आकाश,
क्षणात पालटतं सगळं,
पडताच रवीचा प्रकाश
वाट पहा सावकाश
न होता हताश

Sunday, March 03, 2013

प्रतारणा


रक्त वाहे आता भळभळा
जीव माझा कळवळला
वेदनेने विवहळले न कधी तन
प्रतारणेने पार तुटले मन

वेडा मी, कि खुळी तू


वेडा मी, कि खुळी तू
-------------------------
वेडा वाटे मी तुजला
का तर म्हणे, जपे मी हृदयात तुजला
हृदयात त्याच  भोसकलास सुरा तू
प्रेमळ प्रतिमेस तुझ्या तडा दिलास तू
हुदयास माझ्या दु:खाने फोडवलास हंबरडा तू
असे हे विचत्र घडवलेस का तू
वेडा मी, कि खुळी तू

प्रेमाची उसळं

माझे मनं तुझ्याविना घुटमळं
शंका घेशी का तू, जरी मन माझे निर्मळं
वाट बघ थोडीशी अजून अंमळं
कळेल तुजला, प्रेमात माझ्या नाही भेसळं
प्रेमाने भरवशील तूच, मला मटकीची उसळं

रविवारची चारोळी

रविवारच्या सकाळी
प्रसन्न झाला रवी
चारोळ्या लिहून प्रसन्न
होऊ पाहतो आहे कवी 

Seattle madhala प्रेम

प्रेम असावं जणू Mount Rainier
निस्तब्ध, निश्चल, शाश्वत
दुरूनही दिसावं उठून ॥१॥
प्रेम असावं जणू Snoqualmie Falls
चंचल, अवखळ, स्वच्छंदी
सातत्याने वाहणारं, पुढे जाणारं, नेणारं  ॥२॥
प्रेम असावं जणू Space Needle
निष्कारण, निरुपयोगी
तरीही निरंतर अस्तित्व देणारं ॥३॥
प्रेम असावं जणू Rattlesnake Lake hike
कठीण, रम्य आणि
अंती आल्हाददायक ॥४॥

Saturday, March 02, 2013

निसर्ग

उन्हा तान्हात,
तर कधी, मुसळधार पावसात
नदी नाल्यात,
तर कधी, प्रशांत महासागरात
खोल दरीत,
तर कधी, उंच कपाऱ्यात
निष्प्राण भंगलेल्या मातीत
तर कधी, हिरव्यागार शेतात
निस्तब्ध तलावात
तर कधी, बेभान वावटळात
काळोख्या रात्रीत, अंधुक चंद्र प्रकाशात
तर कधी, पहिल्या प्रहरी तांबड्या सुर्य प्रकाशात

ज्याची प्रचीती येते, ते म्हणजे निसर्ग  

Friday, March 01, 2013

वाशी ची सासू

माझे सासंर वाशी
तरी आज मी उपाशी
कारण भाजीत पडली माशी
सासू म्हणाली खा पोळी तुपाशी
आता नाही मी  उपाशी
   

फलाहार

फलाहार
रोज खा संत्र
शरीरातील चालतील यंत्र
रोज खा सफरचंद
वैद्याकडे जाणे  बंद
रोज खा केळ
कंबर धरायची येणार नाही वेळ
रोज खा चिकु
तारुण्य राखाल केस जरी लागले पिकु
रोज खा ऊस
पाठीत भरणार नाही कुस
रोज खा काळी (black) लाल (Ras) बेरी
पडणार नाही कधीच आजारी
रोज खा निळी (blue) बेरी
तल्लख राहील स्मरणशक्ती गाठली जरी शंभरी 

प्रतिबिंब - डोक्याला shot

प्रतिबिंबास रागावतो मी
              प्रतिबिंबच रागावते मला
प्रतिबिंबास चिडवतो मी
              प्रतिबिंबच चिडवते मला
प्रतिबिंबास हसवतो मी
              प्रतिबिंबच हसवते मला

प्रतिबिंबानेच सोडले मला
            सोडवेना तरी प्रतिबिंब मला

स्वच्छंदी

स्वच्छंदी मनं माझे,
शुध्दीत असलो जरी
धुंदीत जगतो मी
बेधुंद होऊन आयुष्य
भोगतो मी