Sunday, March 17, 2019

Daylight savings

निसर्गानेच काळाला घातली गळ
थांब जरासा, सुरू झाली रे आज पानगळ
काळही थांबला मग, करत टंगळ मंगळ
घटीवत, पहाटेच आला रवी
क्षणार्धात सगळ्यांनी काढला पळ
झुगारून अंगातली मरगळ
नव्याने पुन्हा सुरु अविरत धावपळ

पण...

शाब्दिक घाव घण घण
मनपटलावर घोर व्रण
त्यातून खांद्यावर ओझे हजार मण
तुटतो जीव आतून, कण कण
तरी पण करू या पण
आजचा दिवसच खरा सण

खोडकर - it’s always day 1

नवी नवरी लाजरी गोजरी
आधीच कावरी बावरी
त्यातून थंडी बोचरी
कवेत आली येताच घरी

कुचकी उचकी

मारतसे मीच माझी फुशारकी
नाही कशाचीच मला बांधिलकी
मी पडलो जरी फारच एकाकी
तरी बरे लागते का सारखी उचकी?

Donation

Little dark but true in some cases. :
==
टाळूवरचे खाणार आम्ही लोणी
मागितलं तर देणारसुध्दा नाही आम्ही पाणी
दानशुरतेची आम्ही हक्काने वाजवणार पिपाणी
हिच खरी दुनियादारीची कहाणी

खा शीरा

स्वछंदाचे गुपित कळले जरा उशीरा
न ताणता मेंदूच्या शिरा
करावा मस्त शिरा
हाती लागताच रवा

अर्ध हळकुंड

गोष्टी खुपच खोट्यानाट्या
जणू पेन्सिलीच्या रेघोट्या
नाहीत तुमचे पापड पक्के
सध्याशी फक्त कच्च्या लाट्या
==================
Break out of limitations - happy dasara.

नशाबाज

मेंदुस देण्यास तरतरीत झटका
कधी खातो गुटका, कधी खेळतो मटका
मुक्ती मिळे दोन घटका
चैतन्यास माझ्या हवी वास्तव्यापासुन सुटका

TGIF: भरसटलेली प्रियसी & भरसटलेला प्रियकर

TGIF
=================
भरसटलेली प्रियसी
==================
त्यदिवशी तूच न हसतां गेलीस
सुखच माझं जणू ठेवलं ओलीस
रडून रडून शेवटी तूच भीजलीस
शेवटी तुच येऊन मला बिलगलीस
==================
भरसटलेला प्रियकर
==================
त्यदिवशी तू भूं भू भूकलास
सुखच माझं जणू घेऊन गेलास
रडून रडून शेवटी तूच भीजलास
शेवटी तुच येऊन मला बिलगलास

रक्ताभिसरण

भरताच ह्रदयात रक्त
क्षणात पसरवून देते
चालविण्यास देहास
रक्ताभिसरण हे लागतेच

घे भरारी

उडलेल्या पक्षांची पडली पिसे
बसल्या बसल्या त्यापरी आम्हीच सोडले ऊसासे
उडणारे गेले उडून
आम्ही राहिलो अडकून

प्रश्न

तिचा तिरपा कटाक्ष
तर कधी चोरटा स्पर्श
देतसे मना फारच हर्ष 
मंजुळ आवाज तिचा
लग्नानंतर का बरे वाटू लागला कर्कश?

एकटा

माझी अनुभूती माझ्यापाशी
माझं सुख माझ्यापाशी
माझं दुःख माझ्यापाशी
मीच नाही माझ्यापाशी

समजूत

पहा मी किती चतुर 
मीच मला होतो फितूर
सतत शमवतो मनातलं काहूर
न करता कुरबूर

द्विधा

पहा मी किती चतुर 
मीच मला होतो फितूर
शमवत नाही मनातलं काहूर
फाटूदेत ना हा ईवलासा ऊ

एकांत

नको तिटकारा, ना नको सोयरीक
एकलाच चालोरे, म्हणतो फकिर
सांभाळून घेईल तो,
त्यासी असेल आमुची फिकीर

द्वंद्व

मी नाहीच मुळी मोठा
मी फारच लहान 
मी आहे फक्त खोटा
स्वत:लाच म्हणतो महान

बांडगूळ

कण कण जमवून मी वाळू
बांधले होते छानसे वारुळ
भोवतालच्या मुंग्यामुंगळ्यांनाही देतसे गुळ
अचानकच सर्वच लागले खाऊ, बनूनी बांडगूळ 

भितभांडवल

भटजींनी केले दैवभितीचे भांडवल
पुढार्यांनी दैवत्वावर घडवली दंगल
देवस्थानं बांधण्यार्यांची मस्त चंगळ
देवापुढे मात्र समाज राहतो भोंगळ

बुध्दिजीवी

आम्ही म्हणे बुध्दिजीवी
करून फक्त अक्षर रचना
खुशाल देतो कुणासही शीवी
जतवून कोरड्या भावना

समिकरण

समिकरण जमवतां जमवतां 
समिकरण जमवतां जमवतां 
जीवन जाते संपून
घे जगून होऊनी मदमस्त
स्वत:चे श्वास देऊ नकोस कुणास
मोजूनी दाम स्वस्त
आयुष्याची असली जरी गोळाबेरीज शुन्य

BMC

खड्ड्यात शोधतोय रस्ते
उधारीच्या गाडीचे फेडतो हफ्ते
स्वप्नातच फक्त चघळतो थोडेसे पिस्ते
श्वासापरी आयुष्य झाले खुपच सस्ते

अबोला

खरं सांगवत नाही
खोटं बोलवत नाही
गप्प बसलो तरी
तुझ्यापासून काहीच लपत नाही

कंटाळा

कष्ट करून वाहिला घाम भळाभळा
उभ्या आयुष्याची झाली शाळा
तरी मेंदूला हवा सतत चाळा
रटाळ कामांना मारावा का टाळा
दिवस रेटायचा फारच आलाय कंटाळा

आंशिक आवारा, नवरा बिचारा

प्रेमापोटी तुझ्या पडत असे आजारी
नको नको त्या खातसे औषध गोळ्या
रात्रीबेरात्री नावाने तुझ्या मारतसे आरोळ्या
उंटावरून का होईना, हाकतसे खुप शेळ्या
त्या आठवणीही आता झाल्यात खुप शिळ्या
सध्या तुझ्यासाठी लिहीन फक्त ३-४ चारोळ्या
लटकवून खांद्यास पिशवी, जायचंय आता बाजारी

असंबध्द सत्य

ताक पाजून पाजून करठकास दिली ताकीद 
लवकर दे थकबाकी
नाहीतर या करांनीच ठोसे देईन नाकी
तो म्हटला मार बिनधास्त, पगार झाला खर्च
उरलच नाही काही बाकी

ताळ

अवतार जरी गचाळ
मी नाही वाचाळ
वृत्ती माझी जरी टवाळ
वर्तन माझे फारच मवाळ
स्वभावच मुळी माझा खट्याळ
नियम पाळणारच तरी काय- कप्पाळ!

कुपमंडूक

डुबुक डुबुक, मी कुपमंडूक
भागवण्यास तहानभुक
कुपातच मारतो ऊड्या
विसरून तहानभुक

पोखरण

सालोसे जो कठिन काम दुसरोने टाले
अटलजी वो आपने चुटकी मै कर डाले
स्वातंत्र्यके बाद पहिलीबार
सही मायने मे हिंदुस्थानीयोके होश संभले
पोखरण के आसमान जब गुंजने लगे

हिशोब

सतत करून आकडेमोड
करू नये स्वत:चाच हिरमोड
ओढता ओढता संसाराचे गाडे
जरी होत असेल कंबरतोड

उडणारे हत्ती

अंगणात बागडतात ससे
पाण्यात पोहतात मासे
आकाशात उडतात हत्ती
सगळे विचारती, असे कसे, असे कसे?

शिल्पकार

नियतीने देण्यापुर्वी दस्तक
स्वत:च लिहावे आयुष्याचे पुस्तक
होवून नतमस्तक 
सगळेच शेवटी त्याचे हस्तक

सारीपाट

का घ्यावा ताण तणाव, उगाच कटकट
जगून घे झटपट
नियती उधळेल क्षणात हा सारीपाट
करशील कितीही प्रयत्न आटोकाट
जपण्यास फुकटचा थाट

मुंबईकर

सतत धावते लोकल
त्यात प्रचंड कलकल
अनुभवण्यास मुंबईची खरी छलक
केला प्रवास, मी बनून स्वच्छंदी बालक

दुभंगलेला

आयुष्य झाले खडतर कठीण
बनुनी मीच माझा तोतया
ढकलतो रटाळ दिनचर्या
तोतया म्हणतो:
तो मी नव्हेच, तो मी नव्हेच
मी म्हणतो:
मीच तो, मीच तो - तोतया मीच

तोतया

मी गुंतलेलो माझ्यात, मी गुंतलेलो माझ्यात
तो म्हणला, अंतर आहे तुझ्यात नी माझ्यात
जरी मी तोतया, जरी मी तोतया
जगतो तुझेच आयुष्य, न करता गयावया
Fractured identities - watch it.

मुंबई ट्रेन

धड धडाड धड, 
खड खडाड खड,
धडधड खडखड, धडधड खडखड
लोकल डब्यांची अखंड बडबड

आशिक आवारा

मी आंशिक दिल फेक
शब्दांचेच देतो मी चेक
मला झेलणारी फक्त ऐक
चुकांना माझ्या सुधारण्यास
ती देते सतत टेक वर रीटेक

बोंबील

काटा रुते कुणाला?
मासा खाईल त्याला
हा खाद्ययोग आहे
काटा रुते कुणाला?

Greed

Sold the soul
For the sake of gold
Everyone told, it will be fun 
Alas - there wasn’t the sun 
Finally took the gun ... bang bang bang

आवारा आशिक

तुम रैह तो लेती हो मेरे दिल मै ईतने आसानीसे
फिर बाहो मै आने के लिये ईतराती क्यौ हो?
कहो तो, निकालदु तुम्हे मेरे दिलसे
कहो तो, निकालदु तुम्हे मेरे दिलसे
कहोगी फिर, कहोगी फिर ....
कमसे कम एकबार तो लगा लेते सिने से कसके

मानसिक पसारा

छेडल्या नव्याने ह्रदयाच्या तारा
भरताच पुन्हा पोटाचा नगारा
आयुष्यात कितीहा पसारा
आवरा पटकन, होण्याआधीच कचरा

उपाशी प्लंबर

नळीमध्ये नाही पाणी
उपयोग काय, लाऊनी तोटी
करणार तरी किती शाब्दिक कोटी
कोकलती कावळे, रिकाम्या पोटी
कधी मिळेल तूप रोटी

निवांत मन

विचार साधासा करतो सादर
करड्या मातीवर हिरवी चादर
पर्वतांवर हिमाचा पांढरा पदर
चंचल मानवाला निसर्गाची नाही कदर

हैप्पी वूमन्स डे

म्हणे स्त्री पुरुष समान
नवरा बसतो मूग गिळून गुमान
बिचाऱ्याच्या कंठास नाही फुटत वाचा
रोज रोज जरी जोर जोरात घेते ती चावा

ढकलगाडी

आजही सूर्य उगवला
आजही तो मावळणार
दिवसांचे रकाने किती काळ भरणार
स्वतःची स्वप्ने कधी साकारणार?


Friday, April 06, 2018

बाणा


================
विजोड मोजे
त्यांवर फाटके जोडे
तुडवत वाटेतले दगड धोंडे
गाडले अटकेपार आम्ही झेंडे

चिरतारुण्य

हाडंही होऊ लागली ठिसूळ
साखरेऐवजी चहांत पडू लागला गुळ
बचळी सांभाळावी लागतेय, भरतां भरतां चूळ
कधी जाईल डोक्यातलं खुळ
सतत आपली चुळबुळ चुळबुळ

अंतर

दोन क्षणांमधलं अंतर
चालवी जीवन निरंतर
बाकी सगळं जंतर मंतर
कळलं कि लगेच छू मंतर

काटकसर


====================
अंधरूण पाहून जर पसरले पाय
तरच खाता येते दूधावरली साय
नाही तर दूधाची तहान ताकावर
अन् जीभ भाजली म्हणून
ताकावरही मारा फूंकर

खुशाल चेंडू

साकारण्यास स्वप्नास, पसरूनी पंख, घे आकाशी भरारी उंच
स्वयंरचित पात्राची भुमिकाच गाजवते आयुष्याचा रंगमंच
दिवसामागून दिवस ढकलून बनत नाही आत्मचरीत्राचा संच
जमेल ते अनुभव घे, भरेपर्यंत पोट टंच

अनुगच्छति प्रवाह

सद्सद्विवेकबुद्धीचा जाणवतो दाह
किती करावा म्हणतो मी उहापोह 
अनुगच्छति प्रवाह, आयुष्य होई सुखावह

गंमत

====================
दारू, मदीरा मद्य पीत पीत
वाचावे गद्य, लिहावे पद्य, तर गावे मंजूळ गीत
मी नाही कोणाला भीत
मनात आलं की, करतो लगेच प्रकाशित

केळ

घालवू कसा वेळ
माकडाला आयतेच मिळाले केळ
सगळंच वाटू लागलाय निव्वळ खेळ
कशाचाच लागत नाही ताळमेळ

Wednesday, March 28, 2018

सुके बोंबील

=======================
ऐकण्यास तिच्या हुर्दयाचे ठोके
पत्करले तरुणाईत नको नको ते धोके
प्रेमापोटी तिच्या पाळलेहि  होते गलेलठ्ठ बोके
नशिबातच नव्हते तिच्याहाताचे बोंबील सुके
तर कशाला टाकावे फुकी उसासे?
मिटक्या मारीत मीच खातो मीच भाजलेले मासे 

Tuesday, February 13, 2018

ओलेचिंब

अनुभवले पावसाळ्यामागून पावसाळे अनेक
न घेतां एकही छत्री
भिजून, भिजून होईल सर्दी
नाही असली वृत्ती भित्री
भिजलीतरी सुकणार नक्की
हि नेहमीच असते पक्की खात्री
बरी होणारं सर्दी
खाऊ लागताच संत्री

चला थंडीची उडवूया टर

शनिवारच्या संध्याकाळी कोण पडली होती थंडी
मी घातला लोकरीचा मस्त स्वेटर
केला चहा ऐक लिटर
रिक्षावाल्याला म्हटलं टाक मिटर
तडक गाठ थिएटर
Watching movie, is certainly better
Than seating at home and सोलिंग मटर

तोकडा

शब्दसंग्रह मोडका तोडका
त्यातून जीव भाबडा
भावना व्यक्त करत करतां
मेंदूचा पडतो तुकडा

सर्दी

सर्दी खोकला, गोष्ट सोपी
हळद घालून दूध पी
छाती, पाठीवर Vick’s चोपी
घालून माकड टोपी
लवकरच जा झोपी

Anniversary special

जरी लग्नाला झाली वर्षे आठ
कधीच फिरवली नाहिस तू माझ्याकडे पाठ
असेच प्रेमाने सतत टेक ओठांवर ओठ
सुखात जातील तुझ्यामुळेच, पुढंली वर्षे साठ
दोघे मिळूनी सांगू मग सगळ्यांना, करून मान ताठ
लग्नाची खरोखरच असते पक्की गाठ

कपटी कागद

कागदांचेच आहेत हे कपटे
का करावे त्यासाठी कपट
नका बाळगू वृत्ती तापट
कागदांच्या कपट्यांसाठीतरी
उडूवू नये कोणाबरोबरच खटके

कागदांचे कपटे

कागदाची केली होडी, सोडली पाण्यात 
मजा आली थोडी
कागदाचं केलं विमान, उडवले हवेत
गेला अजून काहि काळ मजेत
कागदावर असच लिहून काहीतरी
खर्चून मी हक्काचे माझे कागद, छापले मीच माझे पुस्तक
चिंता नाहि आता, जरी काळाने दिली दारावर माझ्या दस्तक

सुट्टी

यंदाच्या सुट्ट्यांचा मस्त आहे बेत
काहींनी करावी कागदाची होडी, सोडावी पाण्यात
काहिंनी करावी कागदाची विमाने, उडवावे हवेत
ओरेगॅमीमध्ये वाटू लागेल गोडी, वेळ जाईल मजेत

निश्चय

चला करूया निग्रह
वर्तनात नको पुन्हा पुर्वग्रह
आपोआपच फिरतील ग्रह
यापुढे, फक्त चांगल्या क्षणांचाच (आठवणींचाच) करूया संग्रह

भेळ

भेळेचा बेत ऐकून सगळ्यांनाच येतो चेव
आंबटगोड चटणी, जोडीला चुरमुरे, तिखट शेव
कांदा, टमाटा, कोथिंबीर बारीक चिरून ठेव
जमलं तर ठिक, नाही तर
तयार भेळेच्या पाकिंटांच फूटलय कि पेव

अपूरे

मोकळ्या हवेतहि आता गुदमरतो जीव
माझीच मला येऊ लागली कीव

हिंसक प्रतारणा

कवटाळणारी प्रियसी तू
कवटाळता कवटाळता
का बरे लागलीस टाळू?
टाळके माझे लागले सणकू
मी माझाच मला अजून कितीदा भोसकू?

बेईमान

जरी मी कितीही दूर
आठवणींनी तुझ्या भरून येतो ऊर
हाक दे फक्त, हाक दे फक्त
येणार नाहीच, पण “ओ” देईन जरुर

आधुनिक जिवनशैली

दुभंगलेल्या मनात भंगलेले विचार
सतत चाकोरीबध्द दैनंदिन व्यवहार
जोडीला सुमार आहार
आजारी नाही पडणार
तर अजून काय होणार?

निसर्ग

नकोस मानवा रचू फुकट अवडंबर
जिथे, फाटताच डोक्यावरचे अंबर
वसुंधरेचीहि तुटते कंबर
बाळग वृत्ती थोडी सोंबर (somber)
निसर्ग क्षणात फासेल तोंडावर डांबर

तात्कळवणारा हव्यास

वाट पहातो घेऊनिया तळहातावर घेऊन शीर
हे नियती, अजून किती करशील उशीर
धरतां धरतां धीर, चाखण्यास खीर
जीभ होऊ लागली बधीर

मराठी भाषेतली गम्मत

==============
१) वाचा , चावा
२) कान , नाक
३) जीभ , भजी
५) चेव , वेच
६) चव , वच
७) चाट, टाच
८) कूच , चूक
९) चेप , पेच
१०) चार, रचा
११) पाट, टाप
१२) तवा, वात
१३) ....
==============

बाणा

विजोड मोजे
त्यांवर फाटके जोडे
तुडवत वाटेतले दगड धोंडे
गाडले अटकेपार आम्ही झेंडे

वावटळ

आधीच वृत्ती टवाळ
त्यात उठते वैचारीक वावटळ
जोडीला सतत शारिरीक धावपळ
कधी वाटते
बसल्या बसल्या फाटल्या चड्डीला लावावे ठिगळ
तर कधी वाटते
व्यामशाळेत जाऊन वाढवावे बळ
का सोडून सगळं
घेऊन माश्याचा गळ,
गाठावा थेट महासागराचाच तळ
अचानक डोक्यात भारीच खुळ
म्हणे वाजवत बसु मंजूळ शीळ
चुळबूळ तर कधी खळबळ
जोपर्यंत धमन्यात वाहते रक्त सळसळ
मनाला राहील सतत काही ना काही चळ

Saturday, December 09, 2017

बेधडक, दे धडक

गनिमत है जो मेरे फेफडे वफादार निकले
हर घडी सास लेकर, मुझे फिरभी जिंदा रखते है
बगावत तो मेरे धोकेबाज दिल ने की है
जो हरवक्त तुम्हारे लियेहि धडकता है