=======================
चित्रपटात माधुरी बरोबर अमरीश पुरी
जेवणात श्रीखंडा बरोबर तेलकट पुरी
बंदुकेच्या दुनियेत चाकू आणी सुरी
प्रत्येक गोष्टिंत असतेच मागे घेणारी दोरी.
तरी सुघ्दा पोरांना आयुष्यात पुढे खेचतातच पोरी
This blog is to say Hello to the world of Blogs :) Yeah, now i am going to get my thoughts across to you people out there even faster and efficient way. Hope you find this helpful and interesting.. Keep Blogging :)
=======================
चित्रपटात माधुरी बरोबर अमरीश पुरी
जेवणात श्रीखंडा बरोबर तेलकट पुरी
बंदुकेच्या दुनियेत चाकू आणी सुरी
प्रत्येक गोष्टिंत असतेच मागे घेणारी दोरी.
तरी सुघ्दा पोरांना आयुष्यात पुढे खेचतातच पोरी
तिरप्या नजरेने हळूच टाकलास तू गळ
कळलेच नाही, तु माझ्या ह्दयात ठोकला तळ
तुझ्याविना आता जात नाही एकही पळ
अजून किती वाट पाहू, काढू कशी मी कळ
===========
टपोरे डोळे त्यात काजळ
जणू वाळवंटात दिसले मृगजळ
बघताच क्षणी तुला झाले जीवन सफळ
परीसस्पर्शाने तुझ्या जीवनवेलीची वाढवू फळ-फळावळ
तुझ्या आठवणींना साठ साठ साठवलं
साठी पर्यंत प्रतारणेचं दुःखच कवटाळलं
कधी वाटतं नक्की काय टाळायला हवं होतं
तुझ्या कवेत अनुभवलेलं प्रेम
कि तुझ्याविना भरलेले दिवसांचे रिकामे रकाने
काळाचं समिकरण सोडवायची गरज नाही ते जुळवण्याची जवाबदारी काळाचीच. वेळ येताच ते जुळणार हे नक्की आपल्याला ते फक्त समीकरण समजलं पाहीजे समजल्याने ते बदलणार नाही, पण जीवन सुसह्य होईल. श्वास घेता येण महत्वाचं, त्यासाठी हवा दिसण्याची गरज नसते, पण जीव वीयूचं प्रमाण कमी होतय हे कळलं तर दीर्घ श्वसन करुन ते सुसह्य होण्याईतपत समज असणे गरजेचं आहे. गरजेच म्हणजे, समजलं तर जीवन सुसह्य होईल … नाही तर जे व्हायचं ते होणारच आहे … शेवटी भौतिक जग हे भौतिकशास्त्राच्या नियमानेच चालणार, आणी जीवाने कितीहि उड्या मारल्या तरी त्या जीवशास्त्र्यांच्सा नियमा पुढे तोडक्याच पडणार … पण या सगळ्यांचा समतोल — काळाच्या समीकरणाने रहाणार.
चकणा, दारु जोडीला सिगरेट
जुन्या मित्रांबरोबर अशीच असते गाठभेट
खादाडी त्रिकुटी मैत्रीची,
घटकाभर मौज, पुंजी जीवनाची
घालव वेळ वायफळ, जळू देत देह अंतरी
जन्मोजन्मीचा आहे हा फेरा, पाठीशी उभा धनवंतरी
जन्मतःच मृत्यु निश्चित,
न केलेल्या पापाचे
उगीचच का फेडत बसावे प्रायश्चित
असली कितीही थंडी
घालते ती फक्त छोटी चड्डी आणी बंडी
बघून तिला मलाही येत उसने अवसान
या राणीपाई नोकरीला मारेन मी ठोकर
बॅास ला सांगेन. मी नाही कुणाचा नोकर
घरी बसून विणेन मी लोकर
वाजलीच थंडी, तर
मी अन ती घालीन विणलेल्या लोकरीचा स्वेटर
येतो तो तो क्षण अमृताचा।
जें जें भेटे तें तें दर्पणींचे बिंब
तुझें प्रतिबिंब लाळेगोडे।
सुखोत्सवें असा जीव अनावर
पिंजऱ्याचे दार उघडावे।
संधिप्रकाशांत अजून जो सोनें
तों माझीं लोचने मिटों यावीं।
-बा.भ.बोरकर.
===========================
culinary explorations result into in Artistic expression
===========================
कर्माचा सिध्दांत
===========================
दुपारच्या जेवणामुळे रात्रीच सुरु झाली हगवण
संडासापर्यंत पोहचेतोवर मोजले १०० अमृतक्षण
पावलोपावली एकच होती धास्ती
थेंब थेंब म्हणता म्हणता चड्डी होतेय का पिवळी चिंब
दर्पणी न बघताच दिसले होते माझे मलाच खव्वयै प्रतिबिंब
सुखोत्सवें असा जीव अनावर पिंजऱ्याचे दार उघडावे
वाटत होते जोरात रडावे
मोकळीकतेने उडला फवारा
सगळेच संपले हेवेदावे
पसरताच सर्वत्र पुरावे
मनस्वी सोडला सुस्कारा
आतड्यांनीच जणू केला पुकारा
जगणार उद्या नक्की खाण्यास नव्याने चविष्ट कचरा
म्हणता म्हणता जातात सात वार
आठवून आठवून पावातले वडे
ठकलतो कसेबसे आठ आठवडे
संपतो आहे quarter म्हणत म्हणत
कण्हत कण्हत रिचवतो quarter
वड्याच्या दिवास्वप्नातच जातो आठवडा
अशी आहे आपली प्रथा
साजूक तुपात प्रसादाचा शिरा
तात्काळत वाट बघण्याची व्यथा
सांगावी कशी नी कुणाला
चिंतेने या ताणल्या मेंदूच्या शीरा
त्यातून गुरुजीही आले उशीरा
संयमाचे धडे मिळतात करून असली प्रतीक्षा
पण त्या त्यावेळी मात्र वाटते हि बळजबरीची शिक्षा
एक ना अनेक, आपल्या पंरपरांचा मोठा वारसा
काहींना लहानपणीच मिळते अशीच दिक्षा
काळ जात गेला तसा तसा जीव अडकत गेला
जीव अडकल्याने काळ जात गेला
काळ आणी जीव चा झाला गुंता
काळजीचा उत्पन्न झाला बागुलबुवा
केले मग अनेक पीर बाबा दारु दवा
काळजीला नाही काहीच उपाय
पाय वर करून पहूडण्यापलिकडे
उरलाच नाही आता पर्याय
फार सोपं झालं असतं
आपल्यातलं प्रेम शब्दातच कैद करता आलं असतं तर
अफाट, अमर्याद, अविरत, अटकेपार, अतुट, अतिशय, अशक्य…
या प्रेमाला शब्दांमध्ये गुंफू तरी कसं?
जे सांगायचं आहे ते तुझ्यापर्यंत पोहचवू तरी कसं?
न बोलताच तुला समजतं सगळं, तर मग बोलू तरी काय नी कसं?
स्पर्शानेच जे समजू शकेल ते digitization द्वारे शमवू कसं ?
तुच पहा एखादं गुलाबाचं फूल, अन् त्यावरंचा भुंगा
कळेलच तुला माझ्याच मनात मी घालतो किती दंगा
गण्याः (पिता पिता) .. बंड्या, ऐ बंड्या .. teatotaller म्हणजे काय रे?
बंड्याः teatotaller म्हणजे .. आपलं हे रे
गण्याः आपलं हे !!!
बंड्याः (विचार करून) अरे जो घरातला सगळा चहा टोटली संपवतो तो टिटोटलर (teatotaller )
गण्याः भारीच न रे , ईंग्रजी चांगलच आहे तुझं
बंड्याः आहे काय नाही काय .. शब्दातच त्या शब्दांचा अर्थ दडलेला असतो
गण्याः म्हणजे ..
बंड्याः (घोट घेत घेत) बेवडा म्हणजे काय
सांग बरं ?
गण्याः बेवडा म्हणजे … बे व डा ( action करतो)
बंड्याः साफ चूक, बेवडा म्हणजे जो नेहमी दोन वडा प्लेट मागवतो
गण्याः अन् बेवडी म्हणजे ?
बंड्याः जी ऐका वेळेस दोन वड्या मागवते 😂
गण्याः म्हणजे आपण दोघेही टिटोटलर बेवडे!
===
teatotaller
========================
गण्याः (पिता पिता) .. बंड्या, ऐ बंड्या .. teatotaller म्हणजे काय रे?
बंड्याः teatotaller म्हणजे .. आपलं हे रे
गण्याः आपलं हे !!!
बंड्याः (विचार करून) अरे जो घरातला सगळा चहा टोटली संपवतो तो टिटोटलर (teatotaller )
गण्याः आणी बेवडा म्हणजे
बंड्याः बेवडा म्हणजे जो एकाच वेळी नेहमी दोन वडापाव खातो
गण्याः म्हणजे आपण दोघेही टिटोटलर बेवडे!
=========================
बंड्याः गण्या, चल honest मध्ये जाऊ, जाम भूक लागली आहे
गण्याः चल
बंड्याः तु काय खाणार ?
गण्याः मी राजकचोरी खाणार..
बंड्याः मग मी राजवाडा खाणार!
=== or extended version =======
गण्याः भारीच न रे , ईंग्रजी चांगलच आहे तुझं
बंड्याः आहे काय नाही काय .. शब्दातच त्या शब्दांचा त्यां अर्थ दडलेला असतो
गण्याः म्हणजे ..
बंड्याः (घोट घेत घेत) बेवडा म्हणजे काय
सांग बरं ?
गण्याः बेवडा म्हणजे … बे व डा ( action करतो)
बंड्याः साफ चूक, बेवडा म्हणजे जो नेहमी दोन वडा प्लेट मागवतो
गण्याः अन् बेवडी म्हणजे ?
बंड्याः जी ऐका वेळेस दोन वड्या मागवते 😂
बंड्याः गण्या, चल honest मध्ये जाऊ, जाम भूक लागली आहे
गण्याः चल
बंड्याः तु काय खाणार ?
गण्याः मी राजकचोरी खाणार..
बंड्याः मग मी राजवाडा खाणार!
गण्याः (पिता पिता) .. बंड्या, ऐ बंड्या .. teatotaller म्हणजे काय रे?
बंड्याः teatotaller म्हणजे .. आपलं हे रे
गण्याः आपलं हे !!!
बंड्याः (विचार करून) अरे जो घरातला सगळा चहा टोटली संपवतो तो टिटोटलर (teatotaller )
गण्याः आणी बेवडा म्हणजे
बंड्याः बेवडा म्हणजे जो एकाच वेळी नेहमी दोन वडापाव खातो
गण्याः म्हणजे आपण दोघेही टिटोटलर बेवडे!
रोजच घेते घिरट्या पृथ्वी स्वतःभोवती
गर्र गरा ग्गर गरगर गर
बघतो जरी मी दिवास्वप्नं विश्रांतीचे
नकळतच जातात दिवस, दिवस गेल्यानंतर
भर भर्रा भर भर भरभर
बघता बघता पृथ्वीने
मारली सुर्याभोवती अजून एक चक्कर
मी ही यंदा जोमाने दिली भवितव्यास टक्कर
अन् सुद्धुढतेसाठी सोडली मी शक्कर
हेलपाट्यापाई मीच ठरलो खरा घनचक्कर
रोजच घेते घिरट्या पृथ्वी स्वतःभोवती
गर्र गरा ग्गर गरगर गर
बघतो जरी मी दिवास्वप्नं विश्रांतीचे
हेलपाट्यातच जातात दिवस
भर भर्रा भर भर भरभर