Sunday, February 16, 2014

हसू का रडू

हसू का रडू
=========
एकदा प्रतिबिंबास रडता रडता विचारले मी
हसतोस काय मेल्या मला बघून
एखाद्यावेळेस तूच रडशील खूप
मला हसतान बघून

अजूनच हसू लागले प्रतिबिंब
मला मग रडताना बघून
हसलो मी पण मग त्याला बघून
तर घाबरलं ते खूप,
आणि रडू लागलं हमसून हमसून 

Letting Go

का फुकी जळावे मी
करुनी तारुण्याची वात
दिली टाकून मी जुनी कात
सज्ज झालो नव्याने,
करण्यास येण्याऱ्या विघ्नांवर मात

Wednesday, December 25, 2013

निसर्गरम्य

स्थितप्रज्ञ डोंगरावरची घनदाट वनराई
त्यावर अंथरली अंबराची निळाई 
नितळ पाण्याची अवखळ खळखळ
संथावून गेली संतत विचारांची खळबळ
चला करु या आता निवांत गाईगाई


 

Monday, November 25, 2013

साद


कंटाळून घालतो आता शेवटचा वाद,
नको पुनःपुन्हा तेच संवाद
तुझ्या मिठीनेच,  झाले जीवन माझे  बरबाद
पर्वा नाही जरी समाजास वाटला हा घोर प्रमाद  
निघालो मी, निघ तू, राहू दोघेही आबाद
नव्याने जगण्यास, जीवनच घालतेय आपल्याला  साद

साद

कळवळून घालतोय प्रिये तुला साद
विसरून सगळे वाद
चल, नव्याने करूया संवाद
पाठीशी घाल सगळे प्रमाद
होण्याआधीच सगळं बरबाद
तुझ्या मिठीतच आहे,
माझं जीवन आबाद

Sunday, November 24, 2013

नेत्र वैद्यास (to all eye doctors & teachers)


नेत्र वैद्यास (to all eye doctors & teachers)
==============
दिलीस तू नवी दृष्टी
नव्याने भासवली तू हि शृष्टी
कल्पना विश्वापरी भासते
खरे विश्वहि  माझे
कळेचना फेडू  कसे काय,
ऋण हे  तुझे?

साद

साद
=====================
शब्दातून राहिल्या भावना अव्यक्त
संवादासाठी काढले मग हे चित्र
अबोल चित्रदेखील ठरलेच मुके
साकारण्यास विश्व हे माझे
(कल्पना) विश्वात या, तू येशील का?



======================
साद 
======================
शब्दातून राहिल्या भावना अव्यक्त 
संवादासाठी काढले मग हे चित्र 
अबोल चित्रहि पडले इतुके मुके 
तुझ्याविना भासते खरे विश्वही फिके  
आता तरी,  तू येशील का?
=======================

Friday, November 22, 2013

निशब्द

शब्द गेले सगळे सुट्टीवर,
नुसते विचार, करतील तरी काय काम
पहाटेच्या चहाचे आता, चुकवू कसे मी दाम ?

Saturday, November 09, 2013

कोड्यातली क्लृप्ती

शरीराची आसक्ती,
त्यांतून नियमांची सक्ती,
त्याहून वरताण, मनातली भक्ती,
करण्यास यावर मात, ज्यासी माहिती युक्ती
त्यासी कळेल हि उक्ती

बळी

एकाच्या आनंदासाठी, दुसऱ्याचा का जावा बळी?
बचैन करे मज असल्या विचारांची साखळी
दमलो विनवून निर्दयी समाजास वेळोवेळी
पोटतिडकीने शेवटीची फोडली मी किंचाळी

Thursday, October 31, 2013

मुलभुत गरजा

मुलभुत गरजा - अन्न, वस्त्र िनवारा
वाढतात, वाढवाव्या तेवढ्या गरजा
उगाच, वाढतो निवाऱ्यात मग पसारा 
पसाऱ्याऐवजी  गरजांनाच थोडं आवारा 
अन घराला वस्तुंऐवजी सौजंन्याने सजवा 

Saturday, October 19, 2013

जबाबदारी

थंडगार कॉफी किंवा वाफाळणारा चहा
कल्पनेनेच जीव माझा गलबले
सुटले चवीचे सगळेच चोचले
जबाबदारीत नव्या जीवन आता गुंतले

डोईजड

नसत्या आठवणींचं ओझं
करतं डोक्याचं भजं
मत हेच माझं
काय म्हणणं आहे तुझं 

कोजागिरीची भेट

दुध उकळता भांडे जसे करपले
प्रेमात तुझ्या तसे मन माझे खरचटले
जसे जसे आयुष्य भविष्यात भरकटले
सहवासाविना तुझ्या,
तुझ्या आठवणींची झाली शुल्लक टरफले
तरी सुद्धा तुझ्याविना माझ्या जीवनात,
माझे मन पुन्हा कधीच नाही करमले

बदल

होऊद्या नव्याची सवय सावकाश
लागला जरी प्रदीर्घ अवकाश
तोडा जुनकट पाश
होण्याआधीच सर्वनाश 

Wednesday, October 16, 2013

यादृच्छिक प्रश्न

शेर ने जब से चखा गरम खून, हो गया हे वो बेकरार
संस्कृती कि दिवार क्यो करती है उसको बेकार?
तोडेके दिखावे कि ये दिवार,
क्या उभरेगा उसका असली किरदार?

Saturday, October 05, 2013

गांडूळाची गम्मत

शब्दांची करून रचना विचित्र
रंगवी डोळ्यासमोर काल्पनिक चित्र
विचारांच्या गांडूळाचे अजीबच आहे तंत्र
मेंदूवरच्या वळ्यांमध्ये वळवळून 
लिहवी माझ्याकडून facebook वर पत्र

Thursday, October 03, 2013

निराशा


होत्या अनेक अपेक्षा
केली अफाट प्रतीक्षा
पदरी पडली फक्त उपेक्षा
हे आयुष्या, का एवढी परीक्षा?

Monday, September 23, 2013

गोची

जीवन म्हणजे निव्वळ रस्सीखेच
माणसं नवीन डावपेच तेच
सगळेच करती खेचाखेच
सुटेलच कसा हा पेच
 

Saturday, August 10, 2013

विरह

लिहायचं असलं तुझ्यासाठी
फिरतात गरागरा चक्रं बुद्धीची
बंद झाकण हृदयाचे उघडते खाडकन, भावनांच्या उद्रेकाने
विचारांच्या बांधानेहि थांबत नाही, प्रेमाचा पाऊस
भर उन्हाळ्यातही मग गडगडतात विजा
अन क्षणिक विरहहि भासतो जणू निरंतर सजा
तुझ्याविना खरोखरच नाही कशातच मजा