Monday, September 29, 2014

Dark side

मी पापी, मी दूष्ट
मनापासुन करतो मी कष्ट
घालण्यास मुद्दाम विघ्न 
संगळ्याच्याच मते मी कृतघ्न
ईतकं चोख ओळखल्याबद्द्ल
मी तुमच्याशी कृतज्ञ

Tuesday, August 26, 2014

चारोळीच प्रारब्ध

व्याकरणाचे तर कधी यमकाचे, झुगारून निर्बंध
खेळीमेळीने अचानक येतात एकत्र शब्द
असतं एखाद्या चारोळीच असं विचित्र प्रारब्ध
श्रोतेच काय, कवीही होतो वाचून नि:शब्द 

संवाद

संवाद करा, संवाद करा
झाले करून खूप संवाद
संवादाच्या नावाखाली वाढत होते फक्त वाद
आत्ता कळतंय,
संवाद म्हणजे खरोखर सहवासाने होणारे फक्त वाद



सवड

तहान भागवयाची असेल 
तर उचलावीच लागते पाण्याची कावड 
मैत्री टिकवायची असेल 
तर काढावीच लागते सवड

Friday, July 18, 2014

अळणी

अळणी
----------------------------------------------------
कोणे एके काळी,
पंच्पाक्वांनाची  सवय पडली  होती अंगवळणी
खात असे सदा, वेळी अवेळी
खातो आता फक्त भरण्यास पोटाची खळगी
जरी असले अन्न अळणी


Sunday, July 06, 2014

वयोवृद्ध

 प्रौढत्वाकडे होतोय झपाट्याने वाटचाल
विचारने वागण्यापरी वाढू लागलेयत विकार
शरीराचा सुटलाय आकार
स्वप्न होणार कशी ती साकार

वृक्षांकुर


 भराभर अनेक वर्षे सरली
अनेक अनुभवांची बीजं पेरली
अंकुरलेल्या आठवणींच्या वृक्षांवर
आत्ताशी कुठे प्रेमाची फळं िदसु लागली

केस पिकण्यापुर्वी फळं पिकतील हे नक्की
नव्याने ज़ोम आलाय, करावी ज़री लागली धक्का बुक्की 

Thursday, May 29, 2014

TGIF

आला आला शुक्रवार 
ऑफिस मधून लवकर पसार 
वीकेंडला आणणार आहे मी मस्त बहार 
करून घरघुती साफसफाईच्या जबाबदारीचा स्वीकार 

Saturday, May 17, 2014

चारोळ्यांची कळकळ

ऐकून शोर्त्यांची मन:पूर्वक कळवळ
शब्दांनीच केली माझ्याविरुद्ध चळवळ
केले मुन्दुच्या वळ्यांना सरळ
जरी मनात माझ्या झाली हळहळ

Saturday, March 29, 2014

स्त्री-पुरुष व्यवहार

स्त्री-पुरुष व्यवहार
=====================
स्त्रियांमुळे पुरुषांचा होतो संसार
रोज मिळतो पोटभर आहार
अन पडक्या भिंतीमध्येही सजत घर 
पुरुषांमुळे स्त्रियांचा भरतो बाजार
वावगे न वाटावे इतक्या सहजतेने
महालांमध्येहि घडतात अमानवी व्यवहार

संसाराचं समीकरण

बायकोने रात्री घातली कितीही हुज्जत
तिच्याच हाताच्या सकाळच्या चहाला न्यारीच लज्जत
संतुलानाने असल्या रहाते - संसारात गम्मत

Monday, March 24, 2014

वात्सल्याचं कर्ज

मनी फुकीचा गर्व
म्हणे कर्तुत्व जाज्वल्य
मोजुनिया दाम घेईन विकत सर्व
अनमोल जरी, फुकटच होते आई वडिलांचे वात्सल्य
करणार तरी कशी परतफेड, अपुरे पडले बुद्धीचे कौशल्य
आजन्म उरणार उरी हे कर्ज, सलती मनास हेची शल्य

Saturday, March 22, 2014

संवाद

कुणीच देईना प्रतिसाद
घातली जरी मी कळवळून साद
आप्तांनीदेखील सोडला माझा नाद
आयुष्यभराचे सगळेच वाद, 
घडले होते केवळ, न झाल्याने संवाद 

Thursday, March 20, 2014

प्रतारणा

अखेरचे तिचे बोल
ह्रदयात रुजले ते खोल
विसरण्यास ते प्रयत्न माझे
वारंवार ठरतात फोल




Sunday, March 16, 2014

दुखणी

वाढलेल्या वयाची दुखणी
शरीराची जरी सुडौल बांधणी
तरी जखडती त्वरित स्नायू
वाढताच वायु

चारोळ्यांचा प्रसार

मनात माझ्या काळोख अंधकार 
त्यात क्वचित चमकतात चांदण्या चार
िवचार, क्षणात होतात शंब्दाच्या घोडीवर स्वार
सुसंगततेच्या साखळीत अडकण्याआथीच 
हलकेच होतात ते मग पसार

Sunday, February 16, 2014

हसू का रडू

हसू का रडू
=========
एकदा प्रतिबिंबास रडता रडता विचारले मी
हसतोस काय मेल्या मला बघून
एखाद्यावेळेस तूच रडशील खूप
मला हसतान बघून

अजूनच हसू लागले प्रतिबिंब
मला मग रडताना बघून
हसलो मी पण मग त्याला बघून
तर घाबरलं ते खूप,
आणि रडू लागलं हमसून हमसून 

Letting Go

का फुकी जळावे मी
करुनी तारुण्याची वात
दिली टाकून मी जुनी कात
सज्ज झालो नव्याने,
करण्यास येण्याऱ्या विघ्नांवर मात

Wednesday, December 25, 2013

निसर्गरम्य

स्थितप्रज्ञ डोंगरावरची घनदाट वनराई
त्यावर अंथरली अंबराची निळाई 
नितळ पाण्याची अवखळ खळखळ
संथावून गेली संतत विचारांची खळबळ
चला करु या आता निवांत गाईगाई


 

Monday, November 25, 2013

साद


कंटाळून घालतो आता शेवटचा वाद,
नको पुनःपुन्हा तेच संवाद
तुझ्या मिठीनेच,  झाले जीवन माझे  बरबाद
पर्वा नाही जरी समाजास वाटला हा घोर प्रमाद  
निघालो मी, निघ तू, राहू दोघेही आबाद
नव्याने जगण्यास, जीवनच घालतेय आपल्याला  साद