Sunday, May 03, 2020

करोनाचे दुष्परिणाम

थांबलेली वैश्विक वणवण
संभाषणांत सतत तांत्रिक अडचण
कुलूपबंदीमुळे आर्थिक चणचण
अती-जवळीकेने होणीरी कौटुंबिक तणतण
शैथिल्यामुळे शारिरीक कणकण
या सगळ्यांचा विचार केल्याने डोक्यात भणभण
#covid19

सुरवंट

तुडवायचे असेल रखरखित वाळवंट
हाकावेच लागतिल मनातले आळशी उंट
हाकता हाकता वाढलेजरी दाढिचे खुंट
चित्त, वृत्ती ठेवा चंट
कारण, फुलपाखरांसही मुक्त उडण्याआधी
भोगावेच लागते बनूनी संकुचित सुरवंट

#covid19

छंद

गुलाब गोळा करण्याचा आहे मला छंद
त्यापरी बोचतात मला सतत काटे
होतात कधी कधी भयंकर तोटे
तळीराम होतो मात्र शांत, चाखताच मुरलेला गुलकंद

नोकरदाराचा शुक्रवार

वेतन तर नेहमीच राहिल क्षुल्लक
त्यात काय उरणार शिल्लक?
चला चालवूया उसनी अक्कल
शोधूया एखादी नविन शक्कल
होऊया निवृत्त, पडण्याआधी टक्कल

शेंबडं प्रेम

रुमाल देऊन म्हणालीस, आधी नाक पूस
बघतां बघतां,
ह्रदयालाच पळवलेस माझ्या लाऊन फूस
वाट बघून बघून,
निद्रानाशाने बदलतोय मी सारखी कूस
रिकाम्या बरगड्या फोडतात टाहो
त्यांची तरी कर कि प्रेमाने विचारपूस

Saturday, March 28, 2020

व्यसनी संगत

व्यसनी संगत
----------------------------------------
तंबाखूला नाही चव
मळण्याशिवाय घालून चुना
सोमरसाची खरी मजा
जमतो जेव्हा मित्रगट जुना






Sunday, March 22, 2020

corona विषाणू

चवीने खातो प्रत्येक जिवाणू
अस्वच्छतेपायी जीवेभावे पाळतो किटाणू
जरी बनवलाय आम्ही परमाणू
तरी भारी पडतोय सध्या छोटासा विषाणू

corona

घरी बसून बसून आला जरी कंटाळा
तरी घरी बसूनच, नको ते संपर्क टाळा
वाटलच तर घरालाच लावा टाळा
कसेही करून त्या coronaला पिटाळा


#Covid19

Sunday, March 15, 2020

fling

Once upon a time
I had a fling
Nothing mattered, Fun was Everything
I can't find it anymore
Even if I searched it with Bing

Saturday, March 14, 2020

पाणीपुरी आणि covid

बघताच पाणीपुरी, तोंडाला सुटले पाणी
आठवताच covid चा संसर्ग, पळाले तोंडच पाणी
परिस्थिती सध्या आहे फारच बिकट, सगळीकडेच आणीबाणी
निर्हेतुक सामाजिक हितगुजदेखील ठरूशकेल जीवघेणी
बसावे घरी शांत, टाळण्यास संसर्ग
उत्तम हाच एक मार्ग

सोमरस

स्काॅच आणी सोडा
जोडीला चकणा थोडा
आनंदी स्वारी, पोहचली उत्तुंग शिखरी
दौडवताच कल्पनेचा घोडा

निर्धार

शत्रुंना पिटाळले मारुनी सोटे
रोखणारे हितचिंतक ठरले खोटे
निर्धाराने सोडले घरटे
पसरताच पंख आकाशहि पडले थिटे

चाय पे चर्चा

काॅफीमध्ये जायफळ अन चहामध्ये आलं
न बोलताच, कसं काय करणार ऐकमेकांच्या मनातलं?
विचारवंताना पडतात असले फुटकळ प्रश्न
अन् प्रेमी युगलं असतात त्याच्यातच मग्न!

Thursday, March 12, 2020

ती पहाट

रात्रभर जागरण, होऊ घातली पहाट
आगळाच होता अमुचा त्यावेळी थाट
चटकदार चहात घालून दमदार आलं
अन चहाच्या कपात वादळ चहातंच शमलं

ती रात्र

काॅफीमध्ये टाकताच जायफळ
गप्पा सुरू झाल्या वायफळ
अचानकच, खुशीत येऊन म्हटली ती
घे की मला जवळ
अजून काढणारेस कितीवेळ कळ?

Tom and Jerry

शेपटीला देताच जोरात पीळ
उंदिर शोधू लागला बीळ
मांजराने विचाकारले दात, उंदराची बसली दातखीळ
तेवढ्यात दिग्दर्शकाच्या कॅमर्याचं संपल रीळ

Tuesday, February 04, 2020

गायत्री
=============================
देवकृपेने जन्मलिस तू मुग्धापोटी
सगळ्यांनीच सांगितलं - आता खरी कसोटी
क्षणात विसरून बाहुली खोटी
ईराताईनेही स्वागतास तुझ्या, कसली कटी


तू बाळुंकी गुणी, झोपते पटकन लावताच वळकटी
तूझ्यासाठी हि चारोळी छोटी

Tuesday, December 31, 2019

आत्मविश्वास

आपलंच आपल्याभोवती असावं  असं वलय
जरी आजूबाजूला आला कितीही मोठ्ठा  प्रलय
वाटणार नाही कशाचंच भय
नेटाने चालत राहता यावं पुढे, पकडून आपली लय

सवयीचे जोडे

वाढत जातं जसं जसं वय
फाटक्या जोड्यांचीही जरा जास्तच होऊ लागते सवय
ते घालून चालवण्यात असते एक विशिष्ट लय
अन् अनुभवांमुळे वाटत नाही कशाचेच भय

विरंगुळा

प्रत्येकालाच हवा विरंगुळा
गुरफटतो मुखपुस्तकात दिवसातून दहा वेळा
चावलाच कधी पायास मुंगळा
रडण्याआधी टाकतो स्टेट्स - चावला मुंगळा, रडतोय कळावळा.