Thursday, April 30, 2026

अर्ज किया हैः पार्टी दो


ए गालिब चाहे कर ले शेरो शायरी

चाहे तेरे दिल के टुकड़े हजार

या तेरा दिल जानम के लिये बेकरार

तेरी शेरो शायरी सब बेकार

भुखे दोस्तों ने की है दरकार


खत्म कर ये कंजूसी और मक्कारी

अब तो पार्टी की है जिम्मेदारी तुम्हारी

खुश हैं हम, चाहे खिलाओ सब्जी-तरकारी

या हो गरमा-गरम 'झुकणा और भाकरी' 

Tuesday, April 28, 2026

बेरकी मोहरी


तिरप्या परातीत टाकली मोहरी

काही जाड, काही बारीक, पण होती एक बेरकी

धावली ती जोरात, 

अपूरी पडली तिला परात


बाकी पसरल्या ईकडे तिकडे स्वयंपाक घरात 

म्हणू लागल्या सगळं मुसळ केरात


बेरकिने हेरली सायकल दारात

थेट परतली शेतात

शेतकऱ्यांशी करून संगनमत

सगळ्यांनाच वाटली मोहरीची खरात

पुढल्या वर्षीच्या हंगामात

मिथ्या

इंद्रियांचेच सगळे चोचले,

कुणाचे चोचले कधी कसे कुणास बोचले;

तोडीत लचके, बनूनी लांडगे,
लागले लगेच हिणवू, बनूनी कोल्हे

होणार नक्की अधोगती, दाखवू लागले भीती. ॥१॥


जेथे खुंटते मती,

तिथे सुरू होते प्रीती;

प्रीतीची होताच प्रचिती,

नाहीशी होते अस्तित्वाची भीती ॥२॥


बागूलबुवा नैतिकतेचा, वाजविता होई फजिती,

गंमत सगळी, सगळीच माती, 

होते जेव्हा अनुभूती; 


जो येतो, तो जातो

तरी म्हणतो ठोकूनी छाती,

"माझीच चोख नीती, मीच घडवेन क्रांती!"

होईल आता इथेच उत्क्रांती ॥३॥


नको क्रांती, नको उत्क्रांती; हवी फक्त शरणागती

निरुपयोगी ठरेल, केली जरी ब्रह्मांड भ्रमंती,

विरली सगळीच भ्रांती, हरी नामातच अखंड शांती॥४॥

Monday, April 27, 2026

धुरंदर विषकन्या


किती मोठा तिचा जिव्हाळा

एवढा छान रचला तिने हा सोहळा

मर्यांदेचा मी पुतळा 

क्षणार्थात पडलो दुबळा

जिव्हाळ्याचा सोहळाच मुळी होता सापळा 

जीजाजींबद्दल जिव्हाळा

पांडूरंगाचे भक्त तुम्ही 

काय पावसाळा, काय उन्हाळा

रंग शोभूनी दिसतो जरी काळा

आवडता रंग तुमचा निळा 


नको आपणास काजळाचा ठिपका

नको आपणास आधार कार्ड 

ओळख त्यास पटली केव्हाच आपली

नाहीतर बदडला असता बेदम होईस्तोवर काळा निळा


तुमच्या अंगी नाना कळा

कुठे शिकला शाळा

गुरूंजींनी मारला शाळेलाच टाळा


उन्हाळ्याच्या सोसता खुशाल झळा

आधार कार्डवर नकोच चाळा

पावसाळ्यात करता जनजागृती 

वदवूनीः पाणी गाळा, नारु टाळा

Sunday, April 26, 2026

अजरामर

 केल्या आपण किती कृल्प्त्या नी कुरापाती 

खर्चं करुन झाली कमी खाती

जमा खुप अक्कलखाती

दगडी लेण्यां बघतानाच्या 

तुझ्या नी माझ्या स्मृती 

चिरकालासाठी कोरल्या थेट ह्रदयावरती

बोलबच्चन

 दुध उकळता भांडे जसे करपले

प्रेमात तुझ्या मन माझे खरचटले
जीवन जसे जसे भविष्यात भरकटले, 
सहवासाविना तुझ्या, तुझ्या आठवणीं जणू शुल्लक टरफले
खरं सांगू माझ्या जीवनात, माझे मन परत कधीच न करमले

आधुनिक म्हण

ध्येय असताना मार्ग हुडकणं अवघड नसतं,
मार्ग सापडेल म्हणून जंगल तुडवणं सोपं नसतं.

अनादी

झोपून झोपून उबवतो गादी
नर मुळातच आळशी, नादी
येताच हक्काची मादी
तयार होतो घालून खादी

आतंकवाद ९/११


रागासारखा नाही अजातशत्रू
संगतीने त्याच्या दुःख झाले जिवलग मित्र
राग, लोभ, द्वेष, हिंसा सर्वत्र
शैतानानेच जणू रचले षडयंत्र
बनवून रागास मानवतेचा अजातशत्रू

चटक्यातून सुटका

सद्सद्विवेकबुद्धीचा जाणवतो दाह
किती करावा म्हणतो मी उहापोह 
अनुगच्छति प्रवाह, आयुष्य होई सुखावह 

Lost in Social media

 दृश्य असावं असं कि बघतच रहावं

गाणं असावं असं कि एकतच रहावं
गुंता असावा असा कि गुंतूनच रहावं
कुरण असावं असं कि चरतच रहावं

सात्विकता

चहाच्या जोडीला खाल्ले पोहे
पोह्याच्या जोडीला ऐकवले दोहे
दारूच्या जोडीला चाखला चकणा 
चकण्याच्या साक्षीला बेवड्याच्या आणाभाका
  

आधुनिक म्हण

 रात्री दारू, कुशीत पारू

भोग

 सोमरस असो व अमृततुल्य 

करावे सगळ्या द्रव्यांचे प्राशन 
मनोसक्त करावी मजा 
मेंदूला द्यावा वैचारिक आराम 
आणि शरीराला द्यावे कष्ट 

सुगरण

मी आहे सुगरण
करतो मस्त शिकरण
शिजवतो भात; सातच्या आत
वाढताना वरण, डाव पडला तुपात 

शीण

जगभर भटकलो वणवण
ना साजरा केला कुठचा सण
डोक्याला सतत भणभण
अंगात सतत कणकण

आत्मकथा

 प्रत्येकाची असते विशिष्ट गोष्ट

त्यात कुणीतरी असतं खाष्ट

कुणी खायला असतं तयार अन्न उष्ट

त्याला देतात प्रोत्साहन, हेच सगळ्यात चविष्ट

कुणाचे जुळतात संबंध घनिष्ट

तर काहींचे उडतात खटके, मुळातच ते नतद्रष्ट

गोष्टीतल्या सगळ्या पात्रात, गोष्ट सांगणारा सगळ्यात विशिष्ट

तो म्हणतो मीच करतो सगळ्यात जास्तं कष्ट

मलाच पोसा, मला व्हायचंय अजून धष्टपुष्ट 

काहीही

=============
इकडचं जुळत नाही
तिकडचं सुटत नाही
चालू आहे काहीही
किती दात काढायचे - हि हि हि

लवचिक कवी

 कधी दारू तर कधी चहा

कधी चकणा तर कधी पोहे
कधी चारोळी तर कधी दोहे