Wednesday, May 28, 2025

प्रेमप्रस्ताव

 


तो: तु कोण आहेस? तु ना … तु हवा आहेस … नाही नाही, म्हणजे तु ना, मला हवी आहेस?


ती : मी हवा आहे? 


तो : नाही .. तु हवी आहेस … 


ती : काय … मी , मी हवी आहेस? कुणाला .. तुला 


तो : तत् पप् .. घाबरत .. म्हणजे तू हवा आहेस .. i mean  तू हवे सारखी आहेस ..माझ्या साठी .. म्हणून मला हवी आहेस .. 


ती : डोळे वटारून … काय मी हवे सारखी आहे ? हवा कि हवी आहे?


तो : (अजून घाबरत घाबरत … ) दोन्ही दोन्ही ..


ती : म्हणजे… नीट सांग .. हवा कि हवी .. 


तो : म्हणजे … तु ना … तु ना .. हवा आहेसं.  


ती : काय .. ?


तो : म्हणजे .. तू ना नुसती असतेस … म्हणजे आहेस .. सगळीकडे, माझ्या विचारात, अवती भोवती .. पण दिसतंच नाहिस ना 


ती : म्हणजे मी हवा आहे 


तो : अमं हं .. हो हो .. नाही .. म्हणजे हो .. हवी आहे 


ती :  नाही? म्हणजे हो ? हो की नाही .. 


तो : नाही नाही, तसं नाही .. म्हणजे हो .. 


ती : काय? हो म्हणजे नाही???


तो : ना..ही .. तसं नाही .. म्हणजे तू हवा आहेस आणी हवी आहेस .. हं हो .. हा , हो हे बरोबर आहे. 


ती : काय बरोबर आहे 


तो : तू बरोबर आहेस हे बरोबर आहे 


ती :  अरे काय बरोबर आहे? 


तो: तू हवा आहेस. नाही तू हवी आहेस


ती : मी हवी आहे???


तो: म्हणजे — तु हवेसारखी आहेस.. आणी म्हणून मला हवी आहेस .. हे बरोबर आहे


ती :  आत्ता कळलं .. हा .. हो रे माझ्या राजा 


तो: हो … 


ती :  आणी तू बरोबर आहेस .. हेच बरोबर आहे .. चूक.. चूकत असेल तरीही.. 


तो: चूक नाही .. अचूक हेरलंयस तू मला …


ती : humm


तो:  हवेसारखीच असतेस तू माझ्या बरोबर … सतत .. दिसली नाहीस तरी … जाणाऱ्या क्षणातून प्रत्येक श्वासापरी येणाऱ्या क्षणात खेचून आणतेस .. तू मला 



ती: बर बरं. आता जास्त फुगवू नकोस .. आणी फुगू पण नकोस .. नाही तर भ्रमाचा भोपळा फुटेल … आणी जागा झाला कि म्हणशील तू ना .. तू ना .. रक्त आहेस …. सतत माझ्या ह्रुदयात असते म्हणून 

गुन्हा

 =======================

असा घडला काय हातून गुन्हा ?

ज्याची शिक्षा पुन्हा पुन्हा 

सहवासाचा ना त्या पडला कधी विसर

सहवासात आता मीच नसतो हजर


एकांतात सलतो सतत

अपभ्रंश


Absent 


ती : अहो, अ..हो …., अहो, ईकडे या लवकर

तो :  काय.. आलो आलो.  झालंय काय?

तीः शाळेतून फोन आला होता, चिंटू आपला दिवे लावतो आहे शाळेत.  त्याला विचारलं तर म्हणे बाबांनीच सांगितलं आहे.  


तो: मी? मी कुठे काय सांगितलं. झालंय तरी का? 

ती: अहो .. तो सारखा ब्रा ब्रा करतो आहे. कसं वाटत. नविन बाई आल्या शाळेत .. त्यांनी विचारल तु कोण आहेस.  तर हा आपला .. ब्रा 


तो: हं? 


ती: तेच तर 


तो: विचार करतं  .. मी सांगितलं? मी तर काहिच म्हटले नाही.  चिंटू  .. ऐ चिंटू .. चिंट्या .. ईकडे

ये लवकर 


ती: अहो .. रागवू नका त्याला .. 


तो: अरे रागवू नको? संस्कार करतो आपण … ब्र्म्हणाचं पोर आहे .. वात्रटचाळे करतो म्हणजे काय. चिंट्या .. ईकडे ये. 


ती: जाऊ द्या हो, मी सांगेन समजावून


तो: चिंट्या तू शाळेत काय ब्रा ब्रा म्हणत फिरतोस? 

चिंटू : बाबा .. तुम्हीच म्हणाता ना नेहमी ?

तो: मी .. मी म्हणतो? अरे तुझ्या ऐवढं आम्ही होतो .. शाळेत ब्रा काय.. तोंडातून ब्र काढायची पण हिंमत नव्हती 

ती: (हळूच … टोमणा) आणी एवढे मोठे आहात पण ब्र काय ब्रा पण काढता येत नाही यांना… मी आहे म्हणून 


तो: ऐ ..( ओशाळून) काय चाल्लय .. ते सवय नाही म्हणून .. चिंटू .. तू सांग .. शाळेत तू काब्र .. i mean का   ब   र   हां.. का बर ब्रा ब्रा म्हणत होतास?


चिंटू : बाबा .. तूम्हीतर म्हणत होता ना .. संध्या काळी संध्या कर ब्राम्हण आहेस तू ब्रा म्हण।।।

म्हणून मी शाळेत म्हटलं ब्रा ब्रा .. तूम्हीच सांगितलय ना .. ब्रा म्हण ब्रा म्हण. 



म्हणी

 


म्हणी

  1. फेसाळणार्या लांटावर स्वार होऊन अटकेपार झेंडे गाडण्याची जिद्द जो जागवतो - तो. म्हणजे वाफळणारा चहा. 
  2. ज्वलंत ज्वालामुखीबरोबर राहूनहि प्रशांत सागरापरी स्थितप्रद्यनता अंगी भिनवतो तो देखील वाफाळणारा चहा
  3. कडवट कॅाफिने कडवटलेली चव आणी वखवखलेली वृत्ती क्षणात शांत करून निखळ मैत्री प्रस्थापित करतो तो सुध्दा वाफळणारा चहा

दिलफेक रोमियो


============================

फार सोपं झालं असतं 

आपल्यातलं प्रेम  शब्दातच कैद करता आलं असतं तर

अफाट, अमर्याद, अविरत, अटकेपार, अतुट, अतिशय, अशक्य…

या प्रेमाला शब्दांमध्ये गुंफू तरी कसं?

जे सांगायचं आहे ते तुझ्यापर्यंत पोहचवू तरी कसं?

न बोलताच तुला समजतं सगळं, तर मग बोलू तरी काय नी कसं?

स्पर्शानेच जे समजू शकेल ते digitization द्वारे शमवू कसं ? 

तुच पहा एखादं गुलाबाचं फूल, अन् त्यावरंचा भुंगा

कळेलच तुला माझ्याच मनात मी घालतो किती दंगा 

अव्यक्त

 तुझ्यासाठी लिहावं म्हणतो 

पण सांगण्यासारखं असं काहीच नसतं 

शंब्दामध्ये गुंफतां येईल, 

ईतकं सकुंचित प्रेम नसतं 

शब्दापेक्षा स्पर्शानेच ते व्यक्त होऊ शकतं 



गुलाबाच्या फुलांवर घिरट्या घालतो भुंगा

त्यालाहि लोकं समजतात भुंगाच घालतो दंगा

जणू टपलेच सगळे कारणावाचून घेण्यास पंगा

चारू

 चारू 

=============

चारु ला म्हणलं चल पितोस का माझ्याबरोबर कॅाफी

म्हणते कशी कॅाफि तर नेहमीच चहा पेक्षा फिकी 

म्हणलं चल मग कट्ट्यावरबसून  पिऊ चहा 

तर म्हणते कशी चहा पेक्षा दारुच बरी 

मनात म्हटलं हि तरी मस्त आहे, चल बसु संध्याकाळी 

तर म्हणते कशी, दारु बरी नाही … बरीच दारु! 

अशी आहे आमची चारु, गुत्त्यावर बसून पेग वर पेग मारू 

ओढ

======

ओढ .. कधी गुंतण्याची तर कधी गुंतवण्याची

गुंतवता गुंतवता गुंतलो मीच 

कधी झाला गुंता कळलेच नाही 

गुंत्याच्या गर्ततेत गुरफटलो मीच 

गुंगीत या गुंगून भंगलो मीच 

Tuesday, May 27, 2025

दोरी

 

=======================

चित्रपटात माधुरी बरोबर अमरीश पुरी 

जेवणात श्रीखंडा बरोबर तेलकट पुरी 

बंदुकेच्या दुनियेत चाकू आणी सुरी 

प्रत्येक गोष्टिंत असतेच मागे घेणारी दोरी. 

तरी सुघ्दा पोरांना आयुष्यात पुढे खेचतातच पोरी 

पळभर कळ

 तिरप्या नजरेने हळूच टाकलास तू गळ 

कळलेच नाही, तु माझ्या ह्दयात ठोकला तळ

तुझ्याविना आता जात नाही एकही पळ 

अजून किती वाट पाहू, काढू कशी मी कळ

कळ

===========

टपोरे डोळे त्यात काजळ

जणू वाळवंटात दिसले मृगजळ 

बघताच क्षणी तुला झाले जीवन सफळ 

परीसस्पर्शाने तुझ्या जीवनवेलीची वाढवू फळ-फळावळ 

साठवण

तुझ्या आठवणींना साठ साठ साठवलं 

साठी पर्यंत प्रतारणेचं दुःखच कवटाळलं 

कधी वाटतं नक्की काय टाळायला हवं होतं

तुझ्या कवेत अनुभवलेलं  प्रेम 

कि तुझ्याविना भरलेले दिवसांचे रिकामे रकाने 

दोळी

 तुझं नी माझं जुळलं 

अन् अख्खं जग जळलं 

Sunday, May 04, 2025

स्मरण कि विस्मरण

माझ्या सगळं लक्षात आहे अजून .. 

अजूनपर्यंत जे लक्षात आहे तेच सर्वस्व

असंबध्द

चारोळी लिहावी .. तर सुचतच नाही काही 
पण विचार केला तर सुचतच काही ना काही 
 चारोळीला या नाही काही मुद्दा 
 चारोळीला या नाही काही मुद्दा 
 तरीही लिहिली म्हणून तिनं मारला जोरात गुद्दा 
 तिला म्हटलं , अग लिहीली म्हणून वाचली 
त्यावरून ती अजूनच चेकाळली, अन चक्क चावली!!!

Friday, March 21, 2025

समिकरण

काळाचं समिकरण सोडवायची गरज नाही ते जुळवण्याची जवाबदारी काळाचीच. वेळ येताच ते जुळणार हे नक्की आपल्याला ते फक्त समीकरण समजलं पाहीजे समजल्याने ते बदलणार नाही, पण जीवन सुसह्य होईल. श्वास घेता येण महत्वाचं, त्यासाठी हवा दिसण्याची गरज नसते, पण जीव वीयूचं प्रमाण कमी होतय हे कळलं तर दीर्घ श्वसन करुन ते सुसह्य होण्याईतपत समज असणे गरजेचं आहे.  गरजेच म्हणजे, समजलं तर जीवन सुसह्य होईल … नाही तर जे व्हायचं ते होणारच आहे … शेवटी भौतिक जग हे भौतिकशास्त्राच्या नियमानेच चालणार, आणी जीवाने कितीहि उड्या मारल्या तरी त्या जीवशास्त्र्यांच्सा नियमा पुढे तोडक्याच पडणार … पण या सगळ्यांचा समतोल — काळाच्या समीकरणाने रहाणार.

Sunday, March 16, 2025

त्रिकुट भुकटी


चकणा, दारु जोडीला सिगरेट

जुन्या मित्रांबरोबर अशीच असते गाठभेट

खादाडी त्रिकुटी मैत्रीची, 

घटकाभर मौज, पुंजी जीवनाची 

घालव वेळ वायफळ, जळू देत देह अंतरी

जन्मोजन्मीचा आहे हा फेरा, पाठीशी उभा धनवंतरी 

जन्मतःच मृत्यु निश्चित, 

न केलेल्या पापाचे 

उगीचच का फेडत बसावे प्रायश्चित

टुंड्रा प्रदेशातले प्रेम

असली कितीही थंडी 

घालते ती फक्त छोटी चड्डी आणी बंडी

बघून तिला मलाही येत उसने अवसान

या राणीपाई नोकरीला मारेन मी ठोकर

बॅास ला सांगेन. मी नाही कुणाचा नोकर 

घरी बसून विणेन मी लोकर 

वाजलीच थंडी,  तर 

मी अन ती घालीन विणलेल्या लोकरीचा स्वेटर 

कर्माचा सिध्दांत

आयुष्याची आतां झाली उजवण

येतो तो तो क्षण अमृताचा।

जें जें भेटे तें तें दर्पणींचे बिंब

तुझें प्रतिबिंब लाळेगोडे।


सुखोत्सवें असा जीव अनावर

पिंजऱ्याचे दार उघडावे।


संधिप्रकाशांत अजून जो सोनें

तों माझीं लोचने मिटों यावीं।


-बा.भ.बोरकर.

===========================

culinary explorations result into in  Artistic expression 

===========================

कर्माचा सिध्दांत

===========================

दुपारच्या जेवणामुळे रात्रीच सुरु झाली हगवण

संडासापर्यंत पोहचेतोवर मोजले १०० अमृतक्षण


पावलोपावली एकच होती धास्ती

थेंब थेंब म्हणता म्हणता चड्डी होतेय का पिवळी चिंब

दर्पणी न बघताच दिसले होते माझे मलाच खव्वयै प्रतिबिंब 


सुखोत्सवें असा जीव अनावर पिंजऱ्याचे दार उघडावे


वाटत होते जोरात रडावे

मोकळीकतेने उडला फवारा 

सगळेच संपले हेवेदावे 

पसरताच सर्वत्र पुरावे

मनस्वी सोडला सुस्कारा 


आतड्यांनीच जणू केला पुकारा

जगणार उद्या नक्की खाण्यास नव्याने चविष्ट कचरा 


आठवडा

एक, दोन, तीन, चार

म्हणता म्हणता जातात सात वार 

आठवून आठवून पावातले वडे

ठकलतो कसेबसे आठ आठवडे 


संपतो आहे quarter म्हणत म्हणत 

कण्हत कण्हत रिचवतो quarter 


वड्याच्या दिवास्वप्नातच जातो आठवडा

सत्यनारायण

 
सत्यनारायण आणी त्यानंतरची कथा

अशी आहे आपली प्रथा 

साजूक तुपात प्रसादाचा शिरा

तात्काळत वाट बघण्याची व्यथा 

सांगावी कशी नी कुणाला 

चिंतेने या ताणल्या मेंदूच्या शीरा 

त्यातून गुरुजीही आले उशीरा 


संयमाचे धडे मिळतात करून असली प्रतीक्षा 

पण त्या त्यावेळी मात्र वाटते हि बळजबरीची शिक्षा

एक ना अनेक, आपल्या पंरपरांचा मोठा वारसा 

काहींना लहानपणीच मिळते अशीच दिक्षा 

काळजी

 


काळ जात गेला तसा तसा जीव अडकत गेला

जीव अडकल्याने काळ जात गेला 

काळ आणी जीव चा झाला गुंता 

काळजीचा उत्पन्न झाला बागुलबुवा

केले मग अनेक पीर बाबा दारु दवा

काळजीला नाही काहीच उपाय

पाय वर करून पहूडण्यापलिकडे 

उरलाच नाही आता पर्याय 

महाकुंभ

कुंभात कुंभ महाकुंभ
पर्वणीचा काळ त्यातून त्रीवेणी संगम
सोडूनिया दंभ
आत्माचा करावा परमात्म्याशी समागम

महाकुंभ

आला आला महाकुंभ 
सोडून द्या मिध्या दंभ
गंगा यमुना सरस्वती, त्रिवेणी संगम
आत्मा चालवी पंचभूती जंगम
आत्म्यास होई परमात्माची अनूभूती क्षणिक
उर्वरती आयुष्याचा बसेल चांगला जम