Sunday, September 15, 2019

दिलफेक आशिक

कधी भरल्यापोटी खातो लोणी
कधी उपाशीपोटी पितो नुसतेच पाणी
कधी गोड गळ्याची ऐकतो गाणी
तर बसक्या घश्याने वाजवतो पिपाणी
तुझ्या बरोबर सगळ्यातच मजा
अन् तुझ्याविणा सगळ्याचीच सजा
म्हणून तर तूच माझी राणी

थांगपत्ता

देवा, तु मला एक गोष्ट सांग
लागू का देत नाहीस तुझा पत्ता थांग
कधी म्हणतोस आधी बाळासारखा रांग
तर कधी करतोस आद्या शोधण्यास तळ सागराचा अथांग

तंत्र

षडरीपुंनीच रचले हे षडयंत्र
नुसता गदारोळ सर्वत्र
समजो वा न व समजो तंत्र
चालवायचे सगळ्यांनाच हे शारिरीक यंत्र

Tuesday, August 13, 2019

नश्वर


आत्ता नको, नंतर कधीतरी
असे म्हणून सतत पुढे ढकलायचे
काहीतरी, कसतरी, करून काम अर्धवट संपवायचे
मुढापरी विश्वास ठेवून
मोजकेच असलेले हे श्वास अजून किती उधळायचे
हे नश्वरा, जगण्याचे गुपित तुला कधी कळायचे ?




Saturday, August 03, 2019

वहाणप्रेमी मैत्रीमैत्रिणींस समर्पित

व्यवहारसाठी ती(तो)फारच अजाण
क्षुल्लकशी घेण्यासाठी वहाण
तिने(त्याने) ह्रदयच ठेवले गहाण
त्यानंतर सगळीच झाली घाण

सुट्टीचा कार्यक्रम

कधी खेळू विट्टी दांडू
तर कधी बघू फळकूट चेंडू
कधी बागेत पेरू झेंडू 
तर कधी नुसतेच फिरू हिंडू

घरघुती बागकाम

प्रवेशदारी विखूरलेले होते बारीक दगडधोंडे
ईकडेतिकडे, सगळीकडे चिखलाचे शिंतोडे
बघून माखलेले इवले इवले जोडे
क्षणात सुटले मला पडलेले कोडे

स्मृतीं

आयुष्यभर बाळगली हक्काने स्वःताची झोळी
वजनही वाढवलं, खाऊन रोज गर्वाची गोळी
अचानक जमली अवतीभवती बघ्यांची टोळी
उंच, ढेंगणी, तर काही पांढरी, काळी
झटक्यात उघडली त्यांनी माझी झोळी,
येताच माझी पाळी
होती त्यात फक्त जुन्या अनुभवांची खिचडी शिळी

अनुभूती

समुद्र तोच, पण प्रत्येक लाट नविन
सुर्य तोच, पण प्रत्येक सकाळ नविन
चंद्र तोच, त्याचे भांडवल करणारा प्रत्येक रोमियो नविन
वेळही रोज तीच, पण क्षणोक्षणी काळ नविन
मेंदू तोच, पण विचार नविन
शरीरहि तेच, करामती नविन
चारोळ्यांचे विषयही तेच, उपरती नविन

भानामती

कुणास ठाऊक कुणी केली भानामती
भानहि नाही राहत, मंद होऊ लागली मती
अजून किती चुका करणार जमा अक्कलखाती
दिवसागणिक, अवघड होतंय ढकलणं रती

Saturday, July 20, 2019

move on.
======================
गाडीची हौस भागवली जर टांग्यावर
वाड्याचं तेल पडणारच वांग्यावर
वांग्याचं करा आता भरीत
बाकी सगळं घाला चुलीत

Thursday, July 18, 2019

प्रॉब्लेम सॉल्व्हर्स प्रॉब्लेम

घरात माझ्या सतत उत्पात
हृदयावर माझ्या अनेक आघात
नेटाने प्रश्नांवर करतो प्रघात
तरीही निरुपयायोगी मीच सगळ्यात 

Saturday, July 13, 2019

लबाड रोमियो

लबाड रोमियो
===========================
जीभ अजूनही चावली का जाते इतक्या जोरात?
तू राहात नाहीस ग आता माझ्या हृदयात
घेतल्या होत्याखऱ्याच आणाभाका
लक्षात ठेवेन तुला, असेपर्यंत मी हयात
पण काय करू? विसरलो मी आता
कारण गोंडस बायको आहे घरात

अनुभवी चाळणी

त्याच त्याच जुन्या आठवणी
जुन्या सवयी पडल्या अंगवळणी
दोन्हीशिवाय जीवन अळणी
आणि वास्तविकतेशी सतत फाळणी

Saturday, July 06, 2019

The boiling frog

माझ्या टीकांचा मलाच बसतो चटका
चटका बसला तरी बसलोय टिकून
टिकून बसलो म्हणूनच नाही आता सुटका
सुटकेचा मार्गच नाही, कसे काय सटका?

माकडचाळे


माझ्या मनाचा मलाच लागतो चटका
द्या कुणी तरी मलाच माझ्यापासून सुटका
बसुद्या शांत,  दोन घटका
मनातल्या माकडांनो इकडून लगेच सटका

Wednesday, July 03, 2019

लुप्त

मी वेगळाच, ठोकून देते जनता बेलाशक
सगळेच सारखे, नाही काही यात शक
गंमत बघण्यास हजारो संख्येने हजर दर्शक
डोळ्यांदेखत अदृश्य, मुळातच मी पारदर्शक

Tuesday, July 02, 2019

बेजार गुलजार

मानवजातीस झालाय आजार
प्रत्येक गोष्टीचा भरवतो बाजार
हातावर टेकवताच रक्कम हजार 
विकण्यासहि तयार, नेसती विजार 


 

कोडे

मोठ्ठ्या कवटीत मेंदू लहान
डुंबत डुंबत करतो स्नान
ओळख पाहू मी कोण?

वय-उतारवय

दिवसामागून जातात दिवस, वाढत जातं वय
शाळेत वर्षाॅमागून जातात वर्ष, परीक्षांचं सतत भय
नोकरी-चाकरी, पगार हफ्ते, नको त्या गोष्टिंची सवय
लग्न होताच जीवनात येतो मोठ्ठा प्रलय
बायकोमुळे हेलपाट्यांनाही लागते मंजूळ लय

नवराबायकोंच्या या संसाराची तुटणार नाही लय
कितीही मोठा आला जरी प्रलय
सगळ्याचीच झालीय सवय
कशाचच नाही आता भय
पोरासोरांचही आता वाढू लागलंय वय