Monday, July 03, 2017

चऱ्हाट!

मातीतुनी जन्मला,
धूरापरी हवेत विरला.
कुणी सगळाच पुरला,
क्षणात सारा समाज विसरला!
असली कीर्ती कितीही अफाट,
जरी बरेच पडले तुमच्यामुळे चाट.
तुमच्या काळरात्रीनंतरही,
होईलच नवी पहाट...
जगाचे चालेलच चऱ्हाट!

No comments: