Thursday, February 26, 2026

पोखरण

 

मुतात मारल्या मासोळ्या चार 

म्हणे आमच्या बुध्दीला भारीच धार

काम सगळीकडेच थातूर मातूर 

सोमवारपासूनच शुक्रवारसाठी जीव आतूर

ढकलपट्टीच सगळी, त्यातून मी चतुर 

बिनधास्त करतो जी हूजूर जी हूजूर

चढवतो चरबी बनून थोडासा अजून मग्रूर 

पण खरं सांगतो, मीच माझ्याशी झालोय फितूर 

कल्पनाविलास

पावसात न कधी भिजलो इतका

भिजलो घामाने मी उन्हात

काय हा Seattle चा उन्हाळा

लावा पंखे घरा घरात

वास्तविकता

---------------------

बायकोच्या भीतीनेहि कधी थरथरलो नाही इतुका

कुडकुडलो मी इतुका थंडीने आज पहिल्या प्रहरी

काय हा Seattle हा उन्हाळा 

बंडि घालूनहि गारठलो मी भर दुपारी

Saturday, February 21, 2026

मैत्रीचा नगारा

 साखर, दूध अन् चहापत्ती,

सोबतीला आल्याचा तो स्वाद,

गरमागरम वाफाळलेला चहा,

सगळे करतात पटापट स्वाहा 

मित्रांसोबत गप्पा.. अचानक सुटतो पाद.. 

हसतात मग सारे , चहाच्या टपरीवर वाहता सुगंधी वारे

सगळे घालतात मग उगीच वाद

जाणून घेतात कुठचा नगारा करतोय नाद

Monday, February 16, 2026

औषधांची गोळी


आपली बाग राखावी आपणच, आपणच जणू माळी

खात्रीने सांगतो, 

कधीच घ्यावी लागणार नाही औषधाची गोळी 


उठावे पहाटे, ऐकावी भूपाळी 

खात्रीने सांगतो, 

कधीच घ्यावी लागणार नाही औषधाची गोळी 


गाय असो का म्हैस काळी 

न चुकता प्यावे तिचे  दूध दर सकाळी 

खात्रीने सांगतो, 

कधीच घ्यावी लागणार नाही औषधाची गोळी 


खावा रोज वरण भात भाजी आणि पोळी 

खात्रीने सांगतो, 

कधीच घ्यावी लागणार नाही औषधाची गोळी 


झोपावे पथारी पसरवून, आली कितीही कठीण पाळी 

खात्रीने सांगतो, 

कधीच घ्यावी लागणार नाही औषधाची गोळी 


न पाडतां आठ्या भाळी 

मित्रांच्या पाचकळ विनोदांना द्यावी दाद, मारून टाळी 

खात्रीने सांगतो, 

कधीच घ्यावी लागणार नाही औषधाची गोळी 


कशीही असली, 

तरी आपल्या सगळ्यांसाठी रचली ही चारोळी 

वाचल्या बद्दल धन्यवाद अन् 

खात्रीने सांगतो, 

कधीच घ्यावी लागणार नाही तुम्हास आता औषधाची गोळी 

Tuesday, February 10, 2026

सायकल

 

“अरे ती/तो एकदम सायकल आहे.”


सायकल म्हणजे काय?

साय खाण्याकडे ज्यांचा कल असतो त्याला सायकल असे म्हणतात



कुरबानी

 टूटे हुऐ दिल कि दास्ता ना सुना गालिब

दिल तो दे दि या उसको कब का 

न जा ने कहा चली गयी वो 

दिये दिल के, टुकडे भी मिले तो होगी मेहरबानी

बडी जालीम है वो, झट से दी हमारी कुरबानी

खाद्यप्रवास

 

खाद्यप्रवास

=====================

लहानपणी खातसे फक्त पोळी आणी भाकरी 

खातो आता नान नी डोसा , 

जोडीला एखादा समोसा 

करता करता परदेश चाकरी


कधी ढोकळा कधी इडली

आमची स्वारी फिरली रोम नी ईटली

हाती होती फक्त भरवश्याच्या चहाची किटली


गरम तव्यावर जाड उत्तप्पा

कुणाचं काय तर कुणाचं काय.. फुकट गप्पा

कुणालाही कशाचाच लागत नाही थांगपत्ता 


सांबाराला फोडणी जळकी

जोडीला खोबर्याची चटणी 

घरगुती कामांची केली समान वाटणी 

त्यामुळे सगळ्यांचीच राहीली शाबूत टाळकी


वरण भात तर कधी कढी खिचडी

जोडीला लसणाची फोडणी तर कधी पापड

लागते झोप निवांत, न लावतास डोळ्यांस झापड



Monday, February 09, 2026

बंजर

देखते देखते गये दिन गुजर

सोचा न था ऐसाभी आयेगा मंजर

फुल तो खिले है मस्त

न जा ने हम ने क्यो सोचा 

जमीन अपनी है बंजर

परीवर्तंन


केळ खाण्यास टाळमं टाळ

पण त्याच केळ्याचे काप खाण्यास सदा सज्ज


उकडलेली अंडी खाण्यास टाळंम टाळ 

पण तेच अंड घालून केलेला केक खाण्यास सदा सज्ज


दूध पिण्यास सतत  टाळंम टाळ 

दुधाची कुस्ती खाण्यास  सदा सज्ज


द्राक्ष किनई आंबटच असतात.. पुन्हा टाळंम टाळ

त्याच द्राक्ष्यांची बनवली मदिरा.. पिण्यास सदा सज्ज

तेच ते

मेंदुला माझ्या मोजक्याच वळ्या

वेळोवेळी तेच ते प्रसंग, नी तेच ते अनुभव

पर्यायी तेच ते विचार, आणी त्यामुळे तेच ते आचरण.

हाताची कमाल

मी: “आज रविवार, मोकळा दिवसं आहे”. असं जाहीर करताच मला लक्षात आलं - “हात दाखवून अवलक्षण म्हणजे नक्की काय”. 

ती : “अरे वा, बराच पसारा झाला आहे, तु आवरून टाक, पण भांडी घासून झाल्यावर”. असं म्हणून ती हात धूऊन माझ्या मागेच लागली. 

मी : “अगं, सकाळपासून माझी पाठ दुखते आहे. थोडा आराम करायला हवा आहे”. असं म्हणून मी हात वर केले. 

ती : “असं का?  थांब मी तुला लाटण्यानेच पाठ चोळून देते”. 

तिचे अवसान बघून माझ्या लगेच लक्षात आले कि तिच्या हातावर तुरी देऊन काम टाळणे शक्यच नाही, माझ्या आळसाने तिच्यासमोर हात टेकले, आणी मी हात धऊन भांडी घासू लागलो. काम करता करता, माझी पाठदुखी देखील हात चोळीत, फारसी तसदी न देताच निघून गेली. 

तिचा हात धरल्यापासून लक्षात आलं - वामांगी रखुमाई याचा अर्थ असा आहे की, पांडूरंग हा हा रखुमाईचा जणू उजवा हात आहे, पर्यायाने पांडूरंगही निवांत बसू शकत नाही, विटेवरही त्यासी उभेच रहावे लागते.

पर्व उलटलं, जणू परवाच

पर्व उलटलं, जणू परवाच

==========================

पूर्वी भेटायचो आम्ही रोज, तर कधी दिवसाआड

न करता कशाचीच पर्वा 

म्हणायचो ऐकमेकांना

पुरवू याच आठवणी, पुरवून पुरवून आठवू, 

अगदी पुरे पर्यंत…


परवा अचानकच भेटलो पुन्हा, 

पुर्वी प्रमाणेच, ना काही तयारी, ना काही नियोजन

फक्त आतुर उत्कटता नी जोडीला उत्स्फूर्तता

पुर्वी प्रमाणेच, परवा भेटलो तेव्हा परवा भेटू म्हटलं 


डोळे पाणावले.. पुर्वी असचं म्हटलं होतं

बघता बघता परवा ऐवजी अख्खं पर्वं उलटलं होतं 

क्षणात परत हसू उमटलं 

पर्व उलटलं तरी अगदी परवाच भेटलो असं वाटलं 


पर्वा न करता .. कशाचीच. 

चक्र चालूच राहिलं.. 

चक्र चालूच राहिल..

पर्व उलटलं तरी उद्यानंतर परवा..येईलचं…

Friday, February 06, 2026

त्रागा

केला गुन्हा तर कर शिक्षा

जाऊ नकोस सोडून

तुझ्यासाठी सुर्यास घालीन प्रदक्षिणा 

मानवा, किती रे धरशील दुरावा 

मीच तर आहे ना तुझी वसुंधरा 

युगानी युगे फिरते गरा गरा 

तरीही मलाच देतोस त्रास

कचरा , प्रदूषण, वृक्षतोड .. सगळीच विल्हेवाट 

प्रगतीच्या नावाने धावतोस सैराट

वैताग वैताग वैताग 

त्रागा त्रागा त्रागा 

बघ बरं, सापडते का महिवाट 

मंगळावर मांडणार आहेस ना तुझा सारीपाट

जा खुशाल …. खुष रहा

तुझ्यानावाने पेटवेल मशाल, 

दमलेरे आता, थांबवते आता मारणं चकरा

होईल आपोआप तुझ्या कचर्याबरोबर तुझाही निचरा 

फजिती


केस विंचरताना धरला डोक्यामागे आरसा 

अचानकच दिसलं हे भलं मोठं टक्कल

तेवढ्यात तुटलं कमरेवरल्या चड्डीचं बक्कल

क्षणार्थात एकच गोंधळ, नुसती त्रेधातिरपीट 

पण क्षणिकच, चालवली होती मस्त शक्कल

आठवण ठेऊन दरवाज्याला लावली होती कडी

हसू लागलो एकांतात, उमगताच माझी फजिती