खाद्यप्रवास
=====================
लहानपणी खातसे फक्त पोळी आणी भाकरी
खातो आता नान नी डोसा ,
जोडीला एखादा समोसा
करता करता परदेश चाकरी
कधी ढोकळा कधी इडली
आमची स्वारी फिरली रोम नी ईटली
हाती होती फक्त भरवश्याच्या चहाची किटली
गरम तव्यावर जाड उत्तप्पा
कुणाचं काय तर कुणाचं काय.. फुकट गप्पा
कुणालाही कशाचाच लागत नाही थांगपत्ता
सांबाराला फोडणी जळकी
जोडीला खोबर्याची चटणी
घरगुती कामांची केली समान वाटणी
त्यामुळे सगळ्यांचीच राहीली शाबूत टाळकी
वरण भात तर कधी कढी खिचडी
जोडीला लसणाची फोडणी तर कधी पापड
लागते झोप निवांत, न लावतास डोळ्यांस झापड
No comments:
Post a Comment