Monday, February 09, 2026

पर्व उलटलं, जणू परवाच

पूर्वी भेटायचो आम्ही रोज तर कधी दिवसाआड

न करता कशाचीच पर्वा 

म्हणायचो ऐकमेकांना

पुरवू याच आठवणी, 

पुरवून पुरवून आठवू, अगदी पुरे पर्यंत

परवा अचानकच भेटलो पुन्हा 

पुर्वी प्रमाणेच, ना काही तयारी, ना काही नियोजन

फक्त आतुर उत्कटता नी जोडीला उत्स्फूर्तता

पुर्वी प्रमाणेच, परवा भेटलो तेव्ह परवा भेटू म्हटलं 

डोळे पाणावले.. पुर्वी असचं म्हटलं होतं

बघता बघता परवा ऐवजी अख्खं पर्वं उलटलं होतं 

क्षणात परत हसू उमटलं 

पर्व उलटलं तरी अगदी परवाच भेटलो असं वाटलं 

पर्वा न करता .. कशाचीच. 

चक्र चालूच राहिल.. 

पर्व उलटलं तरी उद्यानंतर परवा..येईलचं…

No comments: