Friday, February 06, 2026

त्रागा

केला गुन्हा तर कर शिक्षा

जाऊ नकोस सोडून

तुझ्यासाठी सुर्यास घालीन प्रदक्षिणा 

मानवा, किती रे धरशील दुरावा 

मीच तर आहे ना तुझी वसुंधरा 

युगानी युगे फिरते गरा गरा 

तरीही मलाच देतोस त्रास

कचरा , प्रदूषण, वृक्षतोड .. सगळीच विल्हेवाट 

प्रगतीच्या नावाने धावतोस सैराट

वैताग वैताग वैताग 

त्रागा त्रागा त्रागा 

बघ बरं, सापडते का महिवाट 

मंगळावर मांडणार आहेस ना तुझा सारीपाट

जा खुशाल …. खुष रहा

तुझ्यानावाने पेटवेल मशाल, 

दमलेरे आता, थांबवते आता मारणं चकरा

होईल आपोआप तुझ्या कचर्याबरोबर तुझाही निचरा 

No comments: