स्वयंपाकघरात एक वाफाळणारा चहा,
माजघरात पिता येईल इतकं बादलीभर शुद्ध पाणी;
चहा पिता-पिता अचानक सुरू होते आणीबाणी!
स्वयंपाकघर, माजघर, प्रदूषणाने भरली हवा,
आपलेच दात, आपलेच ओठ;
प्रदूषणाबाबत देणार कोणाला दूषण?
परस-दाराकडे त्वरित सुरू खडतर प्रवास,
न करता पर्वा, आला जरी कुठलाही वास;
जणू वेळेत पकडली आगगाडी, नव्हे...
जणू धावत पकडली सुटलेली बस, नव्हे...
जणू उडता उडता धावपट्टीवरच रोखले विमान!
सुरू झाला असला कल्पनाविलास,
सोडता सोडता सुटकेचा श्वास;
पुन्हा एकदा जिंकली होती शर्यत,
आपसूकच झाली मान ताठ;
वेळेतच सोडता आली होती नाडीची गाठ!
दोन टमरेलमध्येच आटोपलं काम,
नाहीतर कमी पडले असते धुण्यास भरलेले दोन माठ.
बिकट परिस्थितीतही मिळतो मार्ग,
मानलं तर पाकिस्तानातही स्वर्ग;
जीवन किती सुंदर आहे,
अहाहा अहाहा अहाहा!
No comments:
Post a Comment