Monday, June 02, 2025

रसायन

रसायन होते फारच कडू

वास घेताच आले रडू

रडता रडता घेतला घोट

घोट गेला घशात

घशात जातात आली गरमी

विचारात आली नरमी

घोटाने घोटला चिंतेचा गळा 

भावनिक उद्रेक वाहिला भळाभळा 

ओलावला गळा गाऊ लागला रसाळ

घोटावर घोट, घोटावर घोट 

संवेदना झाली मवाळ

No comments: