समजा म्हातारे झालात!
समजा तुम्ही प्रेमात आहात!
समजा तुम्ही तरुण आहात!
समजा तुम्ही अजून बालिश आहात!
This blog is to say Hello to the world of Blogs :) Yeah, now i am going to get my thoughts across to you people out there even faster and efficient way. Hope you find this helpful and interesting.. Keep Blogging :)
सध्या सतत चालू जीवाचा आटापिटा,
"धावा जोरात," म्हणतो घड्याळाचा काटा!
"धावा जोरात," म्हणतो वजनाचाही काटा!
"धावा जोरात, बसलाय काय नुसता घरात?
घ्या गहू, दळून आणा पोळ्यांसाठी आटा!"
बायकोचा आवाज पडताक्षणी कानात,
अंगावरही येतो मग काटा!
काट्याने काटा तर सोडा,
"काटा रुते कुणाला" हे एकायला देखील नाही वेळं;
त्यामुळे करतो आता टाटा, टाटा आणि टाटा!
एक होतं पाखरू,
लाडू खाण्यास आतुर,
नाही कुणीच चिंतातुर
चिंतनात लाडवाच्या, काढला दिवस उपवासाचा,
क्षणोक्षणी मेंदू होऊ पहात होता फितूर.
वरवर जरी उपवास इच्छाशक्तीला
करीत होता तो जी हुजूर जी हुजूर ॥१॥
तरलो कसा बसा खाऊन साबुदाणा, भगर.
पोटात तरी ओरडतंच होते कावळे,
दिला त्यांनाही नैवेद्य सुका मेव्याचा,
टाकून प्रामुख्याने काजू नी खजूर ॥२॥
आषाढीच्या दिवशी बाळगले मनात हेच विचार,
न लागू देता कुणास ताकास तूर।
पांडुरंगही हसून विचारतो,
"किती रे होऊ पहातोस चतुर?" ॥३॥
तो प्रेमळ, करीतो तरीही तोच कृपा,
व्यावसायिक जगातही तो,
निःशुल्कच करतो दूर, सगळीच कसूर! ॥४॥
तिच्यासाठी प्रेमाने हृदयातच फुलवली बाग
ती वावटळ, फिरते इकडे तिकडे…
अचानक येऊन एक दिवस, लावते त्यालाच आग
त्यालाही येतो की कधी कधी राग
खुरडून टाकतो सगळा फुलोरा
वाटतं तिला मग, हाच तो ह्या बागेतला काळा नाग
रात्री होतात छप्पन भोग,
नव्याने होते सकाळ,दोघेही करतात अविचाराचा त्याग
दोघंही पिछाडलेले, झालाय त्यांना प्रेमरोग
प्रेमाचे असतातच मुळी वैयक्तिक योग
नको लागू देऊ प्रेमास त्यांच्या कशाचाही डाग!
जे काही..ते सगळं तिच्यासाठी,
तरीही तिच्या साडीलाही असतो पदर ॥१॥
पण जाणवलं का कधी कुणाला,
तो कधी पदर पसरूच शकत नाही;
कारण सदऱ्याला मुळी नसतोच पदर!
अन् त्रासला कितीही जरी तो,
असते का कुणाला त्याची कदर ? ॥२॥
सुखी माणसाचा मिळणारच नाही कधी सदरा
हसला जरी तो वरचेवर,
हसतो तो फक्त वरवर ॥३॥
समस्या असो एक किंवा दहा हजार,
हा आपला हजर, लढतो दररोज.. झुंजार!
ठोठावतो प्रत्येक दरवाजा,
न होता बेजार,देतो निकराची झुंज,
सांभाळण्यास सदरा नी विजार ॥४॥
प्रत्येकजण स्वतःपुरता तरी असतोच मुळी आतून धुरंधर ॥५॥
मुळातच असेल छत्तीसचा आकडा तर
चांगली संधी देखील सुटते, बसावे लागते
सतत हात चोळीत...
पण सोबत असेल चांगली तर... हात सतत चोळीत!
सोबत चांगली असेल तर
महासागरातही चालते गलबत सुरळीत,
सोबत असेल चांगली तर
सुसरबाईची पाठही भासते गुळगुळीत;
सोबत असेल चांगली तर
आयुष्यातल्या मोठ्या अडचणी भासतात मुळमुळीत,
मुळातच असेल छत्तीसचा आकडा तर
चांगली संधी देखील सुटते, बसावे लागते
सतत हात चोळीत...
पण सोबत असेल चांगली तर... हात सतत चोळीत!
सोबत चांगली असेल तर
महासागरातही चालते गलबत सुरळीत
नको त्या आमीषास बळी पडला तर
अमर्याद महासागरातही मासा अडकतो गळात
माझ्यातला प्राणी, माझ्यातला माणूस
मानवी शरीर, शरीरात आत्मा
सगळ्यांचा लगाम धरतो परमात्मा
विचार करता करता
होतोय मेंदूचा… खात्मा
नाही नाही,
करावा अहंचा खात्मा।।
काकांनी रचला भाग दोन,
माझ्यातर्फे त्यांना ice creme चा कोन
तसदी देत नाही त्यांना करून रिकामा फोन
काकांनी साधला आहे कवितेचा झोन
काकांचं मन उदार
डासांचे देखिल फेडले उपकार
रक्ताचे दोनच नाही, दिले जादाचे घे थेंब पाच
डासाच्या परोपकराचा जाणवणार नाही त्यांना जाच
I received a following forward, thought of extending it.
==
*गर्मीचा कहर...!*
*अकोला ब्रेकिंग*
मला रात्री बेडरुम मध्ये 2-3 डास फिरतांना दिसले....
मी उठून ऑल आऊट लावणार तेवढ्यात एक डास म्हणाला..
*"काका तुमची शपथ, चावणार नाही....* 🙏
*फक्त थोडा वेळ AC मध्ये राहू द्या"* 🫣
==
भरदुपारी गरमीचा कहर होता आणि ज्याची सगळ्यांनी धास्ती घेतली होती, नेमकं तेच घडलं. अचानक विद्युत प्रवाह खंडित झाला होता.
क्षणार्धात धापा टाकत थंड प्रवाहाचा झोत सोडणारा एसी बंद पडला आणि बाहेरच्या झळा आत येऊ लागल्या.
काका पार घामाघूम झाले होते. डास पण एसी बंद पडल्यावर काढता पाय घेऊ बघत होता.
काकांनी लगेच डासाला सांगितलं, "अरे जरा पंख फडफडव मानेजवळ, पण चावू नकोस. जीव जायचा... माझा नाही, तुझा! एक फटका मारीन..."
डासाला दया आली. तो बिचारा जीवापार पंख फडफडवून काकांना हवा घालू लागला. काकांचा घामाने जीव टांगणीला येण्याआधीच, त्या डासाच्या फडफडण्याने मिळालेल्या वाऱ्यामुळे जीव भांड्यात पडला होता.
आता काकांमधील भूतदया जागी झाली. ते म्हणाले, "दमला असशील, तहानेने कासावीस झाला असशील... हवं तर घे काढून दोन थेंब रक्त... पण बोटातूनच बरं का!"
दिले ह्रदय तुला
बरगड्यांनमध्ये बसवला भाता
येतेस का कवेत आता
एकत्रित करू रक्ताभिसरणाच्या बाता
रात्र रात्र जागतो मी, भूतासारखा
सकाळ होताच झोपतो मी, घुबडासारखा!
ओळखा पाहू कोण मी?
मी कोण? मी कोण? ..
कोण मी? कोण … मी?
कोण मी हे कळलं असतं,
तर जागलो असतो का मी भूतासारखा?
मान वळवून न्याहाळत बसलो असतो का तुला, असा घुबडासारखा?
मी कोणीच नाही, नाही नाही, कुणीच नाही ..
फक्त मी, फक्त…. मी..
हो मीच …
अहं ब्रम्हास्मी!
राजाची होती ती राणी पट्ट
घ्यावे तिने मिठीत घट्ट
म्हणून पुरवितसे तिचे सारे हट्ट
बघतां बघतां झाली ती निगरगट्ट