Wednesday, November 11, 2026

कॅाटी - OG

तो : तू फ्री आहेस का उद्या? कॉफी पिऊ, नवीन कॅफे उघडला आहे.
ती : उद्या? उद्याचं माहिती नाही, तसंही उद्या कोणी बघितला आहे! उद्याचं उद्या... आत्ता जस्ट काम आटोपलं आहे, बरा भेटलास. पण कॉफी नको.
तो : तेही आहेच. खरं सांगायचं तर मला चहाची तल्लफ आली आहे, लेट्स हॅव्ह टी!
ती : चालेल. चल मग.
तो : पण मला तुझ्याबरोबर कॉफी प्यायची आहे नवीन कॅफेमध्ये. तू इतकी स्मार्ट, डॅशिंग... Coffee in Cafe!
ती : मी डॅशिंग? तेही आहेच म्हणा, पण तुलाही शिंगं फुटलीच आहेत की!
तो : (ओशाळून, कारण उगीच कॉम्प्लिमेंट द्यायचा प्रयत्न तिने सपशेल पाडला) मग काय करायचं?
ती : Tomorrow is tomorrow, Today is today. Today Tea at Tapari; tomorrow, Coffee at Cafe.
तो : (एकदम खूश, जणू लॉटरीच लागली) चला... तुझ्याबरोबर कॉफी प्यायचा बेत होता पण टी तर नेहमीच हवा! तू माझी एकदम 'कॉटी' पार्टनर आहेस. कॉफी काय नी टी काय, नेहमी तयार... मला खूपच आवडतं!
ती : कॉटी पार्टनर काय?
तो : हो, कॉटी पार्टनर!
ती : हा... मलाही आवडलंय... आजपासून तू माझा कामटी पार्टनर!
तो : चल मग... let's have tea on tapari!
ती : (विचार करून...) टपरीवर नको, त्यापेक्षा रूमवरच चल. मी नवीन कॉट घेतला आहे, तुला माझी कॅट दाखवते आणि मग करत बसू कॉटी कॉटी... एकदम टकाटक कॉटी! (डोळा मारते)
तो : (गोंधळून) काय?
ती : अरे, तुला कॉटी कॉटीच करायचंय ना, मग कशाला उगीच आढेवेढे घेतोस? टपरीवर चहा पी, कॅफेत कॉफी... कशाला उगीच पैसे आणि वेळ घालवायचा! रूमवरच भेटू, अन् करू तिकडेच कॉटी कॉ..टी, कॉटी कॉ..टी!
तो : (पूर्ण गोंधळून, चाचरत) म्हणजे..!
ती : चल रूमवर, कॉटवर माझी कॅट दाखवते, कॉटी कॉटी करू... मी पण बघते किती वेळ कॉटी करता करता टिकतोस ते!
टिकलास तर तुझ्या नावाची टिकली नी तुला रोज टी, नाहीतर तुझ्या कॉफीची किटली आणि तुझ्याबरोबरच्या चहाची हौस फिटली!

No comments: