Monday, November 16, 2026

हुशार वेडा

कधी कधी वाटतं, बहुतेक वेड लागतंय;

तर कधी वाटतं, वेड लागतंय

हे जाणवण्याइतपत शहाणपणाने धरलाय की तग!

अहंकारी मी, तोऱ्यात पसरतो मग;

मारतो मीच माझ्यासमोर, माझ्याच शहाणपणाची फुशारकी,

वेडगळ मनोवृत्ती म्हणू लागते—

"वेड्या, एवढीच का तुझी हुशारी? 

तुला बहुतेक वेड लागतंय!"

No comments: