Tuesday, January 20, 2026

चारोळी

 

चारोळी माझी कधी खोल कधी उथळ

तर कधी शब्दांची अडगळ

तर कधी नुसतीच ध नी मा ची जोडगळ


कधी दाखवितो निसर्गाचे चक्र, वर्णून झाडांची पानगळ

तर कधी भासवितो पर्णरहिन वृक्ष अजागळ

जेव्हा वृत्तीत असते भरभरून मरगळ 


एकंदर काय, हे आहेत फक्त शाब्दिक गळ

विचारवंतांनी काढलाय केव्हाच पळ

हि चारोळी संपविण्यास गाठला आता वैचारिक तळ

गायछाप प्रेमी

 वैधानिक चेतावनी - तंबाखू सेवन सेहत के लिये हानिकारक हैं.. केवळ गम्मत म्हणून 

================

करावे नेहमी तंबाखूचे सेवन

बहूगुणकारी असे हे व्यसन

तोंडास राहते कुलूप

जगण्यास येतो मस्त हुरूप

Monday, January 19, 2026

कलियुग

कुत्र्याला घातले कपडे

अनं लोकं फिरतात आहेत नागडे

internet गुरु सांगतात शोधा देवाला 

internet गुरु सांगतात शोधा देवाला 

देव तुमच्यातच आहे. शोधा त्याला 

अन आम्हाला खिशातली घराची किल्लीही न सापडे

Sunday, January 18, 2026

चहा प्रेम


झाली सकाळ, हवा चहा

झाली दुपार , हवा चहा 

झाली संध्याकाळ, आता तर चहा हवाच 


आले काका, काकू , हवा चहा 

आले मामा, मामी, आजी आणी अजोबा, हवा चहा

आले पाहुणे, आता तर चहा हवाच


करु या नाष्टा, मस्का पाव, जोडीला हवा चहा 

भरपेट झालं जेवण, तसं जरा जास्तच, हवा चहा

भूक लागली, केले पोहे, आता तर चहा हवाच


हवा कुंद,  हवा चहा 

वारा वाहतो मंद,  हवा चहा 

सुटलं वादळ, आता तर चहा हवाच


पडलं ऊन, भाजले भुट्टे, हवा चहा 

वाजली थंडी, पेटवली शेकोटी, हवा चहा 

आला पाऊस, केली भजी , आता तर चहा हवाच


काम वाढलं खुपच, हवा चहा

आज सुट्टी, हवा चहा

कट्ट्यावर बसून मारायचा सुट्टा, आता तर चहा हवाच


सहकारी कर्मचारी करी चर्चा, हवा चहा

रस्त्यात भेटला मित्र, हवा चहा

भेटली मैत्रीण, तिला तर चहा हवाच 


काही तरी वाचावं, हवा चहा

काही तरी लिहावं, हवा चहा

करतो चारोळी, आता तर चहा हवाच

ईती चहाप्रेमी कवी उवाच 

Friday, January 09, 2026

उन्माद

शिखर कितीही असले उत्तुंग

त्याला आभाळाचे असते तुरुंग

कुणावरही कधीही येऊ शकतो कुठचाही प्रसंग

उगीच नाचू नये गुडघ्यास बांधून अर्धे बाशिंग 

सत्संग

सतत करावा सत्संग

करा किर्तन, वाजवूनिया टाळ नी मृदंग 

परमात्म्याच्या भक्तीत सदा दंग

अनुभवा निसर्गाचे विविध रंग

Monday, January 05, 2026

Times Square

वेळात वेळ काढून

गाठला वेळेचा चौक

चौकात होती हि भाऊगर्दी

गर्दीतही एकटाच होतो ना भाऊ

चलचित्र

 यावरून आठवलं .. 

लहानपणी सचिन अजयला म्हणला चल चित्रं पाहू .. सचिन तडक विकास बोलपट गृहात पोहचला .. अजयआपला घरीच वाट पाहतो - सचिन कधी येतो ते.  आणी सचिन तिकडे वाट पाहतो आहे. मग सचिन अजयच्या घरीपोहचला आणी त्याने अंजली खडसावून विचारलं - अरे मित्रा कुठे होतास ईतक्या वेळ .. बोल पटकन बोलपट गृहात का नाही आलास -  मला म्हणालास ना चलचित्र बघू .. 


अजय.. अरे मित्रा, मी म्हटलं चल चित्र पहायला .. चलचित्र पहायला नव्हे.  मी केव्हाची वाट पाहतो आहे , संग्रहालयात सारंग केव्हाच पोहचला .. त्याची चित्रं बघून झाली सुध्दा. 

लुंगी

ती म्हटली, आज रविवार 

बनवते ईडली वडा आणी दोसा

दोसा खाता खाता, सांडलं गरम गरम सांबार

ती म्हटली .. बदला लूंगी 

मी बदलली लगेच.. 

Tuesday, December 30, 2025

कलियुग


कुत्र्याला घातले कपडे

अनं लोकं फिरतात आहेत नागडे

विसरली नाती, विसरले प्रेम

मनात सतत विचार वाकडे

डोक्यात फक्त पैश्याचे आकडे 

देवा तुला घालणार तरी काय साकडे

मनुष्यापरी बरी आहेत कि रानातली माकडे

चहा

स्वतःच्याच विचारात स्वतःचेच कौतुक

नकोस रे उगीच ईतका मातू

आज पुन्हा तुझाच गेला कि चहा ओतू

ओतू गेलेल्या चहाचं आता नको वाटू देऊ वाईट

उरलेल्या चहा बरोबर केळी काप खातू 

Monday, December 08, 2025

आपली आवड

कोणाला आवडतात कबीराचे दोहे

मला आवडतात चहा आणी पोहे

आज आहे शनिवार 

चहा आणी पोहे खाणार वारंवार 

Tuesday, September 23, 2025

बाजार

समाजालाच झालाय आजार

आजकाल प्रत्येक गोष्टिचा भरतो बाजार

आजाराचा देखिल बनवून बाजार

आजाऱ्यालाच करतात बेजार

मराठीचा गदारोळ.. संपादकाला चेतावनी

अरे संपादका, तु या वर्तमान पत्राचं थोडं संपादन करत जा नाही तर जनता जनार्दन या वर्तमानपत्रचा उपयोग फक्त पादन क्षमता आजमावताना करतिलं. 

समासाच्या गमती जमती

अमर्याद प्रेम म्हणजे मर्यादातोडून नव्हे

निर्विवाद सत्य म्हणजे नवनविन वाद निर्माण करणार सत्य … नव्हे 

संवाद म्हणजे संमजस पणे वाद घालणे नव्हे 

सतर्क म्हणजे सतत तर्क नव्हे … 

वादक म्हणजे वाद घालणारा नव्हे तर वादन वाजविणारी व्यक्ती …

संपादक म्हणजे सतत … नको ते नं लिहिलेलंच बरं

——

समास सोडविण्याच्या प्रश्नात तुम्हाला फारच समस्या आल्यामुळे तुम्हाला देण्यात आलेल्या शून्य गुणांची समासामध्ये नोंद केली आहे, तरी सगळ्यांना सामवून घेण्याच्या उद्दात्त उद्देशापोटी समासात नोदवलेल्या समासाच्या प्रश्नाला दिलेल्या शून्य गुणांव्यतिरिक्त तुम्हाला ईतरांईतकेच समान गुण देऊन सामावून घेतले आहे … लावा अर्थ!

दिलफेक आशिकी

आशिके दिल.. संभल जा तू 

आशिके दिल संभल जा तू 

खंजर लिये खडे ये कातिल मार देंगे 

पर डरना नही.. 

तेरा दिल तो उसीके पास महफूज है 

Monday, June 23, 2025

विजोड लग्न

सजवला होता स्वप्नांचा महाल

लग्नात लावली डोक्याला झाल 

विजोड जोडी , निरस्वी जीवन झाले बकाल

रोजच्या त्राग्याने झाले बेहाल

सदसद्विवेक बुद्धीची तुटू लागली ढाल

अमृत समजूनी, पितो विष जहाल


Monday, June 02, 2025

शांतीच्या प्रियकराचअटळ प्रेम

 


शांतीच्या प्रियकराचअटळ प्रेम

=====================


मराठी खरडमपट्टीः याला काय शिर्षक द्याल?

===========

आत्म्याला जरी शरीरात कोंडलं तरी त्याला नैतिकतेच्या जाळ्यात अडकवून ठेवण्यास बुध्दीच काय सद्ःसदविव्क बुध्दि देखिल असमर्थ ठरते.  आणी चूकून माकून बुध्दिने तर्काचा अर्क काढला आणी बांधून ठेवला तरी आत्मा गतीने सद्गतीनंतर शांतीकडे वाटचाल चालुच ठेवतो. 

विचारमंथन

 विचारमंथन 

=======================•

पुर्वी कामगार कामचुकारपणे का होईना काम बरोबर करीत असत

थोड्या कालावधी नंतर कर्तबगार मंडळी कामात जाणूनबुजून चुका करीत

धुरंदर व्यक्ती जशी जशी कामांची सुत्रे हाती घेऊ लागली काही बिलंदर मंडळी कामसुत्रात व्यग्र होऊ लागली 

काही म्हणू लागली कामात खाडे टाकले तरी चालतिल पण ईंगलिश खाडी पोहून पार करणार हे नक्की 

वयोमानापरत्वे कामेच्छा .. (शब्दशः) म्हणजे काम करण्याची ईच्छा कमी होउ लागली … 

मग कर्म करीत रहाणे कसे महत्वाचे आहे हे तरुण मंडळींना जतवण्यास व्याख्याने सुरु झाली… 

आणी याच कामातूरतेने जगरहाटी हि चालू राहीली….

रसायन

रसायन होते फारच कडू

वास घेताच आले रडू

रडता रडता घेतला घोट

घोट गेला घशात

घशात जातात आली गरमी

विचारात आली नरमी

घोटाने घोटला चिंतेचा गळा 

भावनिक उद्रेक वाहिला भळाभळा 

ओलावला गळा गाऊ लागला रसाळ

घोटावर घोट, घोटावर घोट 

संवेदना झाली मवाळ