Stumbled upon this, so wrote this प्रतिसाद
===
रोज, अगदी रोज येतेस खिडकीत, वाजताच साडे दहा
जणू मलाच मनातल्या मनात खुणावतेस, मला येऊन पहा,
तु रोज ठरल्या वेळेस येणार तुझे काळे भोर केस बांधून
माहीती असूनही मी आपला तरीही धडपतच कसा बसा
येतो खिडकीत, अर्धी चड्डी अन् घरचं बनियन चढवून
कुंडीत नसलेलेल्या झाडांना देतो पाणी तुझं नाव घेऊन..
कसं ग जमतं तुला? कसं ग जमतं तुला..
ईतकी तंतोतंत वेळ पाळणं,
आणी ईतक्या दूरून,
कसं काय करतेसं माझं खेळणं
दिसतेस ईतकी गोड,
पण हे तर सर्रास छळणं
कधी बोलाव कि मला तुझ्या घरी प्यायला चहा
बघ धावतच येईन, घेउन मी माझं गाळणं
असो.. १-२ घटका का असेना, तेवढाच आपला विरुंगुळा
नाही तर चावतच असतो जबाबदार्यांचा मुंगळा
No comments:
Post a Comment