तंत्रज्ञान, विज्ञान पाजळले खूप ज्ञान
तांत्रिक, यांत्रिक सोडविल्या कित्येक अडचणी
नेतृत्वाच्या नावाने, केल्या कधी दाताच्या कण्या
तर कधी मारून दंडे चढवला बुरूज हिरकणी
सगळा खटाटोप होता मिळविण्यास फक्त दाणापाणी
हा काय किंवा तो काय स्तर, सगळ्या सारख्याच श्रेणी
नेतृत्वाच्या नावाने, केल्या कधी दाताच्या कण्या
तर कधी मारून दंडे चढवला बुरूज हिरकणी
सगळा खटाटोप होता मिळविण्यास फक्त दाणापाणी
हा काय किंवा तो काय स्तर, सगळ्या सारख्याच श्रेणी
पूर्वीच केली होती आपण पेरणी
आता नको कुणाची वाखाणणी, ना हवी राखणी
नको त्या गोष्टींना लावूया चाळणी
आता नको कुणाची वाखाणणी, ना हवी राखणी
नको त्या गोष्टींना लावूया चाळणी
आता फक्त तुझ्यासाठीच पाजळणार वाणी
जीवन जगू या मस्त, झुगारून वेळ अळणी
मज घे तू कवेत आता तरी राणी
वितळण्या आधीच जीवनातले लोणी
बाहेर होऊ दे खुशाल आणीबाणी!
जीवन जगू या मस्त, झुगारून वेळ अळणी
मज घे तू कवेत आता तरी राणी
वितळण्या आधीच जीवनातले लोणी
बाहेर होऊ दे खुशाल आणीबाणी!
No comments:
Post a Comment