बंद कर आधी तो पाण्याचा नळ,
नाहीतर लवकरच दिसेल सगळ्यांना समुद्राचा तळ.
येणाऱ्या पिढ्यांसाठी माझी कळकळ,
तर तुम्हाला वाटते, माझाच चालू आहे म्हातारचळ.
कचरा, प्रदूषण, जोडीला युद्धाची हिंसा,
वाढवते माझी मानसिक मळमळ.
काय म्हणेल पुढची पिढी बघून समुद्राचा तळ?
काय म्हणेल पुढची पिढी बघून समुद्राचा तळ?
"अरे बापरे! इतका कसा काय साठला मळ?"
फोटो टाकावा सोशल मीडियावर, दाबून फोनवरची कळ.
सूर्यदेव बघून हे सर्व म्हणेल—
"तळपतोय युगाने युगे, मानवा तू आता मात्र काढ पळ!"
"Facebook feeds will not feed humans, crops will! Invest time wisely." 🌾🚫📱
No comments:
Post a Comment