Monday, April 13, 2026

बोभाटा

 उगीच बोभाटा नको 

म्हणून म्हटल बंद दरवाज्या मागे करु या कि चर्चा

तर तिनं काढला त्यावरून भला मोठा मोर्चा 

मी म्हटलं, आता निघालाच आहात तर .. 

जरा वाड्यावर या .. काय, हवं तर तिथे करू चर्चा

मग काय, अजूनच वाढला गदारोळ 

मला समजेच ना, नक्की होतोय का ईतका घोळ

शेवटी म्हटलं, आता शेवटची संधी देतो 

करणार का चर्चा?

कि वेळ गेली म्हणून दोघे हात चोळीत बसू

जनता झाली वेडी, म्हणे आता डांबर फासू 

पण निळू फुलेंच्या चाहत्यांच्या गालात हसू

No comments: