Wednesday, April 22, 2026

चातक रोमियो


जे हवे होते मला ते काळजातून गाळले
त्याक्षणीच जणू मी मृत्यूला कवटाळले
दुःख राग लोभ ज्वालामुखीपरी उफाळले
मन, आत्मा, शांती त्यातच सारेच जळले
उरलेल्या राखेने शरीर फक्त मळले
जगतो आता भरून पोटाचे खळगे
कशाचेच मला वाटे ना वावगे
गद्य, पद्य, पुराण, कुठे मिळतील यावर तोडगे
शब्द, विचार, मन, समाज परिवार, सारेच कोडगे
प्रकृतीचा हा चाले खेळ युगांयुगे
युगांतर ओलांडेल शाश्वत प्रेम आपले
या जन्मी तुटले, पूर्वीच्या जन्मी मस्त जुळले
शांत झालो मी जेव्हा मलाही हेच पुन्हा कळले

No comments: