धडाला अवयव चार, प्रत्येक अवयवाला बोटे पाच
जणू लगद्यावर पसरली कात, पंचमहाभूतांचीच माया
जाणवताच जठरातील आग
कवटितला मेंदू एक, राबवितो पेशी प्रत्येक
चालवितो पावले, तुडविण्यास वाटेतील काच
वापरतो हात, करण्यास कामे अहोरात
निशंक जाळतो काया, वाटला जरी तो आत्मसंहार
लागलंच तर वाकवितो पाठीचा कणा ताठ
तर सहजतेने बांधतो हृदयातही गाठ
तोंडावर आलेले गिळतो मूग आणि राग
मिळविण्या दोन रोटी अन् सरसो का साग
No comments:
Post a Comment