गुन्ह्याचे असते बिकट कोडे,
वस्तुस्थितीस झाकू पाहतात लाख भ्रमाचे पडदे.
सत्य जरी नजरेसमोर दडलेले,
व्यर्थ कोकल कोकल कोकलते,
समाजाच्या कानास बसलेले असतात सतत दडे.
गुन्हेगारास वाटे तो हुशार,
गुन्हे करून मजेत बागडे,
जोवर त्यास ना भेटे शिरजोर करमचंद तगडे;
ओठांवर त्याच्या 'शट अप किटी'चा गजर,
अन् तोंडात सतत गाजर
डोळे चाणाक्ष
अन् कान त्याचे सदा उघडे
एक एक सत्याचा धागा ओढून,
गुन्हेगारास करीतो पार नागडे
No comments:
Post a Comment