Wednesday, April 08, 2026

होर्मुझचा तह


तू मला तेल देच

मी सगळ्यात बलाढ्य,

मी अख्ख्या जगाचा तलाठी

सगळ्यांत जोरकस माझीच लाठी ।।१।।


तू जा तेल लेने

अभी चखाता हूँ मजा

होर्मुझ ओलांडणाऱ्यांना देईन सजा

तेल लेना क्या, पड जायेंगे सबको लेने के देने ।।२।।


आता सुटणार कसा काय हा पेच?

कोण देईल कोणास शह?

जगालाच पोळणार हा दाह ।।३।।



त्यापेक्षा दोन आठवडे करू विचार

पूर्ण करू सट्टेबाजारातला आपापला मोह

तोपर्यंत करा की तात्पुरता तह ।।४।।


नंतर नराधमांना नि:शंक ठेच

त्यात सगळ्यांनाच लागणार थोडीफार ठेच

संबंधित नसून इतरांनाही खेच

सुटला तर सुटेल पेच

नाही तर दशकानुदशके चालेल तेच तेच ।।५।।

No comments: