Sunday, April 19, 2026

झोपाळू रोमियो

 रात्रीचा प्रहर ओसरला, झाली पहाट

जीवनाची चालू पुन्हा नव्याने जगरहाट
विरहापरी तुझ्या मला वाटे हे निरर्थक चऱ्हाट
वाट बघतो डोळा लागायची आज पुन्हा रात्री
स्वप्नात का असेना,
तुझ्याबरोबर मांडणार संसाराचा थाट
घातलाय मी हाच घाट

No comments: