Sunday, April 05, 2026

तेलकट माकडचाळे

डार्विन म्हणे माणसाचे, पूर्वज होते माकड
केळं मिळताच विसरते ते, आपसातले भांडण...
प्रगतीशील मानवास हवे केळे, अन् जोडीला तेलाचे तळे
तेल म्हणताच आठवते युद्ध, जणू तेल हेच युद्धाचे वंगण!
लढतो मग कुणाशीही, कसाही आणि कुठेही असू दे रणांगण
तेलाने सिंचण्यास, स्वतःचेच अंगण!

No comments: