केल्या खूप चारोळ्या
कधी होत्या शब्दांच्या जबरदस्ती ओळ्या
तर काही जबरदस्त शब्दांच्या ओळ्या
काही होत्या बधिरतेवर उपचारात्मक औषधी गोळ्या
काहींनी उघड्या पाडल्या फक्त औपचारिकता म्हणून जमलेल्या टोळ्या
काहींना मिळाल्या श्रोत्यांच्या टाळ्या
तर काही होत्या जणू शाब्दिक फाटक्या झोळ्या
काही चारोळ्यांत मांडलं प्रेमाचं गणित
काहीमध्ये होती प्रमेयाची भूमिती
मध्येच एखादं मस्त यमक
अचानकच पाजळली बुद्धीची चमक
या सगळ्यांना अर्थ असावा नव्हती कधीच अट
त्यामुळेच तर केल्या चारोळ्या सटासट
No comments:
Post a Comment