Thursday, April 23, 2026

बोटांचे प्रारब्ध

मानवी पंज्याला पाच बोटं;

एक सगळ्यात मोठं, तर एक सगळ्यात छोटं.


मोठ्या बोटाचा खोटा बाज,

उपयोग त्याचा— दाखविण्यास फक्त माज!


छोट्यांमुळेच झाली पकड मजबूत;

मानवाने केले सगळ्या प्राणीजाताच नेस्तनाबूत.


दोघांच्या  मधली तर्जनी

फोडे दुसऱ्यावर खापर, तर  दाखवी कधी मार्ग धोरणी


छोटी करंगळी तर संवाद साधण्यात पारंगत;

कुणालाही सांगे सहज— वाढले कायेत पाणी!


अनामिकेच्या गळ्यात अंगठीचा फास;

कधी जीवघेणा, तरी कधी जीवनवृद्धी झकास!

No comments: