Sunday, April 26, 2026

ओबामा


गुरुजी : मुलांनो, तुम्ही मोठ्यांचं, मुख्यतः आईवडीलांचे ऐकले पाहिजे. चांगले संस्कार तुम्हाला नुसतंच तारणार नाही तर त्यांच्या मुळे तुम्ही जीवनाची बाजी मारणार .. हे नक्की. 


बंड्या : गुरुजी, माझे बाबा पण असंच काहीतरी सांगत असतात. 


गुरुजी : अरे वा, फारच छान. 


बंड्या : हो, ते मला नेहमी म्हणतात, तु तुझ्या आईचं ऐकत जा, तुझं भलंच होईल.. मी पण तुझ्याचं आईचं एकतो.. हो की नाही 


गुरुजी : अगदी बरोब्बर , मी सुध्दा माझ्या मुलांना तेच सांगतो घरी .. 


बंड्या : गुरुजी, परवा तर बाबांनी भन्नाट गोष्टं सांगितली … 


गुरुजी : अरे वा, सांग की मग आम्हाला. 


बंड्या : तुम्हाला सांगू? आवडेल का तुम्हाला मी सांगितलेली गोष्टं? 


गुरुजी : मुलांनो, काय, ऐकायची का बंड्याची .. म्हणजे बड्यांच्या बाबांनी बंड्याला सांगितलेली गोष्टं. 


मुले : हो … 


बंड्या : खरंच. अरे वा .. तर ऐका .. 


बंड्या : तर बर का मुलांनो … हि गोष्टं. आहे माझ्या बाबांची.. तसं पाहिलं तर बाबांची नाही, 

म्हणजे खरंच सांगायच बाबांच्या बंड्याची, म्हणजे  त्यांच्या वर्गातल्या बंड मुलांची.  

म्हणजे .. विस्तारून स्पष्टपणे सांगायचे झालं तर … माझ्या बाबंनी, म्हणजे तुमच्या बंड्याच्या बाबांनी, त्यांच्या लहानपणच्या बंड वर्गमित्राची .. त्यांच्यातल्या बंड्याची मला .. म्हणजे तुमच्या बंड्याला सांगितलेली गोष्टं .. कळलं का ? 


बंड्या : गुरूजी ऐकताय ना .. 

गुरुजी : ऐ बंड्या .. गोष्टं सांग रे … नुसता वाहवत जातोस. 


बंड्या .. हो सांगतो सांगतो 


बंड्या : बर का मुलांनो .. तर बाबांचा वर्गमित्रांच नाव उगीच बंड्या नव्हते , तो फार बंड पणा करायचा — ना गुरुजींचं ऐकायचा , ना मित्रांचं ना कोणाचंच .. मनात येईल ते करायचा .. वाट्टेल त्याची खोडी काढायचा 


गुरुजी आणी मुले … मग .. पुढे काय ..


बंड्या : सांगतोय ना .. तर त्यांच्या वर्गात नविनच ईंग्रजी शिकवायचा सुरूवात झाली होती … त्यांच्या गुरुजींनी नियम केला - सगळ्यांनी वर्गात ईंग्रजीतुनच बोलायचं.  सगळ्यांसाठीच नियम होता तो. 


गुरूजी : अरे वा .. हि तर फारच छान कल्पना आहे. आपणही आणुया अंमलात?


बंड्या : अहो गुरूजी .. जरा शांत बसा .. उगाच फाटे

फोडू नका .. 


गुरुजी .. बंड्या 


बंड्या .. माफी माफी .. ते जरा गोष्ट सांगण्याच्या नादात ..  हं तर आपला बंड्या .. म्हणजे बाबांच्या वर्गातला बंड्या बर का .. मी नाही .. असाच खोड्या

काढत होता घरी/ शाळेत  .. नुसता धुडगूस 



बंड्या: सगळे वैतागले होते .. शेवटी

गुरुजी म्हणाले …म्हणजे गुरूजी तुम्ही नाही .. बाबांचे गुरूजी … हा ते म्हणले.. “  मीच सांगतो समजाऊन याला ..”


गुरूजी : हो रे कळलं मला तेवढं. मी काय गाढव आहे ? .. गाढव कुठला… 


बंड्या : अमं.. आता मला काय माहीत .. तुम्ही गाढव आहात का नाही, मी तर अजून शाळेतच आहे ना … 


गुरुजी : बरं बरं .. पुढे 


बंड्या : हा .. तर बाबांच्या वर्रगातल्या बड्यांच्या गुरुजींनी , बाबांच्या वर्रगातल्या बड्यांच्या बाबांची आणी बाबांच्या वर्रगातल्या बड्यांच्या आईची भेट

घेतली.  बाबांच्या वर्रगातल्या बड्यांच्या .. 


गुरुजी : अरे कळलं ना .. पुढे 


बंड्या : बाबांच्या वर्रगातल्या बड्यांच्या बाबांनी सांगितलं .. हे पहा गुरूजी .. कुणाचहि ऐकतं नाही हा … कुणाचंही ऐकले नाही तरी चालेल! पण … 

पण याने त्याच्या आईने सांगितलेलं ऐकायलाच पाहिजे .. अहो भलं होईल त्याचं. 


गुरूजी : हो बरोबर आहे .. 


बंड्या: अगदी बरोबर.. बाबांच्या वर्रगातल्या बड्यांचे गुरजीहि हेच म्हणाले .. “अगदी बरोबर” … आणी म्हणे .. मीच सांगतो समजाऊन त्याला 


मुले … मग पुढे काय झालं 


बंड्या:  तर बाबांच्या वर्रगातल्या बड्यांच्या गुरुजीनीं 

बाबांच्या वर्रगातल्या बड्यांला बोलावलं आणी म्हटले .. “बंड्या … अरे बंड्या … “ 


गुरूजी : मग 


बंड्या: बाबांच्या वर्रगातल्या बड्यांच्या गुरूजीं ना ईंग्रजी फारसं येतच नव्हतं आणी आईच ऐकत जा हे सांगायचं कसं … असा त्यांना प्रश्न पडला? .. मग ते म्हणाले … “बर का .. Obey मा … “


काय असेल ते असेल, पण आमच्या बाबांच्या वर्रगातल्या बड्यांच्या मनावर काय, त्या दिवशी त्यांच्या वर्गातल्या सगळ्या मुलाच्या कानांवर शब्द घुमले … बर का ओबे मा … बर का ओबे मा .. आणी बंड्या सुता सारखा .. सरळ!



आणी … बर का … माहितीय का,  नंतर काय झालं ?

मुले: … काय 


बंड्या : पुढे हाच मुलगा मोठे पणी झाला बरंका ओबे मा … म्हणजे American president बॅंरेक ओबामा … 


आईंच ऐका .. म्हणजे ओबे करा … president पण व्हाल! 


the end. 


No comments: