Sunday, April 05, 2026

मराठवाडी प्रेम


तुला आठवतं का?
आपण बघायला गेलो वेरुळच्या लेण्या,
बाईकवर फिरतांना पार गुंतल्या तुझ्या वेण्या;
मी तेव्हाच गुंतलो.
तुला आठवतं का?
आपण गेलो होतो बघायला बीबी का मकबरा,
परतायला ही रहदारी, घरी पोहचलो खूप उशिरा;
मला हवी तूच, जसा सत्यनारायणला हवाच शिरा;
मी तेव्हाच गुंतलो.
तुला आठवतं का?
आपण गेलो होतो सिद्धार्थ प्राणी संग्रहालय,
मी तेव्हाच ठरवलं, तुझ्यासाठीच बांधीन आलय;
जरी तू होतीस प्राण्यासारखी... माझी प्राणपिपासू!
मी तेव्हाच गुंतलो.
तुला आठवतं का?
आपण दमछाक करत सर केला होता देवगिरीचा डोंगर,
तेव्हाच ठरवलं, फक्त हिच्यासाठीच किसेन गाजर;
मी तेव्हाच गुंतलो.
तुला आठवतं का?
आपण जायचो सारखं गोगा बाबाची टेकडी,
तू होतीच तेव्हा रिकामटेकडी;
आणि मला घालायची होती तुला लग्नाची बेडी...
मी तेव्हाच गुंतलो.

No comments: